व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने उत्क्रांतीद्वारे सजीव सृष्टीची निर्मिती केली का?

देवाने उत्क्रांतीद्वारे सजीव सृष्टीची निर्मिती केली का?

देवाने उत्क्रांतीद्वारे सजीव सृष्टीची निर्मिती केली का?

“हे प्रभो, [“यहोवा,” NW] आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटीकरण ४:११.

चार्ल्स डार्विन याचा उत्क्रांती सिद्धान्त लोकप्रिय झाल्यानंतर काही काळातच, बरेच तथाकथित ख्रिस्ती पंथ, एकीकडे त्यांचा देवावर असणारा विश्‍वास आणि दुसरीकडे उत्क्रांती सिद्धान्त या दोहोंची सांगड घालण्याचा प्रयत्न करू लागले.

आज बहुतेक प्रमुख “ख्रिस्ती” पंथ असे मानायला तयार आहेत की देवाने उत्क्रांतीने सजीव सृष्टीची निर्मिती केली असावी. काहीजण असे शिकवतात की देवाने स्वतःच अशी व्यवस्था केली जेणेकरून निर्जीव रसायनांपासून विश्‍वातील सर्व सजीव वस्तू क्रमाक्रमाने उत्पन्‍न झाल्या आणि शेवटी मनुष्यजात विकसित झाली. देववादी उत्क्रांती म्हटलेल्या या शिकवणुकीचा जे पुरस्कार करतात त्यांचे असे म्हणणे आहे की ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मात्र देवाने त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला नाही. इतरांचे असे म्हणणे आहे की देवाने वनस्पतींच्या व प्राण्यांच्या बहुतेक जातींची उत्क्रांती होऊ दिली पण ही प्रक्रिया चालू राहावी म्हणून त्याने अधूनमधून हस्तक्षेप केला.

सांगड घालण्याचा प्रयत्न यशस्वी?

उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचा खरोखरच बायबलच्या शिकवणुकीशी मेळ बसतो का? जर उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा असेल तर बायबलमध्ये सांगितलेल्या आदाम या पहिल्या मानवाबद्दलचा अहवाल, खरोखरच घडलेला इतिहास न मानता निव्वळ एक नीतिकथा होती असे म्हणावे लागेल. (उत्पत्ति १:२६, २७; २:१८-२४) पण येशूने उत्पत्तिच्या अहवालाकडे या दृष्टीने पाहिले का? येशूने म्हटले: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, ह्‍याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:४-६.

या ठिकाणी येशूने उत्पत्तिच्या २ ऱ्‍या अध्यायात वर्णन केलेल्या निर्मितीच्या अहवालातले शब्द उद्धृत केले. तेथे वर्णन केलेला पहिला विवाह केवळ एक काल्पनिक कथा आहे असे जर येशूचे मत असते, तर त्याने विवाहाच्या पावित्र्याविषयी शिकवताना या अहवालाचा संदर्भ दिला असता का? नाही. येशूने उत्पत्तिच्या अहवालाचा संदर्भ दिला कारण ती प्रत्यक्षात घडलेली हकिकत अर्थात खरा इतिहास आहे हे त्याला माहीत होते.—योहान १७:१७.

येशूच्या शिष्यांनाही उत्पत्तिमधील निर्मितीविषयीच्या अहवालावर विश्‍वास होता. उदाहरणार्थ, लूकच्या शुभवर्तमानात येशूची थेट आदामापासूनची वंशावळ दिलेली आहे. (लूक ३:२३-३८) जर आदाम एक काल्पनिक पुरुष होता तर मग या वंशावळीतले इतर पुरुषही काल्पनिक होते असे मानावे का? जर या वंशावळीतला मूळपुरुषच काल्पनिक असता तर मग दाविदाच्या कुळातून जन्मलेला मशीहा आपणच आहोत हा येशूने केलेला दावा कितपत विश्‍वसनीय ठरला असता? (मत्तय १:१) शुभवर्तमान लिहिणाऱ्‍या लूकने म्हटले की मी “सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध” केला. साहजिकच, त्याचाही उत्पत्तिच्या अहवालावर विश्‍वास होता.—लूक १:३.

प्रेषित पौलाला येशूवर जो विश्‍वास होता तो उत्पत्तिमधील अहवालावर त्याला असलेल्या विश्‍वासाशी निगडीत होता. त्याने लिहिले: “मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानहि आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.” (१ करिंथकर १५:२१, २२) जर आदाम खरोखरच सबंध मानवजातीचा पूर्वज नसता; आणि त्या एका मनुष्याद्वारेच “पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले,” हे जर खरे नसते, तर मग वारशाने मिळालेल्या पापाचे दुष्परिणाम नाहीसे करण्याकरता येशूला मरण्याची काय गरज होती?—रोमकर ५:१२; ६:२३.

उत्पत्तिच्या पुस्तकातील निर्मितीच्या अहवालावर आघात केल्यास, ख्रिस्ती विश्‍वासाचे आधारस्तंभच ढासळून पडतील. तेव्हा, उत्क्रांतीचा सिद्धान्त व ख्रिस्ताची शिकवण यात कसलाही मेळ नाही. या दोन विश्‍वासांत सांगड घालण्याचा प्रयत्न केल्यास, ‘प्रत्येक शिकवणरुपी वाऱ्‍याने हेलकावणारा व फिरणारा असा’ क्षीण विश्‍वास उत्पन्‍न होईल.—इफिसकर ४:१४.

