व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला!”

“ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला!”

“ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला!”

यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन

या तीन दिवसांच्या अधिवेशनांची शृंखला भारतात ऑगस्ट महिन्याच्या शेवटापासून सुरू होईल व २००८ सालापर्यंत जगातल्या शेकडो शहरांत ती सुरू राहील. बहुतेक ठिकाणी अधिवेशनाचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी ९:२० मिनिटांनी सुरू होईल. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम येशूवर केंद्रित असेल.

शुक्रवारच्या कार्यक्रमाचा मुख्य विषय, “आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे” हा आहे. (इब्री लोकांस १२:२) स्वागतपर भाषणाचे शीर्षक “ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून का चालले पाहिजे?” असे आहे. यानंतरच्या तीन भागांच्या परिचर्चेत “थोर मोशे, दावीद व शलमोन या रूपांत येशूची भूमिका समजून घेणे.” सकाळचा कार्यक्रम “यहोवाच्या उद्देशात येशूची अनोखी भूमिका” या मुख्य भाषणानंतर संपुष्टात येईल.

शुक्रवारी दुपारी पहिले भाषण “‘आम्हाला मशीहा सापडला आहे’!” या विषयावर आधारित असून त्यानंतर “ख्रिस्तामध्ये ‘गुप्त असलेला’ खजिना मिळवणे” या विषयावर भाषण दिले जाईल. यानंतर “ख्रिस्ताची मनोवृत्ती धारण करा” असे शीर्षक असलेल्या पाच भागांच्या परिचर्चेत, “त्याने ‘त्यांचे स्वागत केले’” “त्याने ‘मरणापर्यंत आज्ञापालन केले’” आणि “त्याने ‘त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम केले’” या भाषणांचा समावेश आहे. दुपारच्या कार्यक्रमाच्या शेवटी “‘जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे ते जातात’” या विषयावर भाषण दिले जाईल.

शनिवारच्या कार्यक्रमाचा मुख्य विषय “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात . . . व ती माझ्यामागे येतात” हा आहे. (योहान १०:२७) एका तासाच्या परिचर्चेत “सेवाकार्यात येशूच्या नमून्याचे अनुकरण करा” या भाषणात आपले सेवाकार्य अधिक परिणामकारक बनवण्याकरता काही व्यावहारिक सूचना दिल्या जातील. “त्याला ‘न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट होता’—तुम्हालाही आहे का?” व “येशूप्रमाणे ‘सैतानाला अडवा’” या विषयांवरील भाषणांनंतर, सकाळच्या कार्यक्रमाच्या शेवटी बाप्तिस्म्यावर चर्चा होईल आणि यानंतर बाप्तिस्म्याकरता पात्र ठरणाऱ्‍यांचा बाप्तिस्मा होईल.

शनिवारच्या दुपारच्या कार्यक्रमाची सुरुवात “. . . अनुकरण करू नका” या मुख्य शीर्षकाखाली सहा भाग सादर केले जातील. “बहुतेक लोक जे करतात त्याचे,” “आपल्या हृदयाला व डोळ्यांना जे आवडते त्याचे,” “अवास्तविक गोष्टींचे,” “खोट्या शिक्षकांचे,” “कहाण्यांचे” आणि “सैतानाचे” असे हे सहा भाग असतील. पुढच्या भाषणांत “‘यहोवाद्वारे शिकवले जाणे’ श्रेष्ठ” आणि “त्यांना कळपात परतण्यास मदत करा” हे विषय सादर केले जातील. शनिवारच्या कार्यक्रमाची सांगता अधिवेशनाच्या एका विशेष भाषणाने होईल ज्याचे शीर्षक असेल, “चल, माझ्यामागे ये.”

रविवारच्या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे, “माझ्यामागे चालत राहा.” (योहान २१:१९) “ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचे टाळण्याकरता कोणतेही ‘निमित्त सांगू नका’” या भाषणानंतर “डोंगरावरील प्रवचनातील अनमोल रत्ने” या विषयावरील सहा भागांची परिचर्चा सादर केली जाईल. या परिचर्चेत येशूने काढलेल्या उद्‌गारांवर चर्चा केली जाईल, उदाहरणार्थ “जे आत्म्याने दीन ते धन्य” “प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर” व “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल.” सकाळच्या कार्यक्रमाच्या शेवटी “ख्रिस्ताचे खरे अनुयायी कोण आहेत?” हे जाहीर भाषण होईल. दुपारच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण एक नाटक असेल. हे नाटक देवाचा संदेष्टा अलीशा याचा लोभी सेवक गेहाजी याच्याविषयीच्या अहवालावर आधारित आहे. “आपला अजिंक्य पुढारी ख्रिस्त याचे अनुकरण करत राहा!” या विषयावरील भाषणाने अधिवेशनाची समाप्ती होईल.

या अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता आतापासूनच योजना करा. अधिवेशनाचे कोणते ठिकाण तुम्हाला सर्वात सोयीचे पडेल हे जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहाशी अथवा या मासिकाच्या प्रकाशकांशी संपर्क साधावा. या मासिकासोबतच प्रकाशित होणाऱ्‍या टेहळणी बुरूज मासिकाच्या मार्च १ अंकात भारतातील अधिवेशनाच्या सर्व ठिकाणांची यादी आहे. (g ६/०७)