व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तर द्या पाहू

उत्तर द्या पाहू

उत्तर द्या पाहू

या चित्रात काय चूक आहे?

उत्पत्ति ३:१-५ यातील बायबल अहवालाशी जुळत नसलेल्या तीन गोष्टी ओळखा.

१. ....................

२. ....................

३. ....................

चर्चा करा: बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नका, असे यहोवाने आदाम आणि हव्वेला का सांगितले? यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे का महत्त्वाचे आहे, असे तुम्हाला वाटते?

हे इतिहासात केव्हा घडले?

या सृष्टीची घटना कोणत्या ‘दिवशी’ घडली ते दाखवण्यासाठी रेघ ओढा.

१ ला दिवस २ रा दिवस ३ रा दिवस ४ था दिवस ५ वा दिवस ६ वा दिवस ७ वा दिवस

४. उत्पत्ति १:१४-१६

५. उत्पत्ति १:२४

६. उत्पत्ति १:२०, २१

मी कोण आहे?

७. मी शहर बांधणारा सर्वात पहिला नोंदलेला मनुष्य आहे.

मी कोण आहे?

८. हव्वेनंतरची मी पहिली स्त्री आहे जिचा बायबलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

या अंकातून

या प्रश्‍नांची उत्तरे द्या आणि गाळलेले बायबल वचन (वचने) घाला.

पृष्ठ ५ बायबल काळातही कोणता प्राणी त्याच्या चढण्याच्या क्षमतेसाठी ज्ञात होता? (नीतिसूत्रे ३०:____)

पृष्ठ ९ यहोवा स्तुतीस पात्र का आहे? (प्रकटीकरण ४:____)

पृष्ठ २० उत्पत्तिच्या पुस्तकात स्पष्टपणे दिसत असलेले प्रगत ज्ञान कशाचा पुरावा आहे? (२ तीमथ्य ३:____)

पृष्ठ २५ “आपआपल्या समयी” होणारी हरएक वस्तू त्याने कशी बनवली आहे? (उपदेशक ३:____)

मुलांनो, चित्र शोधा पाहू

तुम्हाला ही चित्रे या मासिकात कोठे दिसतात का? प्रत्येक चित्रात काय काय दाखवले आहे ते स्वतःच्या शब्दांत सांगा.

(उत्तरे पृष्ठ १२ वर)

पृष्ठ ३१ ची उत्तरे

१. सर्प हव्वेशी बोलला, आदामाशी नव्हे.—उत्पत्ति ३:१.

२. आदाम आणि हव्वेला एदेन बागेच्या बाहेर काढल्यानंतरच मुले झाली.—उत्पत्ति ४:१.

३. आदाम आणि हव्वा बागेत असताना नग्न होते.—उत्पत्ति २:२५.

४. “दिवस” ४.—उत्पत्ति १:१४-१६, १९.

५. “दिवस” ६.—उत्पत्ति १:२४, ३१.

६. “दिवस” ५.—उत्पत्ति १:२०, २१, २३.

७. काईन.—उत्पत्ति ४:१७. ८. आदा.—उत्पत्ति ४:१९.

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

First circle: Breck P. Kent; second circle: © Pat Canova/Index Stock Imagery