व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

मुले “मुलांना—आईवडिलांकडून काय हवंय?” ही लेखमालिका मिळाल्याबरोबर मी ती अधाशासारखी वाचून काढली. (एप्रिल-जून २००४) पाच मुलांची आई असल्यामुळे हे सर्व लेख माझ्या हृदयाला भावले. जगातील प्रत्येक आईने हे लेख वाचावेत अशी माझी इच्छा आहे.

सी. एम., फ्रान्स (g०४ १०/२२)

तुम्ही प्रकाशित करत असलेले लेख माझ्यासाठी जणू काय अगदी वेळेवर येतात. आम्हाला बाळ होणार होतं तेव्हा तुम्ही गरोदर स्त्रियांसाठी लेख छापला. (जानेवारी ८, २००३) आता आम्हाला तीन महिन्यांचा गोंडस मुलगा आहे तर तुम्ही मुलांना वाढवण्याविषयी सुरेख सूचना छापल्या. माझ्यासारख्या तरुण आईसाठी हे लेख अतिशय फायदेकारक आहेत.

डी. के., पोलंड (g०४ १०/२२)

हर्बल उपचार “हर्बल उपचार—तुमच्याकरता फायदेकारक असू शकतात का? हा लेख मला खूप आवडला. (जानेवारी-मार्च २००४) मी एक स्टाफ नर्स आहे आणि माझ्या सांध्यांसाठी मी पुष्कळ नैसर्गिक औषधांचा वापर करते. मला त्यांचा खूप फायदा झाला आहे. परंतु, काही जडीबुटींमुळे शस्त्रक्रियेच्या वेळी खूप रक्‍तस्राव होऊ शकतो, याचा तुम्ही उल्लेख केला नाही. शस्त्रक्रियेआधी काही जडीबुटी घेण्याचे थांबवले पाहिजे, या गोष्टीवर यहोवाच्या साक्षीदारांनी विशेष विचार केला पाहिजे.

जे. एच., अमेरिका (g०४ १०/२२)

“सावध राहाचे” उत्तर: या महत्त्वपूर्ण सूचनेसाठी आम्ही तुमचे आभार मानतो. शस्त्रक्रियेआधी, रुग्णाने आपल्या डॉक्टरांना, तो घेत असलेल्या औषधांविषयी ज्यात जडीबुटींचा देखील समावेश होतो, सांगणे गरजेचे आहे. ‘रक्‍त वर्ज्य करा,’ या बायबलमधील आज्ञेचे पालन करणाऱ्‍यांसाठी हे खासकरून महत्त्वाचे आहे.—प्रेषितांची कृत्ये १५:२९.

भावंडांतील प्रतिस्पर्धा “तरुण लोक विचारतात . . . माझ्या भावंडाच्या सावलीतून मी कशी मुक्‍त होऊ शकते?” या लेखाबद्दल मी तुमचे अगदी मनापासून आभार मानू इच्छिते. (जानेवारी-मार्च २००४) मी १६ वर्षांची आहे आणि मला असं वाटतं, की माझ्या मोठ्या बहिणीकडेच सर्वांचं लक्ष असतं. मला माहीत आहे, यहोवा मला पाहतो पण तरीसुद्धा मला एकटं असल्यासारखं वाटतं. या लेखानं अगदी उत्तम प्रकारे माझ्या भावना उमटवल्या आहेत. त्यातील शब्द रचना इतकी प्रेमळ होती, की वाचता वाचता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या व्यावहारिक सल्ल्यासाठी तुमचे खूप आभार. यामुळे माझ्या दृष्टिकोनात बराच फरक झाला.

एम. ओ., जपान (g०४ ९/२२)

कधीकधी मलाही, लेखात ज्या तरुणांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यांच्यासारखं वाटायचं. मला आठवतं, अगदी सुरुवातीपासून माझ्या थोरल्या बहिणीलाच सर्व जण उत्तम उदाहरण असल्याचं मानतात. त्यामुळे, कुटुंबातील सदस्याशी तुमची सतत तुलना केली जाते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, हे मला माहीत आहे. तुम्ही स्वतःहून जे अगदी उत्तमरीत्या करू शकता असे एखादे काम शोधून काढा, असे जे तुम्ही म्हणालात ते ‘रुपेरी करंड्यांत सोन्याच्या फळांसारखे’—उचित वेळेला आलेले शब्द होते.—नीतिसूत्रे २५:११.

एस. टी., अमेरिका (g०४ ९/२२)

मला एक थोरली बहीण आहे व लहान भाऊ आहे. ते दोघंही पुष्कळ गोष्टींमध्ये माझ्यापेक्षा उत्तम आहेत. त्यामुळे मी तुम्ही दिलेला सल्ला स्वीकारला आणि आता स्पॅनिश शिकत आहे व क्षेत्र सेवेत अधिक वेळा जाऊ लागले आहे. मलाही शिकण्यात मजा येऊ लागली आहे—आणि लोक आता माझ्याकडेही लक्ष देऊ लागले आहेत.

एच. बी., अमेरिका (g०४ ९/२२)

गृहपाठ मी माध्यमिक शाळेतल्या पहिल्या वर्षातली विद्यार्थीनी आहे आणि मला कधीही वेळेचं नियोजन करता आलं नाही. “तरुण लोक विचारतात . . . गृहपाठ करायला मला वेळ कोठून मिळेल?” हा लेख वाचल्यामुळे मला खूप फायदा झाला. (जानेवारी २२, २००४) मी जास्त टीव्ही पाहायचे नाही. पण समजा कधी बसलेच पाहायला तर, एकापाठोपाठ एक कार्यक्रम पाहत बसायची. आता तर मी टीव्ही पाहणंच बंद केलं आहे.

आर. ओ., जपान (g०४ ११/८)