व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मध—मधमाशीकडून मानवाला भेट

मध—मधमाशीकडून मानवाला भेट

मध—मधमाशीकडून मानवाला भेट

मेक्सिकोतील सावध राहा! लेखकाकडून

पार थकून गेलेल्या एका इस्राएली सैनिकाला, रानातून जात असताना मधमाशीचे पोळे दिसते ज्यातून मधाच्या धारा लागल्या होत्या. तो आपल्या काठीचे टोक त्या पोळ्यात खुपसतो आणि हातात आलेले मध खातो. लगेच, “त्याचे डोळे टवटवीत” होतात आणि त्याला पुन्हा शक्‍ती मिळते. (१ शमुवेल १४:२५-३०) बायबलमधील या अहवालात, मानवाला फायदा होणाऱ्‍या मधाच्या अनेक गुणधर्मांतील एका गुणधर्माविषयी सांगितले आहे. मध हे झटपट उर्जा देणारे अन्‍न आहे. त्यात कार्बोहायड्रेटचे जास्त म्हणजे सुमारे ८२ टक्के प्रमाण असते. आणि एक लक्षवेधक गोष्ट म्हणजे, केवळ ३० ग्रॅम मधातून मिळणाऱ्‍या उर्जेत, एक मधमाशी संपूर्ण जगभर उडू शकते!

पण मधमाशा फक्‍त मानवासाठी मध बनवतात का? नाही. मध हे मधमाशांचे प्रमुख अन्‍न होय. एका सर्वसाधारण आकाराच्या पोळ्यातील मधमाश्‍यांना हिवाळ्यासाठी १० ते १५ किलो मध लागते. पण चांगल्या हंगामात एका पोळ्यात सुमारे २५ किलो मध तयार होऊ शकते. यामुळे मानवांना भरपूर उत्पन्‍न परी उत्पन्‍न मिळते शिवाय अस्वले, रकून सारख्या प्राण्यांना अन्‍नही मिळते.

मधमाश्‍या मध कसे बनवतात? अन्‍नाच्या शोधात फिरणाऱ्‍या माश्‍या आपल्या नळीसारख्या जिभेने फुलांतील मकरंद चोखून घेतात. हा मकरंद त्या आपल्या मधू-जठरात गोळा करतात व पोळ्यात आणतात. पोळ्यात दुसऱ्‍या माश्‍यांना हा मकरंद दिला जातो. या माश्‍या हा मकरंद, आपल्या तोंडातील इतर ग्रंथीत तयार होत असलेल्या रसाबरोबर जवळजवळ अर्धा तास “चघळतात.” यानंतर मग तो मकरंद मेणाने बनवलेल्या कोशात साठवतात आणि मग आपल्या पंखांनी त्याला वारे घालतात जेणेकरून तो सुकून जातो. * त्यातील पाण्याचा अंश १८ पेक्षा कमी टक्के कमी केल्यानंतर, प्रत्येक कोश मेणाच्या एका पातळ थराने बंद केला जातो. असा बंद केलेला मध चिरकालासाठीसुद्धा टिकू शकतो. खाण्यालायक असलेला उत्तम मध, सुमारे ३००० वर्षांपूर्वीच्या फारोच्या थडग्यात सापडले आहे.

मधाचे औषधी गुणधर्म

मध हे एक अद्‌भुत अन्‍न आहे. ते, ब जीवनसत्त्वाचा, विविध खनिज द्रव्यांचा आणि ॲन्टीऑक्सीडंटचे जणू एक भांडारच आहे. शिवाय, ते सर्वात प्राचीन काळपासून वापरले जाणारे औषधही आहे. * युनिव्हर्सिटी ऑफ इलिन्योईस, अमेरिका येथे कीटकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्‍या डॉ. मे बरनबाम यांचे असे म्हणणे आहे: “फार प्राचीन काळपासून विविध वैद्यकीय कारणांसाठी मधाचा वापर होत आला आहे. जखमा, भाजलेली त्वचा, मोतीबिंदू, त्वचेवर फोड, खरचटणे यांवर मलम म्हणून लावण्यासाठी मधाचा वापर करण्यात आला आहे.”

मधाच्या औषधी गुणधर्मावर अलिकडेच होत असलेल्या चर्चेवर टिपणी करताना, सीएनएन वृत्त संघटनेने असा अहवाल दिला: “दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान, ॲन्टिबायोटिक मलमपट्टीचा शोध लागला तेव्हा मधाचा वापर नाहीसा झाला. पण नवीन संशोधनांमुळे व ॲन्टिबायोटिकचा प्रतिरोध करणाऱ्‍या जिवाणूंची वाढ होत असल्यामुळे, ही पारंपरिक उपचारपद्धती पुन्हा एकदा आजारांसाठी व जखमांसाठी वापरात येऊ लागली आहे.” जसे की, जळालेल्या त्वचेवरील उपचाराबाबत एक संशोधन करण्यात आले. असे पाहण्यात आले, की ज्या रुग्णांच्या जळालेल्या त्वचेवर मध लावले, ते रुग्ण लवकर बरे झाले, त्यांना कमी वेदना झाल्या व त्यांचे व्रणही कमी झाले.

