व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला खरोखरच आपली काळजी आहे!

देवाला खरोखरच आपली काळजी आहे!

देवाला खरोखरच आपली काळजी आहे!

एदेन बागेत सुरू झालेल्या बंडाळीला देवाने ज्या पद्धतीने हाताळले त्यावरून त्याला आपल्या प्रत्येकावर किती प्रेम आहे व आपल्या भवितव्याची किती काळजी आहे हे दिसून येते. देवाला खरोखरच आपली काळजी आहे हे पुढील पुराव्यांवरून दिसून येते. तेव्हा कृपया या पुराव्यांचा विचार करा आणि तुमच्या बायबलमधून दिलेली वचने काढून वाचा.

❖ त्याने आपल्याला राहण्याकरता पृथ्वी ग्रह दिला आहे जो निसर्ग सौंदर्याने नटला आहे. यावर वैविध्यपूर्ण व भुलवून टाकणारी प्राणी सृष्टी आहे. तसेच पृथ्वी आपल्याला पीकही देते.—प्रेषितांची कृत्ये १४:१७; रोमकर १:२०.

❖ त्याने आपल्याला अद्‌भुत शरीर दिले आहे ज्यामुळे आपण दैनंदिन जीवनाच्या अनुभवांचा आनंद लुटू शकतो. उदाहरणार्थ, आपण रुचकर अन्‍नाचा स्वाद घेऊ शकतो, मन हरखून टाकणारा सूर्यास्त पाहू शकतो, लहान मुलांच्या निखळ हसण्याचा आवाज ऐकू शकतो आणि आपल्या प्रिय व्यक्‍तीचा कोमल स्पर्श अनुभवू शकतो.—स्तोत्र १३९:१४.

❖ तो आपल्याला सुज्ञ मार्गदर्शन देतो जे आपल्याला समस्यांना व दबावांना तोंड देण्यास मदत करते.—स्तोत्र १९:७, ८; ११९:१०५; यशया ४८:१७, १८.

❖ त्याने आपल्याला आतासाठी व भवितव्यासाठी देखील अद्‌भुत आशा दिली आहे. पृथ्वीवर नंदनवनात चिरकाल जगण्याची आशा आणि आपल्या मृत प्रिय जनांचे पुनरुत्थान पाहण्याची आशा.—लूक २३:४३; योहान ५:२८, २९.

❖ आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळावी म्हणून त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यासाठी मरण्याकरता पाठवले.—योहान ३:१६.

❖ त्याने स्वर्गामध्ये मशिही राज्य स्थापन केले आहे आणि हे राज्य लवकरच पृथ्वीवरील कारभाराची सूत्रे आपल्या हातात घेणार असल्याचा भरपूर पुरावा दिला आहे.—यशया ९:६, ७; मत्तय २४:३, ४, ७; प्रकटीकरण ११:१५; १२:१०.

❖ तो आपल्याला, प्रार्थनेद्वारे आपले मन त्याच्यापुढे मोकळे करण्याचे आमंत्रण देतो. आणि आपण प्रार्थना करतो तेव्हा तो खरोखरच आपल्या विनंत्या ऐकतो.—स्तोत्र ६२:८; १ योहान ५:१४, १५.

❖ त्याला मानवांबद्दल गाढ प्रेम व काळजी आहे याची तो वारंवार शाश्‍वती देतो.—१ योहान ४:९, १०, १९. (g ११/०६)