व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवाच्या संघटनेत तुमचे स्वागत असो”

“यहोवाच्या संघटनेत तुमचे स्वागत असो”

“यहोवाच्या संघटनेत तुमचे स्वागत असो”

यहोवाच्या साक्षीदारांबरोबर काही काळ सहवास राखणाऱ्‍या फिनलंडमधील एका कुटुंबाला बहुतेकांकडून विरोध सहन करावा लागला होता. लोक त्यांना म्हणत होते: “ते तुमचे पैसे घेतील.” काही त्यांना म्हणाले: “तुम्ही तुमचं घर गमवाल.” आणि अगदी त्याच वेळी, एका रात्री खोली गरम ठेवण्याची यंत्रणा जिथं होती त्या शेडला आग लागून पुष्कळ हानी झाली. ही दुर्घटना ऐन कडाक्याच्या हिवाळ्यात घडली.

विमा कंपन्यांनी पुनःबांधकाम साहित्याचा खर्च फार कमी दिला. त्यांच्या घराविषयी जे भाकीत केले होते ते या आगीमुळे जणू काय खरे वाटू लागले. कुटुंबातला पिता उसासे टाकून म्हणाला: “आम्ही खरंच खूप नाराज झालो.” ही दुर्घटना घडली त्याच्या अगदी तीन आठवड्यांनंतर या कुटुंबातल्या पती-पत्नीचा बाप्तिस्मा होणार होता. इतके सर्व होऊनही त्यांनी बाप्तिस्मा घेण्याचा आपला निर्णय बदलला नाही.

स्थानीय मंडळीला जाणवले, की त्यांच्यासाठी बायबल सल्ल्याचा अवलंब करण्याची एक संधी चालून आली होती. बायबलमध्ये म्हटले आहे: “मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी.” (१ योहान ३:१८) सहविश्‍वासू बंधूभगिनींनी शेडची दुरुस्ती करण्यासाठी लगेच योजना आखण्यास सुरुवात केली. फिनलंडमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराने याबाबतीत व्यावहारिक मार्गदर्शन पुरवले. बांधकामाची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली, बांधकामासाठी परवानगी प्राप्त करण्यात आली, लागणाऱ्‍या सर्व साहित्याची यादी तयार करण्यात आली आणि स्वयंसेवकांना पाचारण्यात आले.

आग लागल्यानंतर एका महिन्यातच कामाला अगदी तेजीने सुरुवात झाली. एके बुधवारी, स्थानीय साक्षीदारांनी शेडचे सर्व जळालेले भाग काढून टाकले. शुक्रवारी, इतर मंडळ्यांतील साक्षीदारांच्या मदतीने नव्या शेडचा सांगाडा तयार होऊ लागला होता. कुटुंबातला पिता शहरात काही कामासाठी गेला होता तेव्हा त्याची भेट एका स्थानीय अधिकाऱ्‍याशी झाली. पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून तुम्ही छप्परावर ताडपत्री टाकली का, असे या अधिकाऱ्‍याने पित्याला विचारले. पित्याने अभिमानाने सांगितले: “ताडपत्री तर टाकली नाही, पण छप्परावर ३० माणसं आहेत!”

शनिवारी बांधकाम होणाऱ्‍या ठिकाणी जवळजवळ ५० कष्टाळू आध्यात्मिक बंधूभगिनी आले होते. आपलाही या साहाय्याला हातभार लागत आहे म्हणून त्यांना खूप आनंद होत होता. मदत करायला आलेल्या शेजारीच राहणाऱ्‍या एका मनुष्याने असे उद्‌गार काढले: “काल रात्री मी, तुम्ही किती खास लोक आहात यावर विचार करत होतो. तुम्ही खरंच एकमेकांची किती काळजी घेता, एकमेकांना मदत करता.”

त्या संध्याकाळी सर्व काम पूर्ण झाले. उभे राहिलेले नवीन कोरे शेड, या कुटुंबाला पूर्वग्रहांमुळे इशारा देणाऱ्‍या लोकांना जणू काय एक रोखठोक उत्तर होते. एका मंडळीचे वडील या कुटुंबियाच्या पित्याबरोबर आपल्या कष्टाचे कसे चीज झाले होते ते पाहत उभे असताना त्या प्रसंगाची आठवण करून सांगतात:. “नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्या आपल्या बांधवाला प्रेमाने आलिंगन देऊन, ‘यहोवाच्या संघटनेत तुमचे स्वागत असो’ असे म्हणताना माझी भावना अवर्णनीय होती.” (g०५ १२/८)

[३१ पानांवरील चित्र]

आगीमुळे झालेले नुकसान

[३१ पानांवरील चित्र]

पुनःबांधकामाच्या वेळी