व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चकोरपक्ष्याचे नंदनवनात अनपेक्षित दर्शन!

चकोरपक्ष्याचे नंदनवनात अनपेक्षित दर्शन!

चकोरपक्ष्याचे नंदनवनात अनपेक्षित दर्शन!

माऊईच्या हवाई बेटांना भेट देण्यास मी आणि माझे मित्र अगदी आतुर होतो. आम्हाला हालाकाला ज्वालामूखी पर्वतावरून सूर्योदय पाहायचा होता. हा पर्वत १०,०२३ फूट उंच आहे. हा अनुभव तुम्ही कधी विसरणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले होते. फक्‍त एक अडचण होती. आम्ही राहात होतो कापालुआ बेटावर. आम्हाला पहाटे दोन वाजता आमची साखरझोप मोडून, गाडीने इच्छित स्थळी पोहंचण्यासाठी जावे लागणार होते. मग डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी आम्हाला डोंगराची उभी चढण कारने चढावी लागणार होती. आम्हाला वाटलं, की सगळं जग मस्तपैकी झोपलेलं असेल व आम्ही एकटेच डोंगर चढत असू. पण तसे नव्हते! आमच्या आधी अनेक वाहने एकापाठोपाठ एक असे डोंगराच्या वळणावर वरवर चढत होती. शेवटी एकदाचे आम्ही डोंगर माथ्यावर पोहंचलो. तिथे गारठा होता. पण आम्ही सोबत ब्लँकेट्‌स आणल्या होत्या. त्यामुळे आम्ही त्या स्वतःभोवती गुंडाळून गरम होतो.

सकाळी सहा वाजता होणारा सूर्योदय पाहण्यासाठी शेकडो लोक धीराने थांबले होते. तिथे एकप्रकारचे उत्साहाचे वातावरण होते; सूर्य आपलं डोकं बाहेर काढतानाचे विलोभनीय दृश्‍य टिपून घेण्यास सर्वजण आपापले कॅमेरे हातात घेऊन सज्ज होते. पण आम्हा सर्वांची घोर निराशा झाली! सूर्य वर यायच्या वेळीच अगदी, इतके ढग दाटून आले, की आम्हाला सूर्योदयाची दृश्‍ये आमच्या कॅमेऱ्‍यात बंदिस्तच करता आली नाहीत! पण आम्ही खरंतर हा धोका पत्करला होता; कारण पॅसेफिक महासागराजवळच्या डोंगरांवर सहसा असे ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याच्या उष्णतेने ढग ओसरेपर्यंत आमच्याकडे मूग गिळून गप्प राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण मग आम्ही आणखी एक गोष्ट पाहिली! ज्वालामूखीच्या एका निर्जन कुंडात भटकंती करणाऱ्‍यांच्या उभ्या-आडव्या पायवाटांचे विशाल दृश्‍य आमच्या डोळ्यांसमोर उलघडले. म्हणजे, इथं येऊन आमची पूर्ण निराशा झाली नाही.

अचानक आम्हाला—चक्‌ चक्‌ चक्‌ “चकोरर्‌, चकोरर्‌,” असा विचित्र आवाज ऐकू आला. हा आवाज कुठून येत होता ते शेवटी आम्हाला दिसले. तो एक सुंदर युरेशियन पक्षी होता जो तित्तर कुलातील होता. त्याला चकोर म्हणतात. त्याचे लॅटिन नाव ॲलेकटोरिस चकोर असे आहे. या पक्ष्याचा बहुतेक विणीचा हंगाम जमिनीवरच असतो; तो राहतो देखील जमिनीवरच. आम्हाला पाहिल्यावर तो उडून गेला नाही पण जोरात पळाला.

माऊईच्या या सुंदर बेटावर हा अशाप्रकारचा पक्षी कसा काय आला बरे? हे पक्षी स्थानिक नसून त्यांना तेथे बाहेरून आणण्यात आले होते. उत्तर अमेरिकन खंडात शिकारीसाठी त्यांचा उपयोग केला जातो. आम्हाला या लाजाळू पक्ष्याचे किमानपक्षी जवळून दर्शन घडले म्हणून कृतज्ञ वाटले.—सौजन्याने. (g २/०७)