व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पहिल्या शतकातील मनोरंजन जगत

पहिल्या शतकातील मनोरंजन जगत

पहिल्या शतकातील मनोरंजन जगत

दक्षिण इटलीतील दोन शहरांतील प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये झालेल्या दंगलीत अनेक लोक जखमी झाले. पुष्कळ लोकांचा मृत्यू देखील झाला. यात लहान मुलांचा देखील समावेश होता. ज्या प्रेक्षागृहात ही दुर्घटना झाली ते दहा वर्षांपर्यंत बंद ठेवण्याचा हुकूम अधिकाऱ्‍यांनी दिला.

अशाप्रकारच्या दंगलींच्या बातम्या आजच्या बातमीपत्रात विचित्र वाटत नाहीत, कारण आजकाल ही अगदी सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. परंतु ही विशिष्ट घटना सुमारे २,००० वर्षांपूर्वी, सम्राट निरोच्या कारकीर्दीत घडली होती. पाँपेई शहरातील एका प्रेक्षकागृहातील खेळांदरम्यान, स्थानिय लोक आणि जवळच्या नुकेरिया शहरातील लोकांमध्ये बाचाबाची सुरू होऊन दंगल झाली, असे रोमन इतिहासकार टॅसिटसने वृत्त दिले.

पहिल्या शतकातील जनता, मनोरंजन प्रेमी होती. रोमन साम्राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नाट्यमंदिरे, प्रेक्षागृहे, करमणूक स्थळे होती; काही शहरांमध्ये तर तिन्ही होते. ॲटलस ऑफ द रोमन वर्ल्ड पुस्तकानुसार, “रोमन खेळांत पुष्कळ गोंधळ असायचा. ते भयानक असायचेत. लोकांना हे थरारक खेळ आवडायचेत. . . . या खेळांत पुष्कळ रक्‍तपातही व्हायचा.” रथांच्या शर्यतीत रथावर स्वार असलेले वेगवेगळ्या रंगाचे पोशाख धारण करायचे. प्रत्येक गट समाजातील विशिष्ट राजकीय अथवा सामाजिक गटाचे प्रतिनिधीत्व करायचा. आपला आवडता गट मैदानात आल्यावर प्रेक्षकांतील लोक अक्षरशः वेडेपिसे होत असत. रथ चालक इतके प्रसिद्ध झाले होते, की लोक त्यांची चित्रे आपल्या घरात सजवून ठेवत. रथ चालकांना भरपूर पैसा दिला जायचा.

रोमन शहरांतील प्रेक्षागृहात मानव आणि प्राणी यांच्यातील कुस्त्यांचे खेळ देखील होत. हे खेळ रक्‍तरंजित असायचे आणि यांत भाग घेणारे मानव कधीकधी कोणत्याही शस्त्राविना प्राण्यांबरोबर झुंज करायचे. विल ड्युरंट या इतिहासकारानुसार “प्राण्यांसारखे दिसण्यासाठी कधीकधी अंगावर प्राण्यांच्या कातडीचा पोशाख घातलेल्या शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना, पशूंसमोर फेकले जायचे. या पशूंना त्या प्रसंगापुरते मुद्दाम उपाशी ठेवले जायचे. अशावेळी या गुन्हेगारांना यातनामय मृत्यू यायचा.”

अशा अभक्‍त मनोरंजनाचा आनंद लुटणाऱ्‍या लोकांची बुद्धी खरोखरच “अंधकारमय” झाली होती व ते “कोडगे” झाले होते. (इफिसकर ४:१७-१९) दुसऱ्‍या शतकात, टर्टुलियनने लिहिले: “करमणूक जगतात सहसा दिसणारा, वेडेपणा, नाट्यगृहातील निर्लज्जपणा आणि आखाड्यातील रानटीपणा, [ख्रिश्‍चनांमध्ये] कधी ऐकण्यात, पाहण्यात किंवा बोलण्यात आला नाही.” आजही खरे ख्रिस्ती, प्रसार माध्यमाद्वारे—साहित्य, टीव्ही किंवा कंप्युटर खेळांद्वारे—दाखवले जाणारे हिंसक मनोरंजन टाळतात. “हिंसा ज्यांना प्रिय आहे, अशांचा [यहोवा] द्वेष करतो,” ही गोष्ट ख्रिश्‍चन आठवणीत ठेवतात.—स्तोत्र ११:५, सुबोध भाषांतर. (g ११/०६)

[१४ पानांवरील चित्र]

एका विजयी रथ चालकाचे कुट्टिमचित्र

[१४ पानांवरील चित्र]

सिंहिणीशी झुंज देणाऱ्‍या मनुष्याचे गिलावचित्र

[१४ पानांवरील चित्र]

पहिल्या शतकातील रोमन नाट्यमंदिर

[चित्राचे श्रेय]

Ciudad de Mérida

[१४ पानांवरील चित्राचे श्रेय]

वर आणि खाली डावीकडे: Museo Nacional de Arte Romano, Mérida