व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! वाचल्यामुळे वाचलो

सावध राहा! वाचल्यामुळे वाचलो

सावध राहा! वाचल्यामुळे वाचलो

नियमितपणे सावध राहा! वाचणाऱ्‍या वाचकांना, त्यातील लेखांचे मोल समजते. पण एका जर्मन जोडप्यासाठी तर, फेब्रुवारी ८, २००१ अंकातील “प्रलंयकारी लाटा—मिथ्यकथा व वास्तविकता” हा लेख आणखीनच मौल्यवान ठरला. हे जोडपे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात थायलंडमधील खाओ लाक येथे सुटीसाठी आले होते.

फ्रँकनपोस्ट (झल्ब टॅगब्लाट) या जर्मन बातमीपत्रकाने या जोडप्याचा अनुभव सांगितला: “रोझ्वीटा जेझेल म्हणते: ‘आम्ही समुद्रात पोहत होतो.’ पोहून झाल्यावर जेझेल जोडपे कपडे बदलायला आपल्या हॉटेलवर गेले. कपडे बदलून ते पुन्हा बीचवर आल्यावर त्यांनी जे कापरं भरणारं दृश्‍य पाहिलं त्याविषयी रेनर जेझेल सांगतात: ‘दहा मिनिटांनंतर आम्ही जेव्हा बीचवर पुन्हा गेलो तेव्हा पाहिलं तर समुद्र गायब झाला होता.’ खडकापर्यंत म्हणजे किनाऱ्‍यापासून जवळजवळ सात किलोमीटर आत समुद्राचं पाणी गेलं होतं; आम्हाला फक्‍त समुद्राचा तळ तेवढा दिसत होता. ‘पाण्यात अजूनही पोहत असलेल्या सर्व लोकांना समुद्रानं आत ओढून नेलं होतं.’ सावध राहा! नियतकालिकातील एका लेखामुळे आमचा जीव वाचला, असे जेझेल जोडप्याचे म्हणणे आहे.” समुद्राचे पाणी असे अचानक आत जाते तेव्हा त्यानंतर सहसा सुनामी येते, असे त्यांनी वाचलेल्या लेखात म्हटले होते.

“जेझेल जोडप्याने जेव्हा दुरून येणारी मोठी लाट पाहिली तेव्हा ते लगेच मागे वळून पळू लागले. रेनर जेझेलला आठवते, की ही लाट सुमारे १२ ते १५ मीटर [४० ते ५० फूट] उंच होती. त्यांच्या आठवणीत राहिलेले सर्वात भयानक दृश्‍य म्हणजे, बीचवरील इतर पर्यटक आश्‍चर्यचकित होऊन समुद्राकडे फक्‍त पाहत उभे होते. ‘ते जागचे हालले नाहीत. मी त्यांना ओरडून सांगत होतो, की तुम्ही सुरक्षित ठिकाणी पळा पण कोणीही माझं ऐकलं नाही.’ त्यातील एकही पर्यटक वाचला नाही.”

जेझेल जोडप्याविषयी सांगताना वृत्तपत्राने असे म्हटले: “यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे, ते सुटीसाठी आले होते तेव्हा ते जवळच्या एका मंडळीत म्हणजे खाओ लाक पासून १४० किलोमीटर दूर असलेल्या मंडळीत जात असत. जेव्हा त्यांच्या सहविश्‍वासू बंधूभगिनींनी या आपत्तीविषयी ऐकले तेव्हा संपूर्ण मंडळी त्यांना पाहायला खाओ लाकला आली.”

आता जर्मनीत सुखरूप परतलेले हे जोडपे सावध राहा! नियतकालिकातील मौल्यवान माहितीबद्दल मनापासून आभार मानतात. शिवाय, ते थाय लोकांचे आणि विशेषकरून त्यांच्या आध्यात्मिक बंधूभगिनींचे आभार मानतात ज्यांनी त्यांना मदत केली व खरे ख्रिस्ती प्रेम दाखवले! (g०५ ७/२२)