व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पिग्मी लोकांना बायबलचे सत्य सांगणे

पिग्मी लोकांना बायबलचे सत्य सांगणे

पिग्मी लोकांना बायबलचे सत्य सांगणे

कॅमेरून येथील सावध राहा! लेखकाकडून

संपूर्ण जगभरातील २३० पेक्षा अधिक राष्ट्रांत, यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याचा संदेश ‘सर्व माणसांना’ सांगायचा प्रयत्न करत आहेत. (१ तीमथ्य २:४; मत्तय २४:१४) यांमध्ये, ठेंगू असलेल्या आफ्रिकन पिग्मी लोकांचाही समावेश आहे ज्यांची सरासरी उंची चार ते साडे चार फूट इतकी असते. हे विशेषतः मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाच्या दाट जंगलांमध्ये, काँगो प्रदेशात आणि आग्नेय कॅमेरूनमध्ये राहतात.

नेफेरिरकरे या इजिप्तच्या फारोने जेव्हा नाईल नदीचा उगम कोठून आहे हे पाहण्यासाठी एका शोध पथकाला पाठवले होते तेव्हा त्यांचा पहिल्यांदा पिग्मी लोकांबरोबर संपर्क आल्याचा लिखित अहवाल आहे. आफ्रिकाच्या घनदाट जंगलाच्या अगदी आत, आपण बुटक्या लोकांना पाहिले, असा शोध पथकाने अहवाल दिला. नंतर, ग्रीक लेखक होमर आणि तत्त्ववेत्ता ॲरिस्टोटल या दोघांनीही पिग्मींचा उल्लेख केला. १६ व्या आणि १७ व्या शतकात युरोपियन लोकांचा पिग्मींशी संपर्क आला.

आधुनिक काळात यहोवाचे साक्षीदार आफ्रिकेच्या जंगलात जाऊन प्रचार कार्य करीत आहेत. पिग्मींनी राज्य संदेशाला चांगला प्रतिसाद दिला असला तरी, त्यांची आवड आणखी वाढवण्याचे बहुतेक प्रयत्न यशस्वी ठरत नाहीत. कारण, पिग्मी हे भटक्या जमातीचे आहेत; एका ठिकाणी एखाद दोन महिने राहिल्यानंतर ते दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जातात.

पिग्मी हे शांतताप्रिय, लाजाळू स्वभावाचे लोक म्हणून ओळखले जातात; आफ्रिकेत यांची १,५०,००० ते ३,००,००० इतकी लोकसंख्या असेल असा अंदाज लावला जातो. सरकारांनी, आंतरराष्ट्रीय संघटनांनी आणि चर्चेसनी खासकरून यांच्यासाठी शाळा बांधल्या तसेच त्यांच्या जीवनशैलीनुरूप त्यांना लहान घरे बांधून दिली. तरीपण, एका ठिकाणी त्यांना स्थायिक करण्याचे बरेच प्रयत्न फसले आहेत.

परंतु कॅमेरूनमध्ये याला एक अपवाद आहे, झॉन्वे म्बाकी; हा पहिला पिग्मी आहे जो यहोवाचा साक्षीदार बनला. तुम्ही पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकाल हे सचित्र पुस्तक आणि इतर प्रकाशने वाचल्यानंतर त्याने बायबलचा संदेश स्वीकारला. * २००२ साली झॉन्वेचा बाप्तिस्मा झाला आणि सध्या तो पायनियर म्हणून सेवा करत आहे; यहोवाचे साक्षीदार पूर्ण वेळेच्या सुवार्तिकांना पायनियर म्हणतात. कॅमेरूनच्या आग्नेयेकडील म्बांग नावाच्या एका लहान गावातील ख्रिस्ती मंडळीत तो सेवा सेवक म्हणूनही कार्य करतो. कॅमेरूनमधील आणखी पिग्मी, ‘सर्व माणसांवर’ प्रेम करणारा एकच खरा देव यहोवा याची उपासना करण्याची निवड करतील की नाही हे काळच आपल्याला सांगेल. (g०४ ८/२२)

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित, पण सध्या छापले जात नाही.

[२८ पानांवरील चित्र]

झॉन्वे म्बाकी—कॅमेरूनमध्ये साक्षीदार बनलेला पहिला पिग्मी—सेवेत भाग घेताना