व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या उत्कृष्ट तांबड्या रक्‍त कोशिका

तुमच्या उत्कृष्ट तांबड्या रक्‍त कोशिका

तुमच्या उत्कृष्ट तांबड्या रक्‍त कोशिका

दक्षिण आफ्रिकातील सावध राहा! लेखकाकडून

तुमच्या रक्‍तातील सर्वात जास्त आढळणाऱ्‍या पेशीमुळे रक्‍त लाल दिसते आणि त्यामुळे तिला तांबडी रक्‍त कोशिका म्हटले जाते. तुमच्या रक्‍ताच्या केवळ एका थेंबात अशा कोट्यवधी कोशिका असतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास या कोशिका डोनटसारख्या दिसतात. फरक इतकाच की डोनटच्या मध्ये बीळ असते, पण कोशिका मध्यभागी दबलेल्या असतात. प्रत्येक कोशिकेत कोट्यवधी रक्‍तारुण असतात. प्रत्येक रक्‍तारुण सुरेख तबकडीच्या आकाराचे असते; ते १०,००० हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सीजन आणि सल्फर परमाणूंचे तसेच लोहाच्या चार वजनदार परमाणूंचे मिळून बनलेले असते ज्यामुळे रक्‍त ऑक्सीजन वाहक बनते. रक्‍तारुणामुळे ऊतकांमधील कार्बन डायऑक्साईड काढून फुफ्फुसांतून बाहेर सोडणे सोपे होते.

तुमच्या तांबड्या रक्‍त कोशिकांचा आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे त्यांचे कलावेष्टन. या आश्‍चर्यकारक कलावेष्टनामुळे कोशिका पातळ आकारांत ताणता येत असल्यामुळे त्या तुमच्या शरीरातल्या अतिसूक्ष्म वाहिनीतूनही जाऊ शकतात व यामुळे तुमच्या शरीराचे प्रत्येक अंग जिवंत राहू शकते.

तुमच्या तांबड्या रक्‍त कोशिका तुमच्या अस्थिमज्जेत तयार होत असतात. एक नवीन कोशिका तुमच्या रक्‍तात उतरते तेव्हा ती तुमच्या हृदयातून १,००,००० पेक्षा अधिक वेळा अभिसृत होते. इतर कोशिकांप्रमाणे तांबड्या कोशिकांना केंद्रबिंदू नसतो. यामुळे त्यांच्यात अधिक प्रमाणात ऑक्सीजन साठू शकते व त्या वजनाला हलक्या होतात. यामुळे, तुमच्या हृदयाला कोट्यवधी तांबड्या कोशिका तुमच्या शरीरात अभिसृत करता येतात. पण कोशिकांना केंद्रबिंदू नसल्यामुळे त्या आपल्या आंतरिक अंगांचे नवीनीकरण करू शकत नाहीत. त्यामुळे १२० दिवसांनंतर तुमच्या तांबड्या रक्‍त कोशिका अशक्‍त होतात व त्यांच्यातील लवचिकता कमी कमी होत जाते. मोठ्या श्‍वेत रक्‍त कोशिका ज्यांना फेगोसायटेस अर्थात भक्षी कोशिका म्हटले जाते त्या जीर्ण झालेल्या तांबड्या रक्‍त कोशिकांचे भक्षण करून लोह परमाणू उत्सर्जीत करतात. विरल लोह परमाणू रक्‍तारुणांना चिकटतात; नवीन तांबड्या कोशिका बनवण्यासाठी रक्‍तारुण त्यांना अस्थिमज्जेत नेतात. दर सेकंदाला तुमच्या अस्थिमज्जेतून २० लाख ते ३० लाख नवीन तांबड्या रक्‍त कोशिका तुमच्या रक्‍तात उत्सर्जीत केल्या जातात!

तुमच्या कोट्यवधी तांबड्या कोशिका अचानक कार्य करायच्या थांबल्या तर काही मिनिटांतच तुम्ही मरण पावाल. यहोवा देवाच्या सृष्टीतील या उत्कृष्ट पैलूबद्दल आपण त्याचे किती आभार मानले पाहिजे; या पैलूमुळे आपण जिवंत राहू शकतो आणि जीवनाचा आनंद लुटू शकतो! “हे परमेश्‍वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे” असे ज्याने म्हटले त्या स्तोत्रकर्त्याला तुम्ही देखील निश्‍चितच आपली सहमती दर्शवाल.—स्तोत्र १३९:१, १४. (१/०६)

[३० पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

तांबड्या रक्‍त कोशिका

कलावेष्टन

रक्‍तारुण (मोठे केलेले)

ऑक्सीजन