व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जणू काय कुणीतरी बनवले आहे?”

“जणू काय कुणीतरी बनवले आहे?”

“जणू काय कुणीतरी बनवले आहे?”

रात्रीच्या वेळी दुर्बिणीतून तुम्ही कधी आकाशाकडे पाहिले आहे का? ज्या अनेकांनी पाहिले आहे ते तुम्हाला सांगतील, की त्यांनी जेव्हा पहिल्यांदा शनि ग्रह पाहिला तेव्हा ते खूप अचंबित झाल्याचे त्यांना आठवते. काळ्याकुट्ट शालीवर कोंदलेल्या अगणित चकाकणाऱ्‍या ताऱ्‍यांमध्ये एका प्रकाशमय ग्रहाभोवती सुरेख चपट्या कड्या आहेत!

या कड्या काय आहेत? १६१० मध्ये, खगोलशास्त्रज्ञ गॅलिलियो याने स्वतःच्या हातांनी बनवलेल्या दुर्बिणीतून शनि ग्रह पाहिला तेव्हा त्याला तो अंधुकसा दिसला. शनिला जणू काय कान आहेत असे दिसत होते. मध्यभागी एक गोल आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन लहान गोल. पण जसजशा सुधारित दुर्बिणी आल्या तसतसे खगोलशास्त्रज्ञांना या कड्या आणखी स्पष्ट दिसल्या. तरीपण, या कड्या कशाच्या बनल्या आहेत यावर त्यांचे एकमत नव्हते. पुष्कळांचे असे म्हणणे होते, की त्या कडक, जड तबकड्या होत्या. पण १८९५ मध्ये खगोलशास्त्रज्ञांना ठोस पुरावा मिळाला, की या कड्या धुलीकण व हिमकणांनी बनल्या आहेत.

दूरचे ग्रह (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “असंख्य हिमकणांनी बनलेल्या शनिभोवतीच्या पातळ कड्या, सौरमालिकेतील प्रमुख आश्‍चर्यांपैकी आहेत. आपल्या आकलन शक्‍तीपलिकडे असलेल्या शनिभोवतीच्या चकाकणाऱ्‍या पट्ट्याची, आतल्या कड्यापासून बाहेरच्या कड्यापर्यंतची रुंदी ४,००,००० किलोमीटर आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे हा पट्टा खूप बारीकही आहे; म्हणजे त्याची जाडी सरासरी ३० मीटरपेक्षा कमी आहे.” जून २००४ मध्ये, कॅसिनी ह्‍यूजेन्स या अवकाशयानाने शनिवर पोहंचल्यानंतर माहिती आणि चित्रे पृथ्वीवर पाठवली तेव्हा वैज्ञानिकांना या शेकडो कड्यांच्या जटिलतेविषयी अधिक माहिती मिळू लागली.

स्मीथसोनियन नावाच्या मासिकातील एका लेखात अलिकडेच असे म्हटले गेले: “असे वाटते, की शनिला जणू काय कुणीतरी बनवले आहे—गणिताप्रमाणे अगदी परिपूर्ण.” लेखकाच्या भावना आपल्याला समजू शकतात; परंतु तो जे, ‘जणू काय’ म्हणतो, ते मात्र आपल्या गळी उतरत नाही. कारण वास्तविकतेत, हा सुरेख प्रकाशमय ग्रह इतर ग्रहांपैकी एक आहे जो, हजारो वर्षांपूर्वी ईश्‍वरप्रेरणेने लिहिलेल्या या वर्णनाला साजेसा आहे: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते.”—स्तोत्र १९:१. (g०५ ६/२२)

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

पार्श्‍वभूमी: NASA, ESA and E. Karkoschka (University of Arizona); छोटी चित्रे: NASA and The Hubble Heritage Team (STScl/AURA)