व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगातील सर्वात जुने विद्यापीठ?

पोलीश आणि ईजिप्शियन पुरातत्त्ववेत्यांच्या एका कंपूने ईजिप्तमधील अलेक्झॅन्ड्रियाच्या प्राचीन विद्यापीठाच्या क्षेत्राचे उत्खनन केले. या कंपूला, एकूण ५,००० विद्यार्थी बसू शकतात अशी एकाच आकाराची १३ व्याख्यान सभागृहे आढळली, असा लॉस ॲजिलीस टाईम्सने अहवाल दिला. या बातमीपत्राने पुढे असे म्हटले, की प्रत्येक सभागृहाच्या आत तिन्ही भिंतींना लागून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पायऱ्‍यांच्या ओळी आहेत. आणि काही खोल्यातील पायऱ्‍यांच्या ओळी एकमेकांना जोडलेल्या आहेत त्यामुळे त्या इंग्रजीतील ‘U’ या आकारात आहेत.” सभागृहाच्या मध्यभागी एक उंचवटा आहे. तो कदाचित शिक्षकासाठी असावा. “अख्ख्या भूमध्य क्षेत्रातील कोणत्याही ग्रीको-रोमन क्षेत्रात पहिल्यांदाच सभागृहांचे असे हे संकुल आढळले आहे,” असे दुर्मिळ वस्तुंच्या ईजिप्तच्या श्रेष्ठ मंडळाचे अध्यक्ष व पुरातत्त्ववेत्ता झही हवास म्हणतात. हवास यांच्यामते हे “कदाचित जगातील सर्वात जुने विद्यापीठ” असावे. (g०५ ६/८)

लसणाचे आईस्क्रीम?

लसणातील औषधी गुणधर्मामुळे त्याची प्रशंसा केली जाते. आता, उत्तर फिलिपाईन्समधील मरियानो मार्कोस स्टेट युनिर्व्हसिटीने “आरोग्यास हितकारक” म्हणून लसणाचे आईस्क्रीम बनवले, असे वृत्त फिलिपाईन स्टार या बातमीपत्राने दिले. या नवीन उत्पादनाचा, लसणामुळे जे विकार बरे होतात ते विकार असलेल्या लोकांना फायदा होईल, अशी आशा केली जाते. या विकारांपैकी काही पुढील प्रमाणे आहेत: पडसे, ताप, उच्च रक्‍तदाब, श्‍वसनसंबंधीत विकार, सांधेदुखी, सर्पदंश, दातदुखी, क्षयरोग, डांग्या खोकला, जखमा आणि टक्कल पडणे. मग, कुणाला हवंय का लसणाचे आईस्क्रीम? (g०५ ६/८)

सफेद मगरी सापडल्या आहेत

“ओरिसातील भिटरकानिका राष्ट्रीय अभयारण्यातील वन्य अधिकाऱ्‍यांना . . . वार्षिक मगर गणनेच्यावेळी १५ दुर्मिळ सफेद मगरी आढळल्या,” असे द हिंदू या भारतातील वृत्तपत्रकाने म्हटले. सफेद मगरी अतिशय दुर्मिळ आहेत व “त्या जगात कोठेही आढळत नाहीत.” त्या क्षेत्रात बेकायदेशीर शिकारीमुळे खाऱ्‍या पाण्यातील मगरी १९७० च्या दशकात नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. परंतु राज्य सरकारने संयुक्‍त राष्ट्र कार्यक्रमाच्या साहाय्याने अभयारण्यातच एक मगर-संगोपन प्रकल्प सुरू केला. मुबलक प्रमाणात असलेली कच्छवनश्री, अदूषित पाणी, भरपूर अन्‍नसाठा आणि मानवाचे कमी व्यत्यय यांमुळे मगरींची पैदास करण्याचा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. द हिंदू वृत्तपत्रकानुसार अभयारण्यात आता नेहमीच्या रंगातील सुमारे १,५०० मगरींबरोबर दुर्मिळ सफेद रंगाच्या मगरी देखील आहेत. (g०५ ४/८)

