‘हूक अपसाठी’ मला कोणी विचारल्यास काय?
तरुण लोक विचारतात . . .
‘हूक अपसाठी’ मला कोणी विचारल्यास काय?
“आपण सेक्ससंबंध ठेवू शकू का व किती व्यक्तींबरोबर ठेवू शकू, फक्त हे पाहण्यासाठी मुले हूक अप करतात.”—पेनी. *
“मुलं अगदी उघडपणे याविषयी बोलतात. आपली एक गर्लफ्रेंड आहे तरीपण आपण इतर अनेक मुलींबरोबर सेक्ससंबंध ठेवतो, अशी ते फुशारकी मारतात.”—एडवर्ड.
“हूक अपसाठी मला विचारणारी मुलं किती धीट होती. मी त्यांना कित्येकदा नकार दिला तरीपण ते माझ्या मागेच लागले होते!”—ईडा.
काही देशात या अशा सेक्ससंबंधांना हूक अप असे म्हटले जाते. इतर ठिकाणी कदाचित याला वेगळे नाव असेल. जसे की जपानमध्ये याला टेक-ऑऊट्स म्हणजे फिरायला नेणे, असे म्हटले जाते, असे तरुण अकीको म्हणते. ती पुढे म्हणते: “मुला-मुलींमध्ये, आणखी एक शब्द वापरला जातो, सेफ्रे. म्हणजे, ‘सेक्सफ्रेंड.’ यामध्ये केवळ सेक्ससंबंध ठेवण्यापुरतीच तुमची मैत्री असते.”
याला कोणतेही नाव असले तरी, त्याचा अर्थ मात्र एकच आहे—कोणतीही भावनिक वचनबद्धता न करता प्रासंगिक सेक्ससंबंध ठेवणे. * काही युवक तर, आपल्याला “लाभ देणारे मित्र” असल्याची फुशारकी देखील मारतात. याचा अर्थ, त्यांच्या ओळखीची अशी मुलं-मुली असतात की ज्यांच्याबरोबर ते सेक्ससंबंध ठेवू शकतात. अशाप्रकारच्या संबंधात दीर्घ-काळपर्यंत रोमांस करण्याची “झंझट” नसते. “हूक अपमध्ये झटपट तृप्ती मिळते. तुम्हाला जे हवे असते ते तुम्हाला मिळते; यात तुम्ही अडकून पडत नाही,” असे एक तरुणी म्हणते.
ख्रिस्ती या नात्याने तुम्ही ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढला’ पाहिजे. * (१ करिंथकर ६:१८) हे माहीत झाल्यावर कदाचित तुम्ही, पेचात पाडणारे प्रसंग टाळाल. कधीकधी मात्र, पेचात पाडणारे प्रसंग स्वतःहून तुमच्याकडे चालत येतात. सिंडी म्हणते: “शाळेत पुष्कळ मुलांनी मला त्यांच्याबरोबर हूक अप होण्यासाठी विचारले.” कामाच्या ठिकाणी देखील असे होऊ शकते. “माझ्या मॅनेजरने मला त्याच्याबरोबर हूक अप होण्यासाठी विचारले. तो माझ्या इतका मागे लागला, की शेवटी मला ती नोकरी सोडून द्यावी लागली,” असे मार्गारेट म्हणते.
दुसरीकडे पाहता, तुम्हाला जर कधीकधी अशा कार्यात पडण्याचा मोह होत असेल तर आश्चर्य करू नका. बायबल म्हणते: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्मया १७:९) लुद्र्स नावाच्या एका मुलीला बायबलमधील हे शब्द किती खरे आहेत याची खात्री पटली. ती कबूल करते: “मला ज्या मुलानं त्याच्याबरोबर संबंध ठेवण्यास विचारले तो मला आवडला.” जेनचा देखील असाच अनुभव आहे. ती म्हणते: “माझ्या मनात तीव्र भावना उत्पन्न झाल्या. मला ज्या मुलानं विचारलं त्याला नाही म्हणायला मला खूप जड जात होतं.” आधी उल्लेख केलेला एडवर्ड कबूल करतो, की सदाचारी राहणे सोपे नाही. तो म्हणतो: “पुष्कळ मुलींनी मला त्यांच्याबरोबर सेक्ससंबंध ठेवण्यास विचारले तेव्हा, त्यांना नकार देणे, ही ख्रिस्ती या नात्याने मला सर्वात कठीण गोष्ट वाटली. नाही म्हणणे इतके सोपे नसते.”
