व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“माझ्या प्राध्यापकांना खूप आनंद झाला”

“माझ्या प्राध्यापकांना खूप आनंद झाला”

“माझ्या प्राध्यापकांना खूप आनंद झाला”

असे, जॉर्जिया देशातल्या बिलिसी राज्य वैद्यकीय विद्यापीठात, वैद्यकीय शाखेच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्‍या एका विद्यार्थ्याने सावध राहाच्या! प्रकाशकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. पण या विद्यार्थ्याने सावध राहाच्या! प्रकाशकांना पत्र का लिहिले?

मी १९९८ सालापासून तुमची मासिके वाचू लागलो. . . . मला त्यांचा माझ्या अभ्यासात खूप फायदा होतो. यातील लेख अगदी समयोचित आणि पूर्णपणे विश्‍वसनीय असतात. अलिकडेच, मी, सावध राहा! याच्या नोव्हेंबर २२, २००२ च्या इंग्रजी अंकातील स्कंधकोशिका—विज्ञान खूप पुढे गेले आहे का? असे शीर्षक असलेल्या मासिकातल्या माहितीचा उपयोग, ‘क्लोनींग आणि स्कंधकोशिकांचे प्रकार’ याविषयावरील माझ्या परीक्षेत केला. माझ्या प्राध्यापकांना खूप आनंद झाला आणि मला सर्वात जास्त गुण मिळाले.

“अशा चित्तवेधक विषयांवर आणि विशेषेकरून मेडिसीनवर तुम्ही लेख छापता म्हणून मला खूप आनंद होतो. मी किंवा माझ्या कुटुंबातले कोणीही यहोवाचे साक्षीदार नाहीत, तरीपण आम्हाला सर्वांना तुमची मासिकं खूप आवडतात कारण त्यांमुळे आमच्या सभोवारच्या जगाबद्दलचं आमचं ज्ञान वाढतं.”

तुम्हाला हे ऐकून आश्‍चर्य वाटेल, की बायबलमध्ये, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हितकारक असलेले व्यावहारिक मार्गदर्शन आहे. यांबद्दलची सुरेख माहिती सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या ३२ पानी माहितीपत्रकात दिली आहे. सोबत दिलेले कूपन भरून ते, कूपनवरील पत्त्यावर किंवा या मासिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवून तुम्ही अधिक माहिती मागवू शकता. (g०५ १/२२)

□ कसल्याही बाध्यतेविना, मी सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकाविषयी अधिक माहितीची विनंती करत आहे.

□ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.