व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ही व्यक्‍ती माझ्यासाठी योग्य असेल का?

ही व्यक्‍ती माझ्यासाठी योग्य असेल का?

तरुