व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“लोकांना हे कळलं तर ना!”

“लोकांना हे कळलं तर ना!”

“लोकांना हे कळलं तर ना!”

उच्च शाळा संपल्यानंतर पुष्कळ तरुणांचे लक्ष्य भौतिक ध्येये प्राप्त करण्याकडे असते, पण डेव्हीडच्या मनात दुसरेच काहीतरी होते. २००३ सालच्या सप्टेंबर महिन्यात तो आणि त्याचा आणखी एक मित्र, संयुक्‍त संस्थानांतील इलिनोईहून डॉमिनिकन प्रजासत्ताक येथे राहायला गेले. * डेव्हीडचे मित्र आणि कुटुंबातले त्याला प्रेमाने डेव्ही म्हणायचे. तर डेव्हीने स्पॅनिश भाषा शिकण्याचे व यहोवाच्या साक्षीदारांच्या नावास मंडळीचा सभासद होण्याचे ठरवले, जेणेकरून त्याला त्यांच्या बायबलचे शिक्षण देण्याच्या कार्यात भाग घेता येईल. या मंडळीनेही त्याचे स्वागत केले. या मंडळीत एकच वडील आहेत. त्यांचे नाव आहे क्वान. ते म्हणाले: “डेव्हीला कोणतंही काम सांगितलं, तर तो ते करायचा. त्याला सतत इतरांसाठी झटायला आवडायचे. म्हणून मंडळीतल्या सर्वांचा तो आवडता होता.”

डेव्हीने पूर्ण मनाने आपली नेमणूक पार पाडली. संयुक्‍त संस्थानातील आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटले: “इथं मी माझ्या जीवनाचा खऱ्‍या अर्थानं आनंद लुटत आहे. सेवेत जाऊन आल्यावर किती तजेला मिळतो. आम्ही प्रत्येक दारी जवळजवळ २० मिनिटे बोलतो, कारण इथं लोक खूप छान ऐकतात; तुम्ही जितकं बोलाल तितकं ते ऐकत राहतात.” मी सहा बायबल अभ्यास चालवतो, पण आम्हाला अजून मदत हवी आहे. ३० राज्य प्रचारक असलेल्या आमच्या मंडळीत एकदा १०३ जण उपस्थित होते!”

दुःखाची गोष्ट अशी, की एप्रिल २४, २००४ रोजी एका अपघातात डेव्ही आणि त्याच्याच मंडळीतल्या आणखी एका तरुणाचा अंत झाला. पण आपला मृत्यूपर्यंत डेव्ही, करत असलेल्या कार्याबद्दल खूप आवेशी होता आणि त्याने संयुक्‍त संस्थानांतील आपल्या मंडळीतील अनेक युवकांनाही असे करण्याचे प्रोत्साहन दिले होते. त्याने एका साक्षीदार तरुणीला सांगितले होते: “तुझा पूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल.”

स्वतः डेव्हीने त्याच्या दृष्टिकोनात, जसे की भौतिक गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन यांत झालेला बदल अनुभवला होता. त्याच्या वडिलांनी आठवून सांगितले: “डेव्ही एकदा घरी आला होता आणि त्याला स्की सहलीचे आमंत्रण मिळालं. यासाठी किती खर्च येईल असं त्यानं विचारलं. जेव्हा त्याला खर्च सांगण्यात आला, तेव्हा डेव्ही म्हणाला, की इतका पैसा तो सहलीसाठी मुळीच खर्च करणार नाही; उलट, त्याच पैशात तो, डॉमिनिकन प्रजासत्ताकांत कितीतरी महिन्यांपर्यंत गुजराण करू शकेल!”

डेव्हीच्या आवेशाचा इतरांवरही परिणाम झाला. संयुक्‍त संस्थानातील डेव्हीच्या मंडळीतील एका तरुणीने म्हटले: “मी डेव्हीबद्दल व तो या सेवेत किती आनंदी होता हे मी ऐकलं तेव्हा मी पण त्याच्यासारखी सेवा करून समाधान आणि आनंद मिळवू शकते, असं मला वाटू लागलं. डेव्हीच्या मृत्यूमुळे मी आता विचार करू लागले आहे, की मी जर उद्या मेले तर लोक माझ्याविषयी काय म्हणतील आणि मीही लोकांच्या जीवनावर असा सकारात्मक प्रभाव पाडू शकेन का.”

यहोवाचा साक्षीदार या नात्याने डेव्हीच्या पालकांना व त्याच्या भावंडांना पूर्ण खात्री आहे, की येणाऱ्‍या धार्मिक नव्या जगात देव डेव्हीचे पुनरुत्थान करील. (योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:१-४) पण तोपर्यंत, त्यांना या गोष्टीने सांत्वन मिळते, की डेव्हीने आपल्या जीवनाचा—आपल्या सृष्टीकर्त्याची सेवा करण्यात शक्य तितक्या उत्तम प्रकारे उपयोग केला होता. (उपदेशक १२:१) जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेताना डेव्ही एकदा म्हणाला होता: “प्रत्येक तरुणानं माझ्यासारखं काहीतरी करून, मी जो आनंद अनुभवत आहे तो आनंद अनुभवावा, अशी माझी इच्छा आहे. पूर्ण मनानं यहोवाची सेवा करण्यासारखी उत्तम गोष्ट या जगात नाही. पण लोकांना हे कळलं तर ना!” (g०५ १/८)

[तळटीप]

^ डेव्हीड प्रमाणे पुष्कळ यहोवाच्या साक्षीदारांनी स्वेच्छेने, राज्य प्रचारकांची गरज असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी तर तिथली भाषाही शिकून घेतली आहे, जेणेकरून ते लोकांना देवाच्या वचनातील सत्ये शिकवू शकतील. उदाहरणार्थ, ४०० पेक्षा अधिक स्वयंसेवक डॉमिनिकन प्रजासत्ताक येथे सेवा करत आहेत.