व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

भेदभाव “भेदभावांचा कधी अंत होईल का?” ही लेखमालिका अतिशय आवडली. (ऑक्टोबर-डिसेंबर २००४) हे लेख वाचत असताना मला जाणवलं, की मी स्वतः काही प्रमाणात भेदभाव करते. हे खरोखरच आश्‍चर्यजनक आहे कारण, पूर्वग्रह बाळगणाऱ्‍या लोकांचा सहसा मला राग येतो. मला माहीत आहे, हे मासिक मला निश्‍चितच मदत करेल.

एम. यु., संयुक्‍त संस्थाने

मी माझ्या देशापासून खूप दूर राहत आहे, पण इतरजण माझ्याशी भेदभावानं वागतात, असं मला वाटत नाही. पण, या लेखांनी मला, ज्यांच्या मनात अशा भावना आहेत अशा लोकांना समजण्यास मदत केली. यहोवा लवकरच या समस्येचा अंत करणार आहे, म्हणून आपण त्याचे किती आभारी आहोत!

टी. जी., नॉर्वे

भेदभावांच्या समस्येविषयी लोकांना जागृत करण्याच्या हेतूने तुम्ही लिहिलेल्या लेखांबद्दल मी तुमची प्रशंसा करते. पण, मला वाटतं तुम्ही देखील पृष्ठ ८ व ९ वर भेदभावच करता. तेथे तुम्ही दोन यहुदी वाटसरूंविषयी सांगता ज्यांनी एका जखमी शोमरोन्याला मदत केली नाही. तुम्ही यहुद्यांना असं का निवडलत?

एच. एच., संयुक्‍त संस्थाने (g०५ ६/२२)

“सावध राहाचे!” उत्तर: प्रेमळ शोमरोन्याचा दृष्टांत देणारा येशू स्वतः एक यहुदी मनुष्य होता. येशूच्या दिवसांत, अनेक यहुद्यांच्या मनात शोमरोन्यांविषयी पूर्वग्रह होते. तेव्हा, दुसऱ्‍या जातीचा मनुष्य एका यहुदी मनुष्याचा चांगला शेजारी होऊ शकतो हे दाखवण्याद्वारे येशू त्याच्या यहुदी श्रोत्यांना एक महत्त्वपूर्ण धडा शिकवत होता.

लग्नाआधी लैंगिक संबंध “तरुण लोक विचारतात . . . लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे?” या लेखामुळे मला मानसिक शक्‍ती मिळाली. (ऑक्टोबर-डिसेंबर २००४) लेखातील तरुणांनी व्यक्‍त केलेले मनोगत माझ्या मनातील विचारांसारखेच आहेत. पण स्तोत्र ८४:११ मधील शब्दांचा माझ्यावर जास्त प्रभाव पडला. या वचनात म्हटले आहे, की जे लोक सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून यहोवा राहणार नाही.

टी. यु., जर्मनी

तरुण या नात्याने मी नेहमी यहोवाच्या नजरेत शुद्ध राहण्याचा प्रयत्न करतो. पण हे नेहमीच सोपे नाही. या लेखाने माझा निश्‍चय आणखी पक्का केला आणि फक्‍त मीच एकटा सैतानी जगाच्या दबावांचा सामना करत नाही तर इतरही आहेत, ही आठवण करून दिली. यहोवाला तरुणांची किती काळजी आहे ही जाणीव खरोखरच खूप प्रोत्साहनदायक आहे.

एफ. बी., बोत्सवाना (g०५ ५/२२)

“तरुण लोक विचारतात . . . मी लग्नाआधी लैंगिक संबंध कसे टाळू शकतो?” या लेख वाचला. (ऑगस्ट २२, २००४) शिक्षक व सल्लागार या नात्याने मला हा लेख अतिशय आवडला. वर्गातील एका चर्चेत मी या लेखातील काही उपयुक्‍त मुद्द्‌यांची चर्चा केली. यहोवा देवाच्या नजरेत पवित्र व स्वीकारयोग्य झाल्याने व आपल्या अभ्यासात चांगली प्रगती केल्याने लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवल्यामुळे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करावा लागणार नाही, हे मी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पुष्कळ विद्यार्थ्यांनी आवड दाखवली व बायबलविषयी आणखी शिकून घेण्याची तयारीही दाखवली! काही शिक्षक आता मला, आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांबरोबरही बोलण्यास सांगत आहेत. दर आठवडी मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत, तरुणांचे प्रश्‍न पुस्तकातील विविध विषयांवर चर्चा करते.

बी. सी., मोझांबिक

मी २५ वर्षांची आहे आणि कुमारिका राहण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे. हा लेख वाचल्यावर माझा निश्‍चय आणखी पक्का झाला आहे. यामुळे मी आदरणीय विवाहास पात्र ठरेन. तुमचे हे उत्तम काम असेच चालू ठेवा.

एफ. के., युगांडा (g०५ ६/८)