अभ्यासांवरून असे दिसून आले, की मधमाशा मकरंदात मिसळत असलेल्या एका एंजाईममुळे मधात सौम्य ॲन्टिबॅक्टेरियल व ॲन्टिबायोटिक गुणधर्म तयार होतात. या एंजाईममुळे हायड्रोजेन पेरोओक्साईड तयार होते ज्यामुळे हानीकारक जिवाणूंचा नाश होतो. * शिवाय, त्वचेवर मध लावल्यामुळे, जळजळ कमी होते व सुदृढ कोशिकांची वाढ होते. त्यामुळे, न्यूझीलंडचे रसायनशास्त्रज्ञ डॉ. पीटर मोलन म्हणतात: “मध हे सुप्रसिद्ध व परिणामकारक रोग निवारक म्हणून पारंपरिक उपचारपद्धती आचरणारे वैद्य स्वीकारू लागले आहेत.” वास्तविक पाहता, ऑस्ट्रेलियन रोगनिवारक साठा प्रशासनाने, मधाला औषधाचा दर्जा दिला आहे व या देशात औषधीय मध जखमेवरील मलम म्हणून विकला जातो.

तुम्हाला अशा किती अन्‍नपदार्थांविषयी माहीत आहे की जे पोषक आणि स्वादिष्ट असण्यासोबतच औषधी गुणधर्माचे आहेत? म्हणूनच, गतकाळात मधमाश्‍या आणि मधमाशीपालकांचे संरक्षण करणाऱ्‍यांसाठी खास नियम का बनवण्यात आले, हे आपण समजू शकतो. ज्या झाडांवर मधमाश्‍यांनी पोळी बांधली आहेत अशी झाडे किंवा पोळी नष्ट करणे, कायद्याने एक गुन्हा होता. जो असे करेल त्याला खूप मोठा दंड भरावा लागत असे किंवा कधीकधी तर मृत्यूदंडाची शिक्षा होत असे. होय, मध हे मधमाश्‍यांकडून मानवासाठी एक देणगी आहे आणि निर्माणकर्त्याचा आदर करणारे आहे. (g०५ ८/८)

[तळटीपा]

^ मधमाश्‍या पोळे तयार करण्यासाठी वापरत असलेले मेण, माशीच्या शरीरातील विशिष्ट ग्रंथीत तयार होत असते. पोळ्यांतील षटकोणी आकाराच्या कोशांमुळे, एक मिलीमीटरच्या एक तृतीयांश जाडीच्या पोळ्याच्या पातळ भिंती, कोशाच्या वजनाच्या ३० पट वजन पेलू शकतात. मधमाशीचे पोळे खरोखरच एक अभियांत्रिकी नवलाई आहे!

^ शिशू बोटूलीझम (एकप्रकारची विषबाधा) होण्याचा धोका असल्यामुळे मध शिशूंना देण्याची शिफारस केली जात नाही.

^ मध गरम केल्यामुळे किंवा उन्हात राहिल्यामुळे त्यातील एंजाईमचा नाश होत असल्यामुळे, पाश्‍चरीकरण न झालेले मध औषधासाठी वापरले जाते.

[२२ पानांवरील चौकट/चित्र]

स्वयंपाकात मधाचा वापर

साखरेपेक्षा मध गोड असतो. त्यामुळे, साखरेऐवजी तुम्ही मधाचा उपयोग करणार असाल तर, तुम्ही जितकी साखर घेणार त्याऐवजी अर्धा किंवा तीन पावच घ्या. शिवाय मधात १८ टक्के पाणी असल्यामुळे तुमच्या पाककृतीनुसार तुम्हाला जितके पाणी घालावे लागणार आहे तेही कमी करा. तुमच्या पाककृतीत पाणी घालायचे नसेल तर मधाच्या प्रत्येक कपासाठी दोन चमचे मैदा घाला. तसेच बेक्ड पदार्थ बनवताना, मधाच्या प्रत्येक कपासाठी अर्धा लहान चमचा बेकींग सोडा घाला आणि ओव्हनचे तापमान १५ डिग्री सेल्सियसने कमी करा.

[चित्राचे श्रेय]

National Honey Board

[२२ पानांवरील चित्र]

मकरंद शोधत असलेली मधमाशी

[२२ पानांवरील चित्र]

मधाचे पोळे

[२२ पानांवरील चित्र]

मधमाश्‍यांची वसाहत

[२२ पानांवरील चित्र]

मधुपेटीतील एका चौकटीचे निरीक्षण करणारा मधमाशीपालक