व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांचा विवाह टिकला

त्यांचा विवाह टिकला

त्यांचा विवाह टिकला

साऊथ आफ्रिकामधील एका कंपनीतील मालकीणीच्या लक्षात आले की, तिची कर्मचारी बेल्ला हिच्या वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत. म्हणून या मालकीणीने थांडी, एक यहोवाची साक्षीदार हिला बेल्ला सोबत बोलण्यास सांगितले. थांडीला समजले की, बेल्लाने तिच्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

थांडीने कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाच्या दोन प्रती बेल्लाला दिल्या आणि एक प्रत आपल्या पतीलाही देण्याचे उत्तेजन दिले. बेल्लाने एक प्रत आपल्या पतीला दिली. एका आठवड्यानंतर थांडीला कळले की, बेल्लाचा पती पुस्तक वाचत असून, त्यांच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा होत आहेत. तीन महिन्यांनंतर बेल्लाने थांडीला सांगितले की प्रार्थना व कौटुंबिक सौख्यानंद या पुस्तकाद्वारे देवाने त्यांचा विवाह वाचवला. परंतु, हा अनुभव इथंच संपत नाही.

जेव्हा बेल्लाच्या मालकीणीने घडलेली हकिकत ऐकली, तेव्हा तिने सर्व कर्मचाऱ्‍यांना एक पुस्तक मिळावे असे सुचवले. अखेरीस, १९२ पानाच्या कौटुंबिक सौख्यानंद या पुस्तकाच्या शंभरपेक्षा जास्त प्रती कंपनीतील कामगारांना देण्यात आल्या. या पुस्तकात “विवाह मोडण्याच्या बेतात असल्यास,” “कुटुंबाचे नुकसान करणाऱ्‍या समस्यांवर तुम्ही मात करू शकता,” आणि “तुमच्या घरात शांती राखा” हे बोधपर अध्याय आहेत.

तुम्हीही कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाची एक प्रत मिळण्यासाठी सोबत दिलेले कूपन भरून, त्यासोबत दिलेल्या पत्यावर पाठवू शकता किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पत्र पाठवून विनंती करू शकता. (g २/०७)

□ कसल्याही बाध्यतेविना, मी कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाविषयी अधिक माहितीची विनंती करत आहे.

□ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.