भक्कम पायावर आधारलेला विश्‍वास

शतकानुशतके बायबलची टीका व त्यातील शिकवणुकींवर हल्ले होऊनही, ते अबाधित राहिले आहे. बायबलमधील मजकूर खरा आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. इतिहास, आरोग्य, व विज्ञान या विषयांवर बायबलमध्ये जे काही उल्लेख आढळतात ते सगळे विश्‍वसनीय असल्याचे पुन्हा पुन्हा उजेडात आले आहे. मानवी संबंध, नाती गोती यांसंबंधात बायबलमध्ये आढळणारा संदेश भरवशालायक आणि कोणत्याही कालखंडात उपयोगी पडेल असा आहे. हिरवेगार गवत ज्याप्रमाणे उगवते आणि मग पाहता पाहता सुकून जाते त्याप्रमाणे मानवी तत्त्वज्ञान आणि सिद्धान्त येतात व जातात, पण देवाचे वचन “सर्वकाळ कायम राहते.”—यशया ४०:८.

उत्क्रांतीचा सिद्धान्त हा केवळ एक शास्त्रीय सिद्धान्त नाही. तर ते एक मानवनिर्मित तत्त्वज्ञान आहे जे अनेक दशकांपूर्वी उदयास आले व त्याचा बराच प्रसार झाला. पण अलीकडच्या वर्षांत, डार्विनच्या मूळ उत्क्रांती सिद्धान्ताचीच उत्क्रांती होताना, अर्थात त्यात बरेच बदल होताना दिसत आहेत. पण का? निसर्गात दिसून येणाऱ्‍या सजीव सृष्टीत कल्पक रचना दिसून येतात, हे सिद्ध करणारा अधिकाधिक पुरावा उपलब्ध होत चालला आहे. याकरता काही न काही स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात डार्विनच्या सिद्धान्तात बरेच फेरबदल केले जाऊ लागले आहेत. या विषयाचे तुम्ही अधिक खोलात शिरून परीक्षण करावे असे आम्ही सुचवू इच्छितो. याकरता, सदर अंकातील इतर लेख कृपया वाचा. शिवाय, या पृष्ठावर व पृष्ठ ३२ वर दाखवलेली पुस्तकेही तुम्ही वाचू शकता.

या विषयाचे सखोल परीक्षण केल्यानंतर कदाचित तुम्हाला जाणवेल की बायबलमध्ये गतकाळातील इतिहासाविषयी जे सांगितले आहे त्यावर तुमचा भरवसा वाढला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बायबलमधील भविष्याविषयीच्या प्रतिज्ञांवर तुमचा विश्‍वास दृढ होईल. (इब्री लोकांस ११:१) शिवाय, ज्याने ‘आकाश व पृथ्वी निर्माण केली’ त्या यहोवा देवाची स्तुती करण्यासही कदाचित तुम्ही प्रेरित व्हाल.—स्तोत्र १४६:६. (९/०६)

अतिरिक्‍त वाचनाकरता सुचवलेले साहित्य

सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकात बायबलची विश्‍वासार्हता पटवून देणारी काही विशिष्ट उदाहरणे दिलेली आहेत

Is There a Creator Who Cares About You? या पुस्तकातून आणखी सविस्तर वैज्ञानिक पुराव्यांचे परीक्षण करा आणि आपल्याविषयी काळजी असणारा सृष्टीकर्ता अस्तित्वात असताना जगात एवढे दुःख का आहे हे जाणून घ्या

बायबल नेमके काय शिकवते? देवाचा या पृथ्वीबद्दल काय उद्देश आहे? या प्रश्‍नाचे उत्तर सदर पुस्तकाच्या ३ ऱ्‍या अध्यायात दिले आहे

[१० पानांवरील संक्षिप्त आशय]

उत्पत्तिच्या पुस्तकातील निर्मितीविषयीच्या अहवालावर येशूचा विश्‍वास होता. त्याचा हा विश्‍वास निराधार होता का?

[९ पानांवरील चौकट]

उत्क्रांती म्हणजे काय?

एका व्याख्येनुसार, “उत्क्रांती” म्हणजे “एका विशिष्ट दिशेने बदल होत जाण्याची प्रक्रिया.” पण या शब्दाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, निर्जीव वस्तूंमध्ये झालेल्या मोठ्या बदलांचे, अर्थात विश्‍वाच्या विकासाचे वर्णन करण्याकरता या शब्दाचा उपयोग केला जातो. शिवाय सजीव सृष्टीतील निरनिराळ्या वस्तूंमध्ये अर्थात, वनस्पती व प्राण्यांमध्ये त्यांच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता जे सूक्ष्म बदल होतात त्यांचे वर्णन करण्याकरताही उत्क्रांती हा शब्द वापरला जातो. पण या शब्दाचा सर्वात सामान्यपणे एका सिद्धान्ताचे वर्णन करण्याकरता उपयोग केला जातो. या सिद्धान्तानुसार सजीव सृष्टी ही निर्जीव रसायनांपासून उत्पन्‍न झाली; या रसायनांपासून, प्रजोत्पादन करणाऱ्‍या सजीव पेशी निर्माण झाल्या आणि हळूहळू अधिकाधिक गुंतागुंतीची रचना असणारे प्राणी विकसित होत गेले. तसेच मनुष्य हा या प्रक्रियतून उत्पन्‍न झालेला सर्वात बुद्धिमान प्राणी आहे असे म्हटले जाते. या लेखात “उत्क्रांती” हा शब्द या तिसऱ्‍या अर्थाने, अर्थात या सिद्धान्ताच्या संदर्भात वापरण्यात आला आहे.

[१० पानांवरील चित्राचे श्रेय]

अंतराळाचे छायाचित्र: J. Hester and P. Scowen (AZ State Univ.), NASA