व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आई “मुलांवर संस्कार करण्यात आईची भूमिका” या सुरेख लेखमालेसाठी धन्यवाद. (एप्रिल-जून २००५) या लेखमालांनी माझ्या हृदयाला स्पर्श केला आणि लवकरात लवकर माझ्या आईला फोन करण्यास मला प्रवृत्त केलं. माझ्या आईनं एकटीच्या हिंमतीनं मला आणि माझ्या भावाला लहानाचं मोठं केलं. आमच्या गरजा पुरवता याव्यात म्हणून तिनं पुढं शिक्षण घेतलं. आम्ही ख्रिस्ती सभा आणि क्षेत्र सेवा चुकवत नाहीए याची ती खात्री करायची. तिच्या श्रमांच चीज झालं. तिच्या उत्तम उदाहरणाची मला आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहे.

एम. एस., संयुक्‍त संस्थाने

मला आध्यात्मिक व नैतिक शिक्षण देण्याकरता माझ्या आईनं किती त्याग केलेत यांची आठवण मला या लेखमालांनी करून दिली. माझ्या वडिलांनी तिला भावनिक व आर्थिक आधार दिला नाही तरीपण तिनं मला यहोवावर प्रेम करायला शिकवलं. एवढेच नव्हे तर तिनं मला पूर्ण-वेळेची सेविकाही होण्याचं उत्तेजन दिलं. मला वाटतं, मी माझ्या आईच्या प्रयत्नांना खूप हलकं समजते, परंतु तिनं घेतलेल्या परिश्रमांची मी प्रशंसा केली पाहिजे हे या लेखमालांतून मला समजलं. मी तिच्यापासून खूप दूर आहे तरीपण तिचे आभार मानण्यासाठी मी तिला फोन केला!

सी. एच. के., कोरियाचे प्रजासत्ताक

माझे बाबा साक्षीदार नाहीत. माझ्या आईनं मला “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवलं. (इफिसकर ६:४) मी कधीकधी ज्या प्रकारे वागायचे त्यावरून तिला मला वाढवणं सोपं गेलं नसावं. मी आता २४ वर्षांची आहे. तिनं माझ्या बाबतीत हार मानली नाही उलट ती माझ्या अंतःकरणात बायबल सत्य रुजवण्याचा प्रयत्न करीत राहिली याबद्दल मी तिचे कृतज्ञापूर्वक आभार मानते.

डी. एम., इटली (g०५ १२/८)

टमाटे मी १२ वर्षांची आहे आणि मला “टमाटा एक बहुपयोगी ‘भाजी’” हा लेख खूप आवडला. (एप्रिल-जून २००५) यहोवानं तऱ्‍हेतऱ्‍हेच्या स्वादिष्ट भाज्या बनवल्या आहेत त्यामुळे मी त्याचे खूप आभार मानते. पट्टेदार टमाटेही असतात हे वाचून मला खूप आश्‍चर्य वाटलं! अशा मनोरंजक लेखांबद्दल धन्यवाद.

एम. एफ., लॅट्‌विया

मगर “मगरीशी तुम्ही दोस्ती करू शकता?” हा लेख वाचून मी खूप प्रभावीत झाले. (एप्रिल-जून २००५) मला मगर हा प्राणी नेहमी चमत्कारिक वाटतो. माझ्यासारखेच इतरही लोक आहेत ज्यांना मगर आवडते, याबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती वाचून मला आनंद झाला. मी यहोवाच्या नवीन जगाची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा आपल्याला मगरींविषयी आणखी पुष्कळ शिकायला मिळेल!

एल. आय., संयुक्‍त संस्थाने

आमच्या वाचकांचे मनोगत मला जन्मतःच हाडांचा आजार आहे. “मायलीनचा नवा चेहरा,” (जुलै-सप्टेंबर २००४) या लेखाविषयी “आमच्या वाचकांचे मनोगत” (एप्रिल-जून २००५) सदरात आलेली प्रेरणादायक पत्रे वाचल्यावर माझ्या डोळ्यांत पाणी आले. प्रत्येक पत्रात एक खास मुद्दा होता जो माझ्याकरता अर्थपूर्ण होता व ज्यातून मी लाभ घेऊ शकत होते.

एम. जे., ब्रिटन (g०५ १२/२२)

मुले अलिकडेच मी, “मुलांच्या जीवनातील सुरुवातीची वर्षे—व आईवडिलांची जबाबदारी” ही लेखमाला वाचली. (जानेवारी-मार्च २००५) हे लेख वाचून मी इतकी प्रभावीत झाले, की मी तुम्हाला पत्र लिहिण्याचं ठरवलं. मला एक मुलगी आहे आणि काही दिवसांतच तिला पाच वर्षं पूर्ण होतील. मला वाटायचं, की मी तिच्यासाठी एक आराखडा तयार केला पाहिजे जेणेकरून तिचा थोडासुद्धा वेळा वाया जाणार नाही. परंतु, या मासिकात असे म्हटले होते, की मुलांना काही वेळ स्वतःहून खेळायला दिल्यानं त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळते आणि मुलाची सामाजिक, मानसिक व भावनिक कक्षा वाढायला मदत होते, असे काही शिक्षणतज्ज्ञांना वाटते. धन्यवाद. कृपया अशा विषयांवर लेख छापत राहा.

आय. के., रशिया

ही लेखमाला वाचत असताना मला माझे अश्रू आवरता आले नाही. मला २९ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले जेव्हा मला बाळ झालं होतं. मी तरुण होते, पण मला यहोवाची ओळख नव्हती. मी पुष्कळ चुका केल्या. पण माझ्या दुःखाचे अश्रू आनंदाश्रू बनले. एक आठवड्यापूर्वी माझ्या मुलीला पहिलं बाळ झालं. माझ्या नातवाला यहोवावर प्रेम करणारे पालक आहेत आणि त्यांना अशा लेखांचा फायदा होईल यासाठी मी यहोवाचे खूप आभार मानते.

ई. एच., संयुक्‍त संस्थाने (g०५ ८/८)

[३० पानांवरील चित्र]

[३० पानांवरील चित्र]

मुलांवर संस्कार करण्यात

[३० पानांवरील चित्र]

आईची

[३० पानांवरील चित्र]

भूमिका