उज्ज्वल भविष्य?
उज्ज्वल भविष्य?
भविष्याबद्दल जाणून घेण्याची ज्याला उत्कंठा नाही, असा माणूस विरळच असेल. पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी, किंवा आजपासून दहा वर्षांनंतर आपण कोठे असू, काय करत असू हे जाणून घ्यावेसे कोणाला वाटणार नाही? मोठ्या प्रमाणावर विचार केल्यास, आजपासून १०, २० किंवा ३० वर्षांनंतर हे जग कसे असेल?
तुम्ही भविष्याबद्दल आशावादी आहात का? कोट्यवधी लोक आहेत. या आशावादी लोकांना दोन गटांत विभागले जाऊ शकते: एकतर अशा लोकांचा गट की ज्यांच्याजवळ, भविष्यात चांगले दिवस येतील असा विश्वास बाळगण्याकरता भक्कम आधार आहे. दुसरा गट अशा लोकांचा आहे की जे उज्ज्वल भविष्याची आशा फक्त यासाठी बाळगतात, कारण दुसरा काही विचार करणे त्यांना अतिशय निराशाजनक वाटते.
अर्थात काही लोकांना भविष्याकडे पाहिल्यावर आशावादी असण्याचे कोणतेच कारण दिसत नाही. यांपैकी काहीजण सतत भविष्यातल्या संकटांविषयी भाकीत करत असतात. पृथ्वी ग्रहाचा कशाप्रकारे सर्वनाश होणार आहे याविषयी घोषित करण्यात जणू त्यांना एकप्रकारचा आनंदच मिळतो. आणि त्यांच्या मते या सर्वनाशात जवळजवळ सबंध मानवजातच नामशेष होईल असे ते सांगतात.
तुम्ही भविष्याबद्दल कसा विचार करता? तुम्हालाही भविष्यात फक्त विनाश व विध्वंसच दिसतो का? की कधी न कधी शांती व सुरक्षितता येईल असे तुम्हाला वाटते? जर शांती व सुरक्षितता येईल असे तुम्हाला वाटत असेल, तर कशाच्या आधारावर तुम्ही अशी आशा बाळगता—फक्त मनोकल्पनांच्या आधारावर की भक्कम पुराव्याच्या आधारावर?
सावध राहा! नियतकालिकाचे प्रकाशक, सर्वनाश भाकीत करणाऱ्या निराशावादी लोकांसारखे नाहीत. मनुष्यजात पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असे ते मानत नाही. उलट, मनुष्याने कधीही पाहिला नाही इतका चांगला काळ येत आहे असे बायबलमध्ये भक्कम पुराव्यानिशी सांगितले आहे. (g १/०६)
[५ पानांवरील चित्राचे श्रेय]
U.S. Department of Energy photograph ▸