तंबाखू, गरिबी आणि आजारपण

“जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा इशारा दिला आहे, की धुम्रपान करणारे ८४ टक्के लोक गरीब राष्ट्रांत राहत आहेत व ते तंबाखू आणि गरिबी या क्रूर चक्रात अडकले आहेत,” असे स्पॅनिश वृत्तपत्र डिआर्यो मिडिकोने म्हटले. शिवाय प्रत्येक राष्ट्रात, “अतिधुम्रपान करणारे आणि तंबाखूच्या वापरामुळे बेसुमार समस्यांचा सामना करणारे लोक, समाजातील सर्वात वंचित श्रेणीतील असतात.” बहुतेक विकसनशील राष्ट्रांत तंबाखूचा वापर कमी झालेला असला तरी, संपूर्ण जगभरात तंबाखू “आजारपणास चवथे महत्त्वपूर्ण कारण बनले आहे,” असे बातमीपत्र म्हणते. स्पेनमध्ये तंबाखूमुळे वर्षाला होणारे मृत्यूचे प्रमाण ६०,००० इतके झाले आहे तर धुम्रपान, “आजारपण, अपंगत्व आणि टाळता येणारा मृत्यू यांस प्रमुख कारण” बनले आहे. (g०५ ४/८)

स्वरूपाची चिंता करणारे तरुण

“तरुण लोक—विशेषतः मुली—फारच कमी वयात आपल्या स्वरूपाची चिंता करू लागल्या आहेत व यांमुळे त्यांना आरोग्यसंबंधित गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असे कॅनडाच्या ग्लोब ॲण्ड मेल या बातमीपत्रकाने सांगितले. १० ते १४ वयोगटातील मुलींना, त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रश्‍न विचारण्यात आले तेव्हा २,२०० पेक्षा अधिक मुलींनी प्रतिसाद दिला. “७ पेक्षा कमी टक्के मुली लठ्ठ होत्या पण ३१ टक्क्यांपेक्षा अधिक मुलींनी, आपण ‘खूप जाड’ आहोत असे म्हटले आणि २९ टक्के मुलींनी म्हटले की त्या वजन कमी करण्यासाठी सध्या पथ्य पाळत आहेत,” असे वृत्त द ग्लोबने दिले. पण सुदृढ मुली आपले वजन का घटवू पाहत आहेत? बातमीपत्रकानुसार, यांस प्रौढ आदर्श जबाबदार आहेत. हे सतत पथ्य पाळत असतात आणि लठ्ठ असलेल्या लोकांची मस्करी करत असतात. “किशोरवयीनांच्या या वर्तनास, प्रसारमाध्यमही बहुतांशी जबाबदार आहे. प्रसारमाध्यमाद्वारे सतत, अगदी सडपातळ मॉडेल्स दाखवले जातात,” असे द ग्लोब म्हणते. अशक्‍त मुलांसाठी टोरंटो इस्पितळात संशोधन करणाऱ्‍या वैज्ञानिक डॉ. गेल मेक्वे असे म्हणतात, की “पौगंडावस्थेतून जाणाऱ्‍या मुलांचे वजन वाढणे नैसर्गिक आहे आणि आवश्‍यक देखील आहे” हे, मुले, पालक व शिक्षक या सर्वांना समजले पाहिजे. (g०५ ४/८)

युद्धात बळी पडलेले अल्पवयीन

संयुक्‍त राष्ट्राच्या बालनिधीने असा अंदाज लावला आहे, की रुवांडातील जातीय दंगलीत कत्तल झालेल्या ८,००,००० लोकांपैकी ३,००,००० मुले होती, असे लायपत्सीगर फोकत्सायटुंग या जर्मन बातमीपत्रकाने वृत्त दिले. रुवांडातील १,००,००० मुले त्यांच्यावर लक्ष ठेवेल अशा प्रौढ व्यक्‍ती नसलेल्या घरात राहतात, असा अंदाज लावला जातो. “ते बेसुमार दारिद्र्‌यात जीवन कंठित आहेत,” असे बातमीपत्र पुढे म्हणते. (g०५ ४/२२)

