इतिहासातील सर्वात महत्त्वाची तारीख
इतिहासातील सर्वात महत्त्वाची तारीख
येशू ख्रिस्त ज्या दिवशी मरण पावला ती तारीख सर्वात महत्त्वाची आहे. येशूचा मृत्यू इतका महत्त्वपूर्ण का होता? अनेक कारणांसाठी.
येशू शेवटपर्यंत विश्वासू राहिला त्यावरून हे सिद्ध झाले की मनुष्य देवाला एकनिष्ठ राहू शकतो.
ख्रिस्ताच्या मृत्युमुळे मानवजातीतून काहींना स्वर्गामध्ये त्याच्याबरोबर सहराजे बनण्याची संधी मिळाली. शिवाय, इतर अनेकांना पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेण्यासाठी मार्ग खुला झाला.
येशूने त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री, तो देणार असलेले प्रेमळ मानवी बलिदान चित्रित करण्यासाठी, बेखमीर भाकर आणि लाल द्राक्षारस यांचा उपयोग केला. आणि त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “माझ्या स्मरणार्थ हे [“करीत राहा,” NW]. (लूक २२:१९) ही महत्त्वपूर्ण घटना तुमच्या आठवणीत राहील का?
यहोवाचे साक्षीदार तुम्हाला, त्यांच्याबरोबर येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याचे आमंत्रण देतात. या स्मारकविधीची या वर्षीची तारीख, बुधवार, एप्रिल १२, सूर्यास्तानंतर आहे. तुमच्या घराजवळ असलेल्या राज्य सभागृहात तुम्ही उपस्थित राहू शकता. या स्मारकविधीची नेमकी वेळ आणि ठिकाण कोठे आहे त्याची माहिती तुम्ही स्थानीय यहोवाच्या साक्षीदारांकडून मिळवू शकता. (g ३/०६)