व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘तुला याचा अभिमान वाटला पाहिजे’

‘तुला याचा अभिमान वाटला पाहिजे’

‘तुला याचा अभिमान वाटला पाहिजे’

देवाचे खरे सेवक, प्रामाणिक असण्याचे महत्त्व ओळखतात. आपल्या निर्माणकर्त्यावरील प्रेम त्यांना प्रामाणिकता दाखवण्यास प्रवृत्त करते. लाझारोचे उदाहरण घ्या. व्हातुलको, मेक्सिको येथील एका हॉटेलमध्ये काम करत असताना एकदा त्याला कुणाचे तरी ७० डॉलर लॉबीमध्ये पडलेले दिसले. त्याने ते लगेच, ड्युटीवर असलेल्या मॅनेजरांच्या स्वाधीन केले. काही दिवसांनंतर, त्याला बाथरूममध्ये एक पाकीट सापडले. ते त्याने रिसेपशनमध्ये जाऊन दिले; जिचे ते पाकीट होते त्या स्त्रीला आपले पाकीट पाहून खूप आनंद झाला आणि आश्‍चर्यही वाटले.

या गोष्टी जनरल मॅनेजरांच्या लक्षात आल्या. त्यांनी लाझारोला विचारले, की कोणत्या गोष्टीने त्याला ते पैसे आणि ते पाकीट पुन्हा देण्यास प्रवृत्त केले होते? लाझारो म्हणाला, की बायबलमधून शिकलेल्या तत्त्वांमुळे त्याने, जे आपले नाही ते घेतले नव्हते. यावर जनरल मॅनेजरने लाझारोला एक प्रशंसापत्र दिले. त्यात असे लिहिले होते: “आज, उच्च नैतिक मूल्यांचे पालन करणारे लोक शोधून सापडत नाहीत. तुझ्या मनोवृत्तीची आम्ही प्रशंसा करतो. तू एक सभ्य मनुष्य आहेस हे तू आपल्या वागण्याकरून दाखवून दिले आहेस. तू आपल्या सहकर्मींसाठी एक आदर्श आहेस. तुला आणि तुझ्या कुटुंबाला याचा अभिमान वाटला पाहिजे.” लाझारोला त्या महिन्याचा आदर्श कामगार हा किताब देण्यात आला.

लाझारोबरोबर काम करणाऱ्‍या काहींना वाटले, की लाझारोने त्याला मिळालेल्या वस्तू परत करून चूक केली होती. पण मॅनेजरांची प्रतिक्रिया पाहिल्यावर त्यांनी, नैतिक तत्त्वांनुसार वागल्याबद्दल लाझारोचे अभिनंदन केले.

‘सर्वांचे बरे करा,’ आणि ‘सर्व बाबतीत चांगले [अर्थात, प्रामाणिक] वागा,’ असे उत्तेजन बायबल येशूच्या विश्‍वासू अनुयायांना देते. (गलतीकर ६:१०; इब्री लोकांस १३:१८) ख्रिस्ती या नात्याने प्रामाणिकता दाखवल्यामुळे “न्यायी व सरळ” असलेल्या बायबलच्या देवाचे अर्थात यहोवाचे गौरव होते, यात काही शंका नाही.—अनुवाद ३२:४. (g०५ ६/८)