प्रिय वाचकांनो
प्रिय वाचकांनो
या अंकापासून सावध राहाचा! चेहरामोहरा थोडा बदललेला दिसेल. काही गोष्टी नव्या असतील, पण बरेच काही आधीसारखेच असेल.
अनेक दशकांपासून सावध राहा! प्रकाशित करण्याचा जो उद्देश होता तोच आजही कायम आहे. पृष्ठ ४ वर सांगितल्याप्रमाणे, “हे प्रकाशन संपूर्ण कुटुंबाला ज्ञानप्रसार व्हावा म्हणून प्रकाशित केले जाते.” जागतिक घडामोडींवर नजर ठेवून, निरनिराळ्या संस्कृतींविषयी माहिती देऊन, सृष्टीतील अद्भुत चमत्कारांचे वर्णन करून, आरोग्यविषयक बाबींवर चर्चा करून किंवा विज्ञानातील जटील गोष्टी सामान्य माणसाकरता सोप्या भाषेत सांगून सावध राहा! यापुढेही वाचकांचे ज्ञानरंजन करत राहील व त्यांना आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टींविषयी जागरूक करत राहील.
ऑगस्ट २२, १९४६ (इंग्रजी) अंकात सावध राहाने! आपल्या वाचकवर्गाला वचन दिले होते, की “सत्याला जडून राहणे हे या नियतकालिकाचे सर्वोच्च ध्येय आहे व राहील.” या वचनाला जागून सावध राहाने! सत्य माहिती प्रकाशित करण्याचाच सदोदीत प्रयत्न केला आहे. हे ध्येय साध्य करण्याकरता कोणताही लेख प्रकाशित करण्याआधी, त्यातील माहिती अचूक आहे किंवा नाही याची खात्री करण्याकरता बरेच संशोधन केले जाते. पण ‘सत्याला जडून राहण्याचे’ वचन या नियतकालिकाने एका आणखी महत्त्वाच्या मार्गाने पूर्ण केले आहे.
सावध राहा! नियतकालिकाने नेहमीच वाचकांचे लक्ष बायबलकडे वेधले आहे. पण या अंकापासून यात पूर्वीपेक्षा जास्त बायबल-आधारित लेख प्रकाशित केले जातील. (योहान १७:१७) बायबलमधील व्यवहारोपयोगी सल्ला आपल्याला आजच्या काळात अर्थपूर्ण व यशस्वी जीवन जगण्यास कशी मदत करू शकतो हे यापुढेही सावध राहा! यातील लेखांत प्रकाशित केले जाईल. उदाहरणार्थ, “तरुण लोक विचारतात . . . ” आणि “बायबलचा दृष्टिकोन” या सदरांत बरेच बायबल-आधारित मार्गदर्शन पुरवले जाते व ही सदरे यापुढेही या नियतकालिकात नियमितपणे प्रकाशित केली जातील. शिवाय, सध्याचे अन्यायी जग नाहीसे होऊन जे शांतीपूर्ण नवे जग येण्याविषयी बायबल आश्वासन देते त्याकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचा सावध राहा! यापुढेही प्रयत्न करत राहील.—प्रकटीकरण २१:३, ४.
आणखी कोणत्या गोष्टी नव्या असतील? या अंकापासून सावध राहा! ज्या ८२ भाषांतून प्रकाशित होते, त्यांपैकी बहुतेक भाषांतून आता मासिक आवृत्तीच्या रूपात प्रकाशित केले जाईल. (पूर्वी यांपैकी बऱ्याच भाषांत ते पंधरवडा आवृत्तीत प्रकाशित केले जात होते) * १९४६ सालापासून नियमित सदराच्या रूपात प्रकाशित होत आलेले “जगावरील दृष्टिक्षेप” हे सदर यापुढेही दर अंकात प्रकाशित होईल, पण ते दोन पानांऐवजी एकाच पानाचे असेल. पृष्ठ ३१ वर आम्ही “उत्तर द्या पाहू” हे विशेष नवे सदर सुरू करत आहोत. या सदरात काय काय असेल व तुम्ही त्याचा कसा उपयोग करू शकाल?
काही त्रैमासिक अंकांत, “उत्तर द्या पाहू” हे सदर असेल. या पृष्ठावरील काही गोष्टी लहान मुलांना विशेष आवडतील; इतर काही विभागांचा उपयोग, बायबलचा सखोल अभ्यास करणारे वाचक आपल्या स्मरणशक्तीची परीक्षा पाहण्यासाठी करू शकतात. “हे इतिहासात केव्हा घडले?” हा विभाग तुम्हाला एका रेषेवर, बायबलमधील निरनिराळ्या व्यक्ती कोणत्या काळात जगत होत्या व निरनिराळ्या महत्त्वाच्या घटना केव्हा घडल्या हे सूचित करण्यास मदत करेल. “या अंकातून” या सदरात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या अंकातील लेखांत सापडतील, पण इतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्याच पृष्ठावर उलटी छापलेली आढळतील. ही उत्तरे वाचण्याआधी थोडेसे संशोधन करून, तुम्हाला काय शिकायला मिळाले हे तुम्ही इतरांनाही सांगू शकता. “उत्तर द्या पाहू” या नव्या सदराचा उपयोग तुम्ही कौटुंबिक चर्चेकरता किंवा इतर समूह चर्चेकरता करू शकता.
जवळजवळ ६० वर्षांपूर्वी सावध राहा! नियतकालिकाने आपल्या वाचकांना हे वचन दिले होते: “या नियतकालिकातील विषय जगाच्या कोणत्याही एका भागावर केंद्रित न करता आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. या नियतकालिकातील माहिती कोणत्याही देशात राहणाऱ्या कोणत्याही प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्तीला भावणारी असेल. . . . या नियतकालिकातील माहिती व साहित्य सर्व वयोगटातील वाचकांकरता माहितीपूर्ण, उद्बोधक व मनोरंजक असेल.” सावध राहाने! हे वचन पूर्ण केले आहे याला सबंध जगातील वाचक दुजोरा देतात. पुढेही आम्ही असेच करत राहू हे आश्वासन देऊ इच्छितो. (g १/०६)
प्रकाशक
[तळटीप]
^ परि. 6 सावध राहा! काही भाषांतून त्रैमासिक आवृत्तीच्या रूपात प्रकाशित होते. या लेखात उल्लेख केलेली नवीन वैशिष्ट्ये या त्रैमासिक आवृत्तीच्या सगळ्याच अंकांत असणार नाहीत.
[३ पानांवरील चित्रे]
१९१९ साली “द गोल्डन एज” हे नाव १९३७ मध्ये “कनसोलेशन” झाले आणि १९४६ मध्ये “सावध राहा!”
[४ पानांवरील चित्रे]
“सावध राहा!” नियतकालिकाने कित्येक वर्षांपासून आपल्या वाचकांचे लक्ष बायबलकडे वेधले आहे
[चित्राचे श्रेय]
बंदुका: U.S. National Archives photo; भूकेने व्याकूळ झालेले मूल: WHO photo by W. Cutting