संपूर्ण जगाची नैतिकता ढासळली आहे
संपूर्ण जगाची नैतिकता ढासळली आहे
“फसवाफसवी पहावे तिथे चालली आहे,” असे डेव्हीड कालहन यांनी, फसवाफसवीची संस्कृती (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लिहिले. अमेरिकेत चाललेल्या इतर प्रकारच्या फसवेगिरींव्यतिरिक्त ते इतरही गोष्टी नजरेस आणून देतात; जसे की, “उच्च माध्यमिक शाळेतील व कॉलेजमधील विद्यार्थी करत असलेली कॉपी,” “संगीत व चित्रपटांच्या अवैध नकला करण्याचे काम,” “कामाच्या ठिकाणी वेळेची व वस्तुंची चोरी,” “वैद्यकीय क्षेत्रात होणारे मोठमोठाले घोटाळे,” आणि क्रीडा क्षेत्रातील खेळाडू घेत असलेले स्टेरॉईड्स. ते समारोपात असे म्हणतात: “यांत विविध प्रकारच्या नैतिक व बेकायदेशीर गैरवर्तनाचाही समावेश केल्यावर तुम्हाला गंभीर स्वरुपाची नैतिक समस्या दिसून येईल.”
द न्यूयॉर्क टाईम्सने असे म्हटले, की सन २००५ मध्ये, अमेरिकेत आलेल्या कटरिना वादळामुळे “आधुनिक इतिहासातील सर्वात उल्लेखनीय फसवेगिरीची प्रकरणे, योजना आणि सरकारचे धक्कादायक घोटाळे निर्माण झाले.” यु.एस. विधिमंडळाची सभासद असलेल्या एका महिलेने असे म्हटले: “इतक्या उघडउघड चाललेले घोटाळे, बेधकडपणे चाललेल्या फसव्या योजना आणि पैशांची उधळपट्टी पाहून कोणीही चाट पडेल.”
हे कबूल आहे की, जगात सर्वच लोक फसवाफसवी करत नाहीत. काही असेही आहेत की जे निःस्वार्थपणे दयाळुपणा दाखवतात. (प्रेषितांची कृत्ये २७:३; २८:२) पण बहुतेकदा आपल्या कानी असेच शब्द पडतात: “यात मला काय मिळणार? माझा किती फायदा होणार?” आज, मी-पणाच्या मनोवृत्तीचा बोलबाला आहे.
गतकाळात रोमन साम्राज्यासारख्या मोठमोठाल्या संस्कृतींचे पतन व्हायचे तेव्हा यास, मतलबी, निर्लज्ज अनैतिक वर्तन कारणीभूत होते, असे म्हटले जाते. मग आज जे काही घडत आहे ते, याहीपेक्षा महत्त्वपूर्ण गोष्टीचा संकेत असेल का? या संपूर्ण व्यवस्थीकरणाच्या अंताचे एक चिन्ह ‘वाढती अनीति’ हे असेल असे बायबलमध्ये भाकीत करण्यात आले आहे. तर या ‘वाढत्या अनीतिचा’ जगाच्या प्रत्येक भागावर परिणाम झाला आहे का?—मत्तय २४:३-८, १२-१४; २ तीमथ्य ३:१-५.
संपूर्ण जगभरात ढासळलेली नैतिकता
युगांडाच्या एका भागातील झोपडपट्टीतील लैंगिक शोषण आणि अश्लील चित्रे यांच्यावर अभ्यास करणाऱ्या कार्यशाळेच्या अहवालावर जून २२, २००६ च्या आफ्रिका न्यूजने असे म्हटले, की “पालकांच्या दुर्लक्षामुळे या भागात वेश्याव्यवसाय आणि मादक पदार्थांचे सेवन यांचे प्रमाण वाढले आहे.” त्याच बातमीपत्रकाने पुढे असे म्हटले: “कवांपे पोलीस ठाण्यातील मूल व कुटुंब संरक्षण विभागाचे अधिकारी श्री. धबांजी सलोंगो असे म्हणाले, की मुलांच्या शोषणाचे व घरगुती हिंसेचे प्रमाण बरेच वाढले आहे.”
भारतातील एका डॉक्टरनुसार “समाजाची सांस्कृतिक पकड ढिली होत चालली आहे.” तिथल्याच एका महिला चित्रपट दिग्दर्शिकेने म्हटले: “मादक औषधांचा वापर आणि लैंगिक अनैतिकता या दोन्ही गोष्टींचे वाढते प्रमाण हे, भारत ‘पाश्चात्य अनीतीत’ बुडत चालल्याचे आणखी एक चिन्ह आहे.”
बिजिंगमधील चायना सेक्सोलॉजी असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल श्री. ह्यू पेचंग यांनी असे म्हटले: “पूर्वी समाजात आपल्याला बरोबर आणि चूक यांची जाणीव होती. आता आपण आपल्या मनास वाटेल तसे वागू शकतो.” चायना टूडे नावाच्या मासिकातील एका लेखात असे म्हटले होते: “आजकालचा समाज दिवसेंदिवस विवाहबाह्य संबंध खपवून घेऊ लागला आहे.”
इंग्लंडच्या यॉर्कशायर पोस्टने अलिकडेच म्हटले: “असे दिसते की लोक, आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी आपली कपडे उतरवण्यास व लैंगिक प्रतिमांचा उपयोग करण्यास तयार आहेत. साठ-सत्तर वर्षांपूर्वी याच कृत्यांमुळे लोकांमध्ये नाराजी पसरली असती आणि याचा निषेध केला असता. आज, आपण जिकडे जाऊ तिकडे, लैंगिक संदेश असलेल्या गोष्टी विविध रुपात पाहायला मिळतात आणि समाजाने अश्लील चित्रे . . . बिनदिक्कत स्वीकारली आहेत.” याच बातमीपत्रकाने पुढे म्हटले: “एकेकाळी १८ वर्षांच्या वर असलेल्यांसाठी सुरक्षित समजले जाणारे साहित्य आता सर्वसामान्यपणे संपूर्ण कुटुंब
मिळून पाहू शकते आणि, अश्लील चित्रविरोधक मोहिमेतील लोकांनुसार सहसा हे साहित्य मुलांसाठी तयार केलेले असते.”द न्यूयॉर्क टाईम्स मॅग्झीनने असे म्हटले: “[काही किशोरवयीन मुलंमुली], कॅफेटेरियात दुपारच्या मेनूत काय आहे याची जशी खुली चर्चा केली जाते त्याप्रमाणे आपल्या लैंगिक अनुभवांविषयी अगदी उघडउघड चर्चा करतात.” टीन्स न्यूज नावाचे मासिक हे “८ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी असलेले मार्गदर्शक” मासिक आहे. त्यात असे म्हटले होते: “लहान मुलांची ज्याप्रकारे अक्षरं असतात त्या अक्षरात एका लहान मुलीने, हृदय पिळवटून टाकणारी एक गोष्ट लिहिली: ‘माझी आई माझ्यावर, मुलांबरोबर डेटवर जायचा व त्यांच्याबरोबर सेक्ससंबंध ठेवण्याचा दबाव आणत आहे. मी फक्त १२ वर्षांची आहे. . . . कृपया मला मदत करा!’”
काळ कसा बदलला आहे! कॅनडाच्या टोरंटो स्टार या वृत्तपत्रकाने म्हटले, की काही वर्षांपूर्वी, “समलिंगी पुरुष व स्त्रिया एकमेकांबरोबर राहत आहेत या केवळ कल्पनेनच लोक संतापून उठायचे.” पण आता, “लोक असे म्हणतात, ‘मी माझ्या खासगी जीवनात काहीही करेन. लोकांनी आमच्यात नाक खुपसू नये,’” असे ओटावा येथील कार्लटन युनिव्हर्सिटीत सामाजिक इतिहास शिकवणाऱ्या शिक्षिका बार्बरा फ्रीमन म्हणतात.
गेल्या काही दशकात जगाच्या अनेक भागात नैतिकता झपाट्याने ढासळत चालली आहे. कशामुळे इतके आमूलाग्र बदल होत आहेत? तुम्हाला स्वतःला याविषयी कसे वाटते? आणि जे बदल होत आहेत ते भवितव्याविषयी काय सूचित करतात? (g ४/०७)