व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

सप्टेंबर २००४ साली, आयव्हन वादळाने, मेक्सिकोच्या आखातात १५ मीटरपेक्षा अधिक उंच अशा २४ लाटा निर्माण केल्या. सर्वात मोठी लाट जी मोजण्यात आली ती २७.७ मीटर इतकी उंच होती.—सायन्स मासिक, यु.एस.ए.

गाडी चालवताना (चालकाचे हात मोकळे ठेवणारे उपकरण तो वापरत असला किंवा नसला तरी,) सेल फोनवर बोलल्यामुळे, गाड्यांची टक्कर होण्याचे आणि उपचाराकरता इस्पितळात जावे लागण्याचे प्रमाण चार पटीने वाढते. —बीएमजे, ब्रिटन. (४/०६)

पुढील दशकापर्यंत आशियाच्या १.२७ कोटी मुलांतील निम्मी मुले, सुरक्षित पाणी, अन्‍न, आरोग्य सेवा, शिक्षण आणि निवारा, यासारख्या त्यांच्या अगदी मूलभूत गरजांपासून वंचित होतील.—प्लॅन एशिया रिजनल ऑफिस, थायलंड. (५/०६)

अंत पाहणाऱ्‍या कामाच्या सवयी

“फोनवर मोठमोठ्याने बोलणे, स्पीकरफोनचा [वापर] करणे आणि कामाविषयीचे रडगाणे सतत गात राहणे, या आमच्या सहकर्मचाऱ्‍यांच्या अंत पाहणाऱ्‍या काही कामाच्या सवयी आहेत,” असे द वॉशिंग्टन पोस्टने म्हटले. सहकर्मचाऱ्‍यांना चीड आणणाऱ्‍या इतर सवयींपैकी, “निवडक लोकांशीच मैत्री करून आपला एक गट तयार करणे, कामाला उशिरा येणे, स्वतःशीच पुटपुटणे, क्युबिकल वरून एकमेकांशी बोलणे, गबाळेपणा, खाताना मच-मच आवाज करणे,” या काही सवयी आहेत. अशा वाईट सवयींमुळे कामगार उत्पादनाची देखील हानी होते. पण, संशोधकांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिलेल्या बहुतेकांनी कबूल केले की त्यांनी कधी, त्यांना चीड आणणाऱ्‍या व्यक्‍तीला जाऊन, तुम्हाला तिच्या सवयीचा राग येतो हे सांगितले नाही. “कसे सांगतील? कुरकूर करणारे तितकेच दोषी असतात,” असे बातमीपत्रकाने म्हटले.

शहरात लोकांची संख्या वाढली

“दोन वर्षांत, जगाच्या लोकसंख्येतील निम्मे लोक शहरात राहतील,” असे सीबीसी न्यूजने म्हटले. संयुक्‍त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, संयुक्‍त राष्ट्रांत, शहरांत राहणाऱ्‍यांची संख्या सर्वात जास्त आहे; १० लोकांपैकी जवळजवळ ९ लोक शहरात राहतात. फक्‍त ५५ वर्षांआधी न्यूयॉर्क आणि टोकियो ही दोनच शहरे अशी होती ज्यात एक किंवा त्याहूनही अधिक कोटी रहिवासी होते. आज, शहरांची संख्या २० झाली आहे आणि त्यात एक कोटीपेक्षा अधिक रहिवासी राहतात; यात, जकार्ता, मेक्सिको सिटी, मुंबई आणि साऊ पाऊलो यांचा समावेश होतो. संयुक्‍त राष्ट्रसंघाचे सेक्रटरी जेनरल कोफी अनान म्हणतात: “अशी झपाट्याने वाढ होऊ लागली तर बहुतेक राष्ट्रांत दूरगामी आर्थिक आणि सामाजिक बदल करावे लागतील.” (६/०६)

पाळकांविरुद्ध वाढता हिंसाचार?

“[ब्रिटनमध्ये] पाळक हा पेशा सर्वात जिकरीचा आहे,” असे लंडनच्या २००५ सालच्या डेली टेलिग्राफ मध्ये म्हटले होते. सरकारने २००१ साली, पाळकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखत घेतलेल्या पंचाहत्तर टक्के पाळकांनी गेल्या दोन वर्षांत, गैरवागणूक किंवा हल्ले सोसले होते, असे सर्व्हेत दिसून आले. १९९६ सालापासून निदान सहा पाळकांची तरी हत्या करण्यात आली आहे. देशांतील काही भागांत “चर्चला जाणाऱ्‍यांवर केल्या जाणाऱ्‍या हिंसेचे व धमक्यांचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत” असे बातमीपत्रकाने म्हटले. मर्झीसाईड नावाच्या एका ग्रामीण भागात, “१,४०० उपासना ठिकाणांपैकी दररोज एका ठिकाणी तरी हल्ला, चोरी किंवा जाळपोळीचे प्रकार घडतात.” (१/०६)

दोन प्रकारच्या इंधनावर चालणाऱ्‍या कार

ब्राझीलच्या शोरूममध्ये विकल्या जाणाऱ्‍या नवीन गाड्यांपैकी एक तृतीयांश गाड्या आता दोन प्रकारच्या इंधनांवर चालणाऱ्‍या आहेत, असे व्हेझा या मासिकात म्हटले होते. ही वाहने, पेट्रोल आणि उसापासून बनवलेली दारू यांवर किंवा कमीजास्त मात्रेत या दोन्हींच्या मिश्रणावर चालतात. सन २००३ ते २००४ पर्यंत, दारू मिश्रित इंधनाची विक्री ३४ टक्क्यांनी वाढली. पर्यावरण प्रदूषणाची चिंता असल्यामुळे हे दारू मिश्रित इंधन बनवण्यात आले आहे, अशातला भाग नाही. बहुतेक लोकांना आपल्या गाड्यांमध्ये दारू मिश्रित इंधन घालणे स्वस्त पडते. दोन प्रकारची इंधने वापरल्यामुळे “गिऱ्‍हाईकांना इंधनाच्या तुटवड्याच्या व इंधनाच्या किंमतीतील चढ-उताराच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. दारूचे भाव वाढले तर तुम्ही पेट्रोल वापरू शकता; पेट्रोलचे भाव वाढले तर तुम्ही दारू वापरू शकता,” असे ब्राझिलियन सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक, रफेल शायडेमान यांचे म्हणणे आहे. (६/०६)