व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लाखो हजर राहणार आहेत तुम्हीही राहाल का?

लाखो हजर राहणार आहेत तुम्हीही राहाल का?

लाखो हजर राहणार आहेत तुम्हीही राहाल का?

▪ कुठे हजर राहणार? यहोवाच्या साक्षीदारांच्या “मुक्‍तिसमय जवळ आला आहे!” या प्रांतीय अधिवेशनाला! मे महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात, संयुक्‍त संस्थानांत सुरू झालेल्या या शेकडो तीन-दिवसीय अधिवेशनांचे, आयोजन येणाऱ्‍या महिन्यांत संपूर्ण जगभरात करण्यात आले आहे. अलिकडील वर्षांत भरवण्यात आलेल्या २,९८१ प्रांतीय अधिवेशनांना जवळजवळ एक कोटी दहा लाख लोक हजर होते!

बहुतेक ठिकाणी सकाळी ९:३० वाजता एका राज्य संगीताने कार्यक्रम सुरू होतो. शुक्रवारी, “मुक्‍तिविषयी यहोवाने दिलेल्या अभिवचनांकडे लक्ष द्या” आणि ‘धावा करणाऱ्‍या दारिद्र्‌याला’ यहोवा सोडवतो” या विषयांवर भाषणे होतील. “आपल्या ‘सार्वकालिक मुक्‍तिसाठी’ यहोवाने केलेल्या तरतूदी” असे शीर्षक असलेले मुख्य भाषण, सकाळच्या कार्यक्रमातील शेवटले भाषण असेल.

शुक्रवार दुपारच्या कार्यक्रमात, “वृद्ध जनांची यहोवा कोमलतेने काळजी घेतो,” “यातनामय संकटांपासून मुक्‍ती,” तसेच “‘सार्वजनिक सेवा’ करण्यात देवदूतांची भूमिका” ही भाषणे होतील. “आपली ‘सोडवणूक’ करणारा यहोवा” या चार भागाच्या परिसंवादानंतर, कार्यक्रमाच्या शेवटल्या भाषणाचा विषय, “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार किंवा कोणतीही जिव्हा तुजवर चालणार नाही” असा असेल.

शनिवार सकाळच्या कार्यक्रमात तीन भागाचा परिसंवाद आहे. याचा विषय आहे: “सेवा करण्याचे ‘सोडू नका.’” यानंतर, “‘पारध्याच्या पाशापासून’ बचाव” आणि “‘देवाच्या गहन गोष्टींचा शोध’ घेणे” ही भाषणे असतील. बाप्तिस्मा घेण्यास पात्र असलेल्यांसाठी एक भाषण दिले जाईल आणि त्यानंतर सकाळच्या कार्यक्रमाची सांगता होईल.

शनिवार दुपारच्या कार्यक्रमात: “आरोग्याच्या काळजीविषयी शास्त्रवचनीय दृष्टिकोन बाळगा,” “तुमच्या जीवनावर कोणत्या आत्म्याचे वर्चस्व आहे?,” “विवाहातील ‘तीनपदरी दोरी’ टिकवून ठेवा,” आणि “तरुणांनो, ‘आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा’” या भाषणांचा समावेश असेल. “तुम्ही यहोवाचा दिवस लक्षात ठेवून जगत आहात का?” या शेवटल्या भाषणात, आपल्या दिवसांत लागू होणारा व्यावहारिक सल्ला दिला जाईल.

रविवार सकाळच्या कार्यक्रमात एक परिसंवाद असेल ज्याचा विषय आहे: “स्वर्गाचे राज्य . . . च्या सारखे आहे.” यांतील चारही भाषणांत येशूच्या दृष्टांतांची थोडक्यात चर्चा करण्यात येईल.

सकाळच्या कार्यक्रमात आणखी एक भाषण असेल जे अधिवेशनाचे वैशिष्ट्य असलेल्या नाटकावर आधारित असेल. यानंतर बायबलच्या पहिले राजे पुस्तकाच्या १३ व्या अध्यायाच्या आधारावर बसवलेले एक रंगीत नाटक सादर केले जाईल. अधिवेशनाचा शेवटला कार्यक्रम रविवारी दुपारी असेल. “देवाच्या राज्याकरवी मुक्‍ती मिळण्याची वेळ जवळ आली आहे!” असे या जाहीर भाषणाचे शीर्षक असेल.

या अधिवेशनाला हजर राहण्यासाठी आतापासूनच योजना करा. तुम्हाला जवळ पडणारे ठिकाण कोणते आहे हे पाहण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहाशी संपर्क साधा किंवा या मासिकाच्या प्रकाशकांना लिहा. या मासिकाबरोबर येणारे आणखी एक मासिक ज्याचे नाव आहे टेहळणी बुरूज याच्या मार्च १ च्या अंकात भारतात होणाऱ्‍या सर्व अधिवेशनांचे पत्ते दिले आहेत. (६/०६)