अडचणीत असलेल्या एका तरुणीला मदत
अडचणीत असलेल्या एका तरुणीला मदत
सिबिया ही मेक्सिकोतील तेरा वर्षांची शाळकरी मुलगी, आपल्या वर्गातील एका मुलीला नेहमी शाळेत रडत येताना पाहायची. सिबियाने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्नही केला. एक दिवशी या मैत्रीणीने सिबियावर विश्वास ठेवून तिला सांगितले की, तिचे वडील दारू पिऊन तिच्या आईला मारतात.
सिबिया सांगते: “तिने मला म्हटले की, तिला जगण्याची मुळीच इच्छा नाही, कारण तिला वाटते की, तिच्यावर कोणीही प्रेम करत नाही आणि तिला खूप एकटं-एकटं वाटतं. एकदा तर तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. मी तिला सांगितले की, एक व्यक्ती आहे जी तिच्यावर खूप प्रेम करते, या जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती! मग मी तिला यहोवाचा मानवजातीसाठी जो उद्देश आहे त्याविषयी सांगितलं.”
नंतर सिबियाने तिला तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे हे पुस्तक दिले आणि दररोज मधल्या सुटीत तिच्यासोबत याचा अभ्यास करू लागली. हळूहळू या मुलीमध्ये बदल होत गेले आणि ती इतरांपासून दूर राहण्यापेक्षा हसतखेळत राहू लागली. तिने सिबियाला लिहिलेल्या पत्रात, म्हटले: “तुझी मैत्री आणि सहानुभूती यासाठी मी तुझी आभारी आहे. मला बहीण असावी असं सतत वाटायचं तू तिच्यासारखीच आहेस. आता मला हेही माहीत आहे की, कोणाला तरी, म्हणजे यहोवाला माझी काळजी आहे.”
कदाचित तुम्हाला अशी एखादी तरुण व्यक्ती माहीत असेल जिला तरूणांचे प्रश्न या पुस्तकापासून फायदा होईल. या पुस्तकात एकूण ३९ अध्याय असून “मला खरे मित्र कसे बनवता येतील?,” “विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?,” आणि “खरे प्रेम असल्याचे मी कसे ओळखावे?” यासारखे विषय आहेत. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर सोबत दिलेले कूपन भरा आणि मासिकाच्या पृष्ठ ५ वरील कोणत्याही उचित पत्त्यावर ते पाठवा. (g १०/०६)
□ कसल्याही बाध्यतेविना, मी इथे दाखवलेल्या पुस्तकाबद्दल मला अधिक माहिती पाठवावी म्हणून विनंती करत आहे.
□ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.