व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

“गेल्या ५०० वर्षांमध्ये मानवी कार्यहालचालींमुळे ८४४ प्राण्यांच्या जाती लोप पावल्या आहेत.”—आय.यू.सी.एन., जागतिक संरक्षण संघ, स्वित्झर्लंड.

सरकारी वृत्तानुसार ब्रिटिश लोकसंख्येपैकी ६ टक्के स्त्रिया व पुरुष समलिंगी आहेत. २००५ साली संमत झालेल्या कायद्यांनुसार “समलिंगी जोडप्यांना ‘लग्न’ करण्याची परवानगी” असून, त्यांना [कायद्याने] विषमलिंगी विवाहित जोडप्यांसारखेच हक्क दिलेले आहेत.—द डेली टेलिग्राफ, इंग्लंड. (g ११/०६)

“एकूण विवाहित जोडप्यांपैकी जवळजवळ ५० टक्के जोडपी ‘आर्थिक बाबींत अविश्‍वासू’ असल्याचे अर्थात केलेल्या खर्चाविषयी आपल्या साथीदाराला खोटे सांगितल्याचे कबूल करतात.”—द वॉल स्ट्रीट जर्नल, यु.एस.ए.

ओशेनिया, वानुआतू येथील टिग्वा बेटावरील लाटेऊ खेडे हे बहुधा बदलत्या हवामानामुळे निर्मनुष्य झालेले, किंवा दुसरीकडे हलवण्यात आलेले पहिले खेडेगाव असावे. या गावातील घरांची वारंवार “वादळी लाटांमुळे नासधूस” झाली होती.—वानुआतू न्यूज, वानुआतू. (g १२/०६)

बारा वर्षे तुरुंगवास—का?

पूर्व आफ्रिकेतील सावा, इरिट्रिया येथील तीन यहोवाच्या साक्षीदारांना गेल्या बारा वर्षांपासून तुरुंगवासात ठेवले आहे. त्यांच्याविरुध्द कसलाही आरोप नाही शिवाय कोणताही खटला दाखल केलेला नाही. त्यांच्या नातेवाईकांना देखील त्यांना भेटण्याची परवानगी नाही. कोणत्या कारणासाठी? कारण त्यांनी लष्करी सेवेमध्ये भाग घेण्यास नकार दिला होता. इरिट्रियन कायद्यानुसार, धार्मिक कारणांमुळे लष्करी सेवेमध्ये भाग घेण्यास नकार देण्याची मुभा नाही. तरुणांना अटक केल्यावर त्यांना सैनिकी छावणी मध्ये ठेवले जाते. अनेकदा त्यांना खूप मारहाण केली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या यातना दिल्या जातात. (g १०/०६)

कामावरील उध्दटपणा

द वॉल स्ट्रीट या मासिकानुसार, “कामावरील उध्दटपणामुळे वेळेचे नियोजन, श्रम, आणि कामाचे कौशल्य या गोष्टींचे नुकसान होते.” जवळजवळ तीन हजार लोकांच्या सर्वेक्षणातून हे दिसून आले की, ९० टक्के लोकांना “सहकर्मचाऱ्‍यांकडून उध्दटपणाचा अनुभव आला आहे.” यांच्यापैकी ५० टक्के लोक म्हणाले की, “अशा घटनांनी झालेल्या मनस्तापामुळे त्यांच्या कामाचा वेळ वाया गेला,” “२५ टक्के लोकांनी पूर्वीइतक्या उत्साहाने काम करण्याचे थांबवले,” आणि आठातील एकाने नोकरी सोडून दिली. उत्तर कॅलिफोर्निया मधील व्यवस्थापन प्राध्यापिका ख्रिस्टीन पोरॅथ यांच्या मते, “निरुत्साहीपणे काम करणारे कामगार, अनुपस्थिती, आणि चोरी यांसारखी लक्षणे, मुळात ती संघटना उध्दटपणाच्या समस्येशी संघर्ष करत असल्याचा पुरावा असू शकतात” असे हे मासिक सांगते. (g ११/०६)

हवा उबदार ठेवण्याकरता नवा पर्याय

स्पॅनिश वृत्तपत्र एल पाईस यातील वृत्तानुसार, “सेंट्रल हीटींग अर्थात इमारतीतील हवा उबदार ठेवण्याची यंत्रणा चालवण्याकरता आता ऑलिव्हच्या बिया इंधनाकरता वापरल्या जातील.” आजच्या तारखेला माद्रिद शहरातल्या कमीतकमी ३०० घरांत हवा उबदार ठेवण्याची व गरम पाणी पुरवण्याची यंत्रणा याच इंधनावर चालवली जात आहे. ऑलिव्हच्या बिया स्वस्त असून हे इंधन वापरल्याने तेलापेक्षा ६० टक्के आणि कोळशापेक्षा २० टक्के कमी खर्च येतो. शिवाय प्रदूषणाची भीती नाही कारण नैसर्गिक विघटन क्रियेत जितके कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडले जाते तितकेच हे इंधन जाळतानाही सोडले जाते. आणखी एक फायदा म्हणजे हे इंधन सहज उपलब्ध होण्यासारखे आहे. कारण ऑलिव्ह फळापासून तेल काढल्यानंतर बिया शिल्लक राहतात आणि स्पेन तर ऑलिव्ह तेलाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश म्हणून विख्यात आहे. (g १०/०६)

शतायुषी असणाऱ्‍यांची संख्या वाढत आहे

न्यू सांयटीस्ट मासिकानुसार, वयाच्या शंभर वर्षांपर्यंत जगणे ही काही आश्‍चर्याची गोष्ट राहिलेली नाही. जगभरात, सध्या जवळजवळ २,००,००० पेक्षा अधिक लोकांचे वय शंभरहून जास्त आहे. तसेच या मासिकानुसार यामधील ६६ जन त्यांच्या ११० व्या वाढदिवसापर्यंत पोहंचले आहेत. परंतु, न्यू सांयटीस्ट मासिक हे पण कबूल करते की, दिर्घायुष्य असल्याचा दावा करणे हे कधीकधी कठीण असेल, परंतु, “भरवसालायक नोंदणीची उणीव असल्यामुळे शतायुषी असणाऱ्‍यांची संख्या कदाचित ४५० असू शकते.” (g १२/०६)