तुम्हाला जर लुद्र्स, जेन आणि एडवर्ड सारखे वाटले असेल पण तुम्ही यहोवा देवाच्या नजरेत जे उचित आहे ते केले असेल तर तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे. प्रेषित पौलाला देखील नेहमी चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची समस्या होती, हे जाणून तुम्हाला सांत्वन मिळेल.—रोमकर ७:२१-२४.
तुम्हाला जर कोणी हूक अपसाठी विचारले तर तुम्हाला कोणत्या बायबल तत्त्वांची आठवण झाली पाहिजे?
हूकींग अप चुकीचे का आहे हे आधी माहीत करून घ्या
विवाहबाह्य सेक्ससंबंधांचा बायबल निषेध करते. होय, जारकर्म हे इतके गंभीर पाप आहे की जे ते आचरतात त्यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) हूक अपच्या पाशात पडण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही, यहोवाचा जो दृष्टिकोन आहे तो आत्मसात केला पाहिजे. शुद्ध राहण्याचा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे.
“यहोवाचा मार्ग जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे, असा माझा ठाम विश्वास आहे.”—कॅरन, कॅनडा.
“आपण क्षणिक सुखासाठी यहोवाच्या नैतिक नियमांचे उल्लंघन करतो तेव्हा आपण खूप काही गमावून बसतो.”—विव्हियन, मेक्सिको.
“तुम्ही कोणाचा तरी मुलगा अथवा मुलगी आहात, अनेकांचे मित्र आहेत आणि एका मंडळीचा भाग आहात, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मोहाला बळी पडलात, की या सर्वांना तुम्ही शर्मेने मान खाली घालायला लावाल.”—पीटर, ब्रिटन.
प्रेषित पौलाने लिहिले: “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा.” (इफिसकर ५:१०) जारकर्माविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे हे माहीत करून घेतल्यावर तुम्ही, तुमच्या पापी शरीराला कितीही आकर्षक वाटले तरी, “वाईटाचा द्वेष” कराल.—स्तोत्र ९७:१०.
◼ कृपया वाचा: उत्पत्ति ३९:७-९. लैंगिक अनैतिकतेचा मोह असताना योसेफ कसा भक्कम राहिला व कोणत्या गोष्टीने त्याला मोहाचा प्रतिकार करण्यास मदत केली ते पाहा.
आपल्या विश्वासांचा अभिमान बाळगा
अनेक तरुण, आपल्या विश्वासांचा अभिमान बाळगतात व ते जो विश्वास करतात त्याचे समर्थन करतात. ख्रिस्ती या नात्याने तुम्हाला, आपल्या उत्तम आचरणाद्वारे आपल्या देवाचे नाव उंचावण्याची सुसंधी मिळाली आहे. विवाहाआधी लैंगिक संबंध ठेवण्याबाबत तुमचा न बदलणारा जो दृष्टिकोन आहे त्याबद्दल कसलीही लाज बाळगू नका.
“सुरुवातीपासूनच हे दाखवून द्या, की तुमची काही नैतिक तत्त्वं आहेत.”—ॲलन, जर्मनी.
“तुम्ही जो विश्वास करता त्याबद्दल तुम्हाला अपराध्यासारखे वाटण्याची काही गरज नाही.”—एस्तर, नायजेरिया.
“‘माझे आईबाबा मला डेटिंगला परवानगी देणार नाहीत,’ असे जर तुम्ही म्हणालात तर हूक अपविषयी असलेल्या तुमच्या निर्णयाची तुमचे साथीदार कसलीही किंमत करणार नाहीत. तुम्हाला स्वतःलाच त्यांच्यासोबत डेटिंग करण्याची इच्छा नाही, हे तुमच्या बोलण्यावरून त्यांना दिसले पाहिजे.”—जॅनेट, दक्षिण आफ्रिका.
“मी कोण आहे हे माझ्या शाळेतल्या मुलांना माहीत होतं, त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केलेत तरी ही मुलगी आपल्यासमोर झुकणार नाही, हे त्यांना चांगलं माहीत होतं.”—विकी, अमेरिका.
