व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

मेंदूवर अतिभार?

काही संशोधकांचे म्हणणे आहे, की “एकाच वेळी अनेक कामे केल्याने मेंदूवर ताण येतो,” असा कॅनडाच्या टोरंटो स्टार बातमीपत्रकाने अहवाल दिला. यामुळे, एखाद्या व्यक्‍तीची कार्यक्षमता कमजोर होऊ शकते, ती चुका करू शकते व आजारीही पडू शकते, असे अभ्यासांवरून दिसून आले आहे. उदाहरणार्थ, “एखाद्या व्यक्‍तीची स्मरणशक्‍ती कमजोर होऊ शकते, तिला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो, फ्लू आणि अपचन होण्याचा धोका वाढू शकतो आणि दात आणि हिरड्यांना देखील इजा होऊ शकते.” अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अभ्यासांनुसार, लोक जेव्हा विशिष्ट कामे करतात तेव्हा त्यांच्या मेंदूचे विशिष्ट भाग उत्तेजित होतात. परंतु ते जेव्हा एकाच वेळी दोन किंवा त्याहूनही अधिक कामे करायचा प्रयत्न करतात, जसे की कार चालवताना मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा, “मेंदू अक्षरशः हळूहळू बंद पडायला लागतो,” असे एमरी विद्यापीठाचे मज्जातंतुशास्त्रज्ञ डॉ. जॉन स्लॅडके म्हणतात. “मेंदूला इतकी कामे करता येत नाहीत, किंबहुना तो ती करायला चक्क नकार देतो.” संशोधकांच्या मते, लोकांनी दमाने घेतले पाहिजे आणि ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, की त्यांचा मेंदू, त्यांना हवी असलेली सर्व कामे करू शकत नाही. (g०४ १०/२२)

सर्वात अधिक भाषांतर केलेले पुस्तक

बायबल आजही, जगातले सर्वात अधिक भाषांतर केलेले पुस्तक आहे. आज अस्तित्वात असलेल्या अंदाजे ६,५०० भाषांपैकी, बायबल संपूर्ण किंवा त्याचा काही भाग २,३५५ भाषांमध्ये उपलब्ध आहे. बायबल सध्या, आफ्रिकेत ६६५ भाषांत, आशियात ५८५ भाषांत, ओशेनियात ४१४ भाषांत, लॅटिन अमेरिका व कॅरिबियनमध्ये ४०४ भाषांत, युरोपमध्ये २०९ भाषांत आणि उत्तर अमेरिकेत ७५ भाषांमध्ये उपलब्ध आहे. संयुक्‍त बायबल संस्था सध्या, जवळजवळ ६०० भाषांतील बायबल भाषांतर कामात साहाय्य करत आहे. (g०४ १२/८)

बालकांसाठी टीव्ही घातक?

“टीव्ही पाहणाऱ्‍या अगदीच लहान बालकांमध्ये, ते शाळेत जायला लागेपर्यंत एकाग्रता अभाव समस्या निर्माण होण्याचा वाढता धोका आहे,” अशी मेक्सिको सिटीच्या द हेरल्डने बातमी दिली. या बातमीत एका अभ्यासाचा उल्लेख करण्यात आला जो, पेडिआट्रिक्स नावाच्या एका वैद्यकीय मासिकात छापून आला होता; यात, एकूण १,३४५ बालकांच्या दोन गटांचा अभ्यास करण्यात आला. एका गटात, एक वर्षाची बालके होती तर दुसऱ्‍या गटात तीन वर्षांची बालके होती. या अभ्यासानुसार असे पाहण्यात आले, की या मुलांनी दर दिवशी एक तास टीव्ही पाहिला तर, वयाच्या सातव्या वर्षापर्यंत त्यांना एकाग्रतेच्या अभावाची समस्या होण्याचा धोका १० टक्क्याने वाढू शकतो आणि प्रत्येक अतिरिक्‍त तासासोबत हा धोका १० टक्क्यांनी वाढत जातो. “बहुतेक टीव्ही कार्यक्रमात दाखवली जाणारी अतिजलद दृश्‍ये बालकांच्या मेंदूचा प्राकृत विकास खुंटवू शकते,” असे संशोधकांना वाटते. या अभ्यासाचे लेखक डॉ. दिमित्री क्रिस्ताकीस म्हणतात: “वास्तविक पाहता मुलांनी टीव्ही पाहू नये यासाठी अनेक कारणे आहेत. इतर अभ्यासांतून असे दिसून आले आहे, की टीव्ही पाहण्याचा संबंध, स्थूलता व चिडखोरपणा यांजशी आहे.” (g०४ १२/२२)

हसा आणि निरोगी राहा

“हसल्याने आपल्याला बरे का वाटते याचे आणखी एक कारण, स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीतील मज्जातंतुशास्त्रज्ञांना सापडले आहे,” असे युसी बर्क्ली वेलनेस लेटरने सांगितले. “विनोदी कार्टून वाचणाऱ्‍या लोकांच्या मेंदूच्या कार्यावर त्यांनी देखरेख ठेवल्यावर त्यांना दिसून आले, की विनोदबुद्धीमुळे व हसल्यामुळे, उत्तेजक औषधांमुळे ज्या क्षेत्रांवर सहसा परिणाम होतो तीच क्षेत्रे अर्थात मेंदूची ‘बक्षीस केंद्रे’ उत्तेजित झाली. “हसल्यामुळे, तणाव कमी होतो, मन हलके होऊन उभारी येते,” असे वेलनेस लेटरने म्हटले. हसल्यामुळे आपल्या होर्मोनचे उत्पादन आणि हृदयाची गती वाढते, रक्‍ताचे अभिसरण व स्नायूंचा ताण सुधारतो. “होय, खो खो हसणे एक प्रकारचा उत्तम व्यायाम आहे,” असे वेलनेस लेटरने म्हटले. “पण हसल्यामुळे जास्त कॅलरीज वगैरे जळत नाहीत. तेव्हा मनसोक्‍त हसा, पण सडपातळ होण्याची अपेक्षा करू नका.” (g०४ १२/२२)