बहुभाषिक मुलांचे संगोपन

“मुलांचे संगोपन सबुरीने व विचारशीलपणे केले जाते तेव्हा, बहुभाषेचा त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी खूप फायदा होऊ शकतो,” असे मेक्सिको सिटीच्या मिलेन्यो या बातमीपत्राने म्हटले. “दोन भाषा बोलणारी मुले, एक भाषा बोलणाऱ्‍या मुलांपेक्षा शाळेत उत्तम प्रगती करतात,” असे अभ्यासांवरून दिसून आले आहे. तसेच, दोन संस्कृती समजू शकणारी मुले, इतर लोकांच्या संपर्कात येतात तेव्हा ते त्यांचे दृष्टिकोन अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतात. कधीकधी आपली मुले एका वाक्यात दोन भाषांतील शब्द वापरतात किंवा एका भाषेचे नियम दुसऱ्‍या भाषेला लागू करून चुका करतात तेव्हा पालकांना काळजी वाटते. “पण या व्याकरणसंबंधित ‘चुका’ क्षुल्लक आहेत व त्या फार लवकर सुधारल्या जातात,” असे प्राध्यापक टोनी क्लीन यांचे म्हणणे आहे. प्राध्यापक टोनी क्लीन मानसोपचार तज्ज्ञ आहेत ज्यांनी मुलांच्या भाषा विकासाचा विशेष अभ्यास केला आहे. जन्मापासूनच जर मुलांना दोन्ही पालकांच्या भाषा शिकवण्यात आल्या तर मुले त्या आपोआप शिकतात आणि मुले मोठी झाल्यावर दोन भाषा बोलू लागतील. (g०५ ५/८)

अनपेक्षित राक्षसी लाटा

असे म्हटले जाते, की दर आठवडी संपूर्ण विश्‍वातील सागरात सरासरी दोन मोठी जहाजे पाण्यात बुडतात. सुपरटँकर आणि २०० मीटरपेक्षा अधिक लांबीची कंटेनर महाजहाजे देखील समुद्रात बुडाली आहेत. या दुर्घटनांपैकी बऱ्‍याच दुर्घटना प्रलयंकारी लाटांमुळे घडल्या, असे मानले जाते. मोठमोठी जहाजे गिळंकृत करू शकणाऱ्‍या राक्षसी लाटांविषयीचे वृत्त, खलाशांनी बनवलेल्या कथा आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परंतु, एका युरोपियन युनियन संशोधन प्रकल्पामुळे या कथा विश्‍वसनीय आहेत, असे दिसून आले. राक्षसी लाटा पाहण्यासाठी, समुद्राची उपग्रह रडार चित्रे बारकाईने तपासण्यात आली. सुटडॉईट्‌श त्सायटुंग या बातमीपत्रकानुसार, प्रकल्पाचे अध्यक्ष वुल्फगांग ऱ्‍होझांटाल असे म्हणतात: “कोणीही विचार करणार नाही अशा सर्रासपणे समुद्रात राक्षसी लाटा असतात, हे आम्ही सिद्ध केले आहे.” त्यांच्या गटाने, तीन आठवड्यांच्या कालावधीत निदान दहा राक्षसी लाटांची नोंद केली. अशा लाटा जवळजवळ उभ्याच असतात व त्या ४० मीटर उंच असू शकतात. त्या इतक्या शक्‍तिशाली असतात, की एखाद्या जहाजावर आपटल्यास जहाज फुटू शकते किंवा बुडूही शकते. फार कमी जहाजे त्यांच्यातून निभावू शकतात. “पण या लाटांचा अंदाज लावता येईल की नाही, याचे पृथक्करण आता आम्हाला करावे लागेल,” असे ऱ्‍होझांटाल यांचे म्हणणे आहे. (g०५ ६/८)