आपल्या विश्वासांसाठी तुम्ही खंभीर राहण्याचा निर्णय घेता तेव्हा ते, तुम्ही एक प्रौढ ख्रिस्ती असल्याचे चिन्ह आहे.—१ करिंथकर १४:२०.
नीतिसूत्रे २७:११. आपल्या कार्यांद्वारे तुम्ही वास्तविकतेत एक मोठ्या गोष्टीचे समर्थन करता—यहोवाच्या नावाचे पवित्रिकरण!
◼ कृपया वाचा:खंबीर राहा!
नाही म्हणणे महत्त्वाचे आहे. पण तुम्ही जेव्हा नकार दर्शवता तेव्हा, इतरांना असे वाटू नये, की तुम्ही “फक्त नकार असल्याचे नाटक” करत आहात.
“तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा तुम्ही जणू काय त्यांना एक आव्हान देत आहात, किंवा तुमच्यापर्यंत पोहंचण्याकरता त्यांना खूप अडथळे पार करावे लागतील, तुमचा पाठलाग करावा लागेल, अशी छाप तुमच्या बोलण्यावरून किंवा वागण्यावरून देऊ नका.”—लोरन, कॅनडा.
“तुम्ही ज्याप्रकारचे कपडे घालता, तुम्ही कसे बोलता, कुणाबरोबर बोलता, लोकांबरोबर तुम्ही कसे वागता या सर्व गोष्टींवरून, कोणत्याही प्रकारच्या लैंगिक प्रस्तावांना तुमचा नकार आहे हे स्पष्ट दिसून आले पाहिजे.”—जॉय, नायजेरिया.
“तुमचा नकार, ठळक आणि जोरदार असला पाहिजे.”—डॅन्यल, ऑस्ट्रेलिया.
“खंबीर राहा! एका तरुणाने जेव्हा मला बोलावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी त्याला अगदी कडक शब्दांत म्हणाले: ‘माझ्या खांद्यांवरून हात काढ!’ आणि मी त्याच्याकडे अगदी रागाने पाहत गेले.”—एलन, ब्रिटन.
“तुम्ही असे कडक वागलेच पाहिजे आणि अगदी सडेतोडपणे म्हटले पाहिजे, की तुम्ही अशा गोष्टीला तयार नाहीत आणि पुढेही नसणार. अशावेळी मिळमिळीत राहून चालत नाही!”—जीन, स्कॉटलंड.
“एक मुलगा मला सारखं बोलवून माझ्याबद्दल काय काय बोलायचा. एक अशी वेळ आली जेव्हा मला त्याच्याबरोबर कडक वागावं लागलं. तेव्हापासून त्यानं माझा नाद सोडला.”—क्वनीटा, मेक्सिको.
“तुम्ही मुलांना हे स्पष्टपणे बोलून दाखवले पाहिजे, की त्यांनी या गोष्टींची स्वप्ने पाहणे सोडावे कारण हे कधीही शक्य होणार नाही. तुम्हाला गळ घालायचा प्रयत्न करणाऱ्या मुलांकडून केव्हाही बक्षीसं घेऊ नका. घेतलीच तर, ते तुम्हाला या बक्षिसांचा वास्ता दाखवून तुम्हाला आता त्यांच्याबरोबर संबंध ठेवावेच लागतील, असे भासवू लागतील.”—लॉरा, ब्रिटन.
तुम्ही जर खंबीर राहिलात तर यहोवा तुम्हाला नक्कीच मदत करेल. आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून स्तोत्रकर्ता दावीद यहोवाविषयी असे म्हणू शकला: यहोवा ‘निष्ठावंतांशी निष्ठेने वागतो.’—स्तोत्र १८:२५, मराठी कॉमन लँग्वेज.
◼ कृपया वाचा: २ इतिहास १६:९. जे सात्विक चित्ताने यहोवाबरोबर वर्ततात त्यांना तो साहाय्य करण्यास आतुर आहे.
दूरदृष्टी ठेवा
बायबल म्हणते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.” (नीतिसूत्रे २२:३) तुम्ही या सल्ल्याचे पालन कसे करू शकता? दूरदृष्टी ठेवण्याद्वारे.
“अशा गोष्टी बोलणाऱ्या लोकांपासून चार हात दूरच राहा.”—नओमी, जपान.
“घातक लोक आणि परिस्थिती टाळा. जसे की, मी अशा लोकांना ओळखतो की जे नशेच्या भरात मोहाच्या आहारी गेले.”—इशा, ब्राझील.
“स्वतःची माहिती, जसे की तुमचा पत्ता किंवा फोन नंबर देऊ नका.”—डायना, ब्रिटन.
“आपल्या कपड्यांकडे लक्ष द्या. तुमचे कपडे उत्तेजक नसावेत.”—हाईडी, जर्मनी.
“पालकांबरोबर चांगले संबंध ठेवणे ही एकप्रकारची सुरक्षाच आहे. यामुळे काय होईल की, तुमच्यासमोर जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता.”—अकीको, जपान.
तुम्ही कोणत्याप्रकारची भाषा वापरता, तुमचे आचरण कसे आहे, तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी सतत जाता, याचे परीक्षण करून पाहा. मग स्वतःला विचारा, ‘मी स्वतःला अशा परिस्थितीत तर टाकत नाहीए किंवा अजाणतेत माझ्या वर्तनाद्वारे असा संदेश तर देत नाहीए, की ज्यामुळे इतरजण मला हूक अपसाठी विचारतील?’
◼ कृपया वाचा: उत्पत्ति ३४:१, २. दीना नावाच्या एका मुलीवर, चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे कोणता दुखद प्रसंग ओढवला ते पाहा.
यहोवा देवाच्या नजरेत, सेक्ससंबंधांबद्दलचा विषय क्षुल्लक विषय नाही. तुमचा दृष्टिकोन देखील क्षुल्लक असू नये. बायबल म्हणते: ‘जारकर्म्याला, अशुद्ध कृति करणाऱ्याला ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही.’ (इफिसकर ५:५) जे योग्य आहे त्यासाठी ठामपणे उभे राहण्याद्वारे तुम्ही तुमचा विवेक शुद्ध ठेवू शकता आणि स्वाभिमान बाळगू शकता. कार्ली नावाची एक मुलगी म्हणते, “दुसऱ्याला क्षणिक सुख मिळावे म्हणून मी त्याला, माझा ‘उपयोग’ का करू द्यावा बरे? यहोवा देवासमोर शुद्ध भूमिका टिकवून ठेवण्याकरता आतापर्यंत तुम्ही जे प्रयत्न केले आहेत त्यावर पाणी ओतू नका.” (g ३/०७)
“तरुण लोक विचारतात. . . ” या सदरातील आणखी लेख पुढील वेबसाईटवर मिळू शकतात: www.watchtower.org/ype
विचार मंथन
◼ अनैतिक सेक्ससंबंध अपरिपूर्ण शरीराला आकर्षक वाटले तरी ते चुकीचे का आहे?
◼ तुम्हाला जर कोणी त्यांच्याबरोबर हूक अपसाठी विचारले तर तुम्ही काय कराल?
[तळटीपा]
^ या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.
^ हे शब्द इतर जवळकीच्या वर्तनाला देखील लागू होऊ शकतात जसे की, कुरवाळणे व वासनायुक्त चुंबन घेणे.
^ जारकर्म म्हणजे, विवाहित नसलेल्या लोकांबरोबर लैंगिक संबंध, मुखाद्वारे व गुदाद्वारे संबंध, समलैंगिक कार्ये, दुसऱ्या व्यक्तीला हस्तमैथून करणे आणि इतर लैंगिक कार्ये ज्यांत, गुप्तांगांचा दुरुपयोग केला जातो.
[२७ पानांवरील चौकट]
◼ जो जारकर्म करतो तो “आपल्या शरीराबाबत पाप करितो,” असे बायबल म्हणते. (१ करिंथकर ६:१८) हे कसे? जारकर्म करणारा आपल्या शरीराबाबत पाप करतो याविषयी तुमच्या मनात कोणते मुद्दे येतात ते पाहा आणि मग खाली ते क्रमाने लिहा.
․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․
․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․
․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․
․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․
क्लू: या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास तुम्हाला मदत मिळावी म्हणून तुम्ही यहोवाचे साक्षीदार प्रकाशित करत असलेले टेहळणी बुरूज जुलै १, २००६, पृष्ठ २०, परिच्छेद १४ आणि टेहळणी बुरूज जून १५, २००२, पृष्ठ २१, परिच्छेद १७ पाहू शकता.
[२९ पानांवरील चौकट]
पालकांसाठी एक सल्ला
“शाळेत माझ्या वर्गातल्या एका मुलानं मला ‘हूक अपसाठी’ विचारलं. तो नक्की काय विचारतोय हे समजायलाच मला कितीतरी दिवस लागले. मी तेव्हा फक्त ११ वर्षांची होते.”—लिआ.
सेक्ससंबंधांविषयीची माहिती आजकाल मुलांना फारच कोवळ्या वयात मिळू लागली आहे. बायबलमध्ये फार आधी असे भाकीत करण्यात आले होते, की ‘शेवटल्या काळांत कठीण दिवस’ येतील व तेव्हा माणसे “असंयमी” आणि “देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” होतील. (२ तीमथ्य ३:१, ३, ४) युवकांसाठी असलेल्या या लेखात, “हुकींग अप” विषयी अर्थात सेक्ससंबंधांबद्दल बेपर्वा मनोवृत्ती बाळगण्याची आजकाल जी फॅशन चालली आहे ती, बायबलमधील भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे अनेक चिन्हांपैकी एक चिन्ह आहे.
तुम्ही ज्या काळात लहानाचे मोठे झालात तो काळ आणि आजचे जग यांत खूप फरक आहे. तरीपण, काही अंशी समस्या त्याच आहेत. तेव्हा, तुमच्या मुलांवर होणाऱ्या वाईट प्रभावांविषयी चिंतातूर होऊ नका किंवा घाबरून जाऊ नका. तर, प्रेषित पौलाने सुमारे २,००० वर्षांपूर्वी ख्रिश्चनांना जसे आर्जवले तसे त्यांना मदत करण्याचा दृढनिश्चय करा. प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना असे लिहिले: “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.” (इफिसकर ६:११) वास्तविक पाहता, अनेक ख्रिस्ती युवक, त्यांच्या आजूबाजूला हानीकारक प्रभाव असूनही जे बरोबर आहे ते करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. आणि हे कौतुकास्पद आहे. तुम्हीही आपल्या मुलांना असे करण्यास मदत कशी करू शकता?
एक मार्ग आहे, या माहितीचा आपल्या मुलाबरोबर अथवा मुलीबरोबर चर्चा करण्याकरता उपयोग करा. “कृपया वाचा” असे लिहिलेल्या भागांत, विचारांना चालना देणाऱ्या शास्त्रवचनांचे संदर्भ दिले आहेत. यांत अशा लोकांची सत्य उदाहरणे आहेत ज्यांनी, जे बरोबर आहे त्यासाठी ठामपणे बाजू घेतली व आशीर्वाद प्राप्त केले किंवा देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आणि वाईट परिणाम भोगले. “कृपया वाचा” या भागातील इतर शास्त्रवचनांत असे काही तत्त्वं दिली आहेत जी तुमच्या मुलांना, देवाच्या नियमांनुसार जीवन जगण्यात त्यांना आणि तुम्हाला कोणता विशेषाधिकार आहे हे ओळखण्यास मदत करू शकतात. तेव्हा, या माहितीची आपल्या मुलांबरोबर चर्चा करायला काय हरकत आहे?
देवाच्या दर्जांनुरुप जीवन व्यतीत करण्यात नेहमी आपलाच फायदा आहे. (यशया ४८:१७, १८) त्या दर्जांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे म्हणजे दुःखाला आमंत्रण देणे. आपल्या मुलांच्या हृदयात देवाचे नियम आणि त्याची तत्त्वे बिंबवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवाचे आशीर्वाद असोत, अशी सावध राहाचे! प्रकाशक सदिच्छा बाळगतात.—अनुवाद ६:६, ७.
[२८ पानांवरील चित्र]
तुम्ही यासाठी केव्हाही तयार होणार नाही, हे तुम्ही स्पष्टपणे सांगितले पाहिजे