व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भव्य स्तंभ

भव्य स्तंभ

भव्य स्तंभ

कॅनडामधील सावध राहा! लेखकाकडून

अनेक शतकांपासून मच्छीमारांनी व नावाड्यांनी या स्तंभाचा भरवसालायक खूण म्हणून उपयोग केला आहे. कवी, लेखक आणि कलाकारांनी त्याला अजरामर केले आहे. एका विश्‍वकोशात या स्तंभाचे, “रहस्यमय व मोहित करणारा स्तंभ” असे वर्णन केले आहे. सेंट लॉरेन्स, पर्सेच्या आखातातील गॅस्पे द्वीपकल्पाच्या पूर्व टोकावर ॲटलांटिक महासागराच्या निळ्याशार पाण्यात हा स्तंभ ऐटीत उभा आहे. तो सुमारे १,४२० फूट लांब, सुमारे ३०० फूट रुंद आणि २९० पेक्षा अधिक फूट उंच आहे.

एकेकाळी, स्थानीय धारिष्ट लोक या उभ्या खडकावर चढून पक्ष्यांच्या घरट्यांतील अंडी गोळा करायचे. परंतु, खडकाचे जतन करण्यासाठी आणि या उंच खडकावर आश्रय घेतलेल्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी १९८५ मध्ये क्यूबेक सरकारने पर्से खडकाला व जवळच्या बोनावेंचर द्वीपाला पक्षी संग्रहालय म्हणून घोषित केले. बोनावेंचर द्वीप हे, उत्तर गॅनेट पक्ष्यांची पैदास करणारे जगातील दुसरे मोठे पक्षी संग्रहालय आहे.

काहींचा असा दावा आहे, की खूप वर्षांपूर्वी पर्से खडक मुख्य प्रदेशाशी जोडला होता आणि त्याला निदान चार तरी कमानी असाव्यात. पण आज फक्‍त एकच कमान अस्तित्वात आहे जी ९० फूटापेक्षा रुंद आहे आणि खडकाच्या समुद्राकडील किनाऱ्‍याला आहे. ओहोटीच्या वेळी या खडकापासून मुख्यप्रदेशापर्यंत वाळूचा एक मार्ग तयार होतो. या चार तासांच्या अवधीत, धाडसी पर्यटक खडकाच्या पायथ्यापर्यंत चालत जाऊन खडकाच्या कडेकडेने अंगावर समुद्राच्या पाण्याचे तुषार घेत कमानीपर्यंत सुमारे १५ मिनिटात पोहंचू शकतात.

परंतु जे असे धाडस करतात त्यांच्यासाठी एक सावधगिरीचा इशारा आहे. पडलेल्या खडकाच्या तुकड्यांवरून कमानीपर्यंत जाणाऱ्‍या एका पर्यटकाने म्हटले: “दर काही मिनिटांनी तुम्हाला पाण्यात शिरणाऱ्‍या खडकांच्या तुकड्यांचा एक भीतीदायक ‘व्हूश’ असा आवाज ऐकू येतो जो छोट्या बॉम्बसारखा वाटतो. काही खडक एकमेकांवर आपटतात तेव्हा गोळीबारासारखा आवाज येतो.”

अनेक पर्यटकांनी सांगितल्याप्रमाणे, पर्से खडकाचे सौंदर्य श्‍वास रोखून धरणारे आहे. तरीपण ते, आपल्या मोहक पृथ्वीवरील भुलविणाऱ्‍या दृश्‍यांपैकी केवळ एक नमुना आहे. पृथ्वीवर किती भिन्‍नभिन्‍न व असंख्य विलोभनीय दृश्‍ये आहेत! त्यांना पाहिल्यावर कदाचित तुम्ही देखील “स्तब्ध राहून देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन” करण्यास प्रवृत्त झाला असाल.—ईयोब ३७:१४. (g ४/०७)

[१५ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Mike Grandmaison Photography