व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

तरुण लोक विचारतात “तरुण लोक विचारतात . . . मी अपयशी होते तेव्हा काय करू शकते?” या सुरेख लेखाबद्दल अभिनंदन. (जानेवारी-मार्च, २००५) ॲनाप्रमाणे मला वाटायचं, की मी देवाचं मन दुखवलं आहे व मी त्याची क्षमा मिळवू शकत नाही. पण लेखात सांगितलं आहे, की यहोवाने दावीदाला क्षमा केली आणि त्याच्या कमजोरीतही त्याला टिकवून ठेवलं. आपणही अपयशी झालो तर यहोवा आपल्याला पुन्हा उठून उभं राहायला मदत करेल, हे माहीत होणे किती उत्तेजनदायक आहे!

जी. सी. इटली

मला सर्वात जास्त गलतीकर ६:४ या वचनामुळे मदत मिळाली. मी नेहमी माझ्या वर्गातल्या सर्वात उत्तम विद्यार्थ्यांबरोबर स्वतःची तुलना करते, ही चूक माझ्या लक्षात आली. यामुळे मी स्वतःचीच हानी करत आहे, हे या लेखानं मला समजायला मदत केली.

सी. पी., फ्रान्स (g०५ ९/८)

शाळेत साक्ष “आपल्या विश्‍वासाविषयी निःसंकोचपणे बोलणारे तरुण” या लेखाची माझ्या मनावर अमिट छाप पडली आहे. (ऑक्टोबर-डिसेंबर, २००४) हॉली, जेसिका आणि मेलिसा यांच्या अनुभवामुळे मी, शाळेत माझ्या वर्गसोबत्यांना किंवा शिक्षकांना माझ्या विश्‍वासाविषयी सांगण्यास शिकले. पहिल्यांदा मला साक्ष द्यायला भीती वाटली. पण आता शाळेत भेटणाऱ्‍यांना मी बिनधास्तपणे साक्ष देते.

जी. ओ., नायजेरिया (g०५ ९/८)

कोड “कोड म्हणजे काय?” या अलिकडेच आलेल्या लेखाने माझ्या अंतकरणाला स्पर्श केला. (जानेवारी-मार्च, २००५) मी नऊ वर्षांची होते तेव्हापासून मला कोड आहे. आता मी माझ्या तिशीत आहे. मी पुष्कळ उपचार केले पण कशाचाच फायदा झाला नाही. त्यामुळे, देवाच्या राज्याशिवाय आपण बरे होणार नाही, अशी मी माझ्या मनाची समजूत घातली आहे. मला कोड असले तरी मी जीवनात आनंदी आहे. हा त्वचा रोग असला तरी आपण जीवनात आनंदी व समाधानी राहू शकतो!

एम. एस., मोझांबिक (g०५ ९/८)

“कोड म्हणजे काय” हा लेख छापल्याबद्दल आभारी आहे. (जानेवारी-मार्च, २००५) गेल्या पाच वर्षांपासून मला हा विकार आहे. पण तुम्ही हा लेख छापल्यापासून मला याचा सामना करायला सोपे वाटू लागले आहे. आपल्या प्रत्येकाची जातीने काळजी घेणाऱ्‍या एका ख्रिस्ती समाजाची मी सदस्या आहे, याचा मला खूप आनंद वाटतो!

सी. एच., जर्मनी

गेल्या २५ वर्षांपासून मला पांढरे कोड आहे. मला जशा मानसिक यातना होतात तशाच इतरांनाही होतात हे वाचल्यावर मला किती सांत्वन मिळाले. पुष्कळ लोकांना या विकाराविषयीची चुकीची माहिती आहे. पण या लेखामुळे त्यांना अचूक माहिती मिळू शकेल. या विषयावर लिहिल्याबद्दल आभारी आहे!

के. एस., जपान

मला जवळजवळ ३० वर्षांपासून पांढरे कोड आहे. मी लहान होते तेव्हा, मुलं मला चिडवायची. पण मला आता या विकाराची जणू सवयच झाली आहे. सिबाँगिलीप्रमाणे मी पण इतरांना, यहोवा लवकरच सर्व विकार आणि त्यासोबत होणाऱ्‍या मानसिक यातना काढून टाकणार आहे ही बायबलमधील आशा सांगून त्यांना उत्तेजन द्यायचं ठरवलं आहे.

जे. एम., चेक प्रजासत्ताक

माझ्या १९ वर्षांच्या मुलीला हा विकार आहे. तिनं किती अश्रू गाळले आहेत किंवा याविषयी कितींदा यहोवाला प्रार्थना केली आहे, हे कुणाला माहीत नाही, फक्‍त मला माहीत आहे. तिचं यहोवावर खूप प्रेम आहे आणि अलिकडेच ती पूर्ण-वेळेची सुवार्तिक बनली. तुम्ही असे लेख प्रकाशित करत असल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. यामुळे यहोवाला आमच्याबद्दल किती काळजी वाटते याची आम्हाला खात्री मिळते.

एस. एस., जपान

पांढऱ्‍या कोडाचा विकार असलेल्यांना मानसिकरीत्या आणि भावनिकरीत्या यातना सहन कराव्या लागतात; हे मी जे म्हणतेय ते वाढवून-चढवून सांगत नाहीए. पण यहोवा आपल्याला, एकमेकांच्या भावना समजून घेण्यास शिकवत आहे. मी त्या काळाची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा मला माझा स्वाभाविक रंग पुन्हा मिळेल.

बी. डब्ल्यू., संयुक्‍त संस्थाने (g०५ ७/८)