तरुणांना नेमके काय हवे असते?
तरुणांना नेमके काय हवे असते?
सर्व वयोगटातील वाचक अनेक वर्षांपासून असे म्हणत आले आहेत, की तरुणांना नेमकी जी माहिती हवी आहे ती तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे या पुस्तकात आहे. मेक्सिको, सिनालोआतील एका किशोरवयीन मुलीने आपल्या मित्रमैत्रिणींना देण्याकरता म्हणून या पुस्तकाच्या दहा प्रती मागवल्या. ती म्हणाली, की मी यहोवाची साक्षीदार नाही, तरीपण मला हे पुस्तक खरोखर खूप आवडले; ती म्हणते: “मी तुम्हा लोकांचा खूप आदर करते.”
तिने असेही म्हटले: “माझे अनेक मित्र आहेत ज्यांना, त्यांच्या आजच्या जीवनाविषयी अनेक प्रश्न आहेत. मी त्यांना हे पुस्तक दाखवलं तेव्हा त्यांना ते खूप आवडलं. हे पुस्तक उत्कृष्ट आहे आणि त्यात, एखाद्या तरुणाला माहीत असली पाहिजे ती सर्व माहिती आहे.” उन्हाळ्याची सुटी लागण्याआधी मला ही पुस्तकं मिळतील का, असे तिने विचारले.
तरुणांचे प्रश्न या पुस्तकात ३९ अध्याय आहेत. जसे की, “मला माझ्या पालकांकडून अधिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल?” “मला खरे मित्र कसे बनवता येतील?” “विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?” “खरे प्रेम असल्याचे मी कसे ओळखावे?” सोबत दिलेले कूपन भरून या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवण्याद्वारे तुम्ही या ३२० पानी पुस्तकाबद्दल आणखी माहिती मागवू शकता. (g०४ १०/८)
□ कसल्याही बाध्यतेविना, मी तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे या पुस्तकाविषयी अधिक माहितीची विनंती करत आहे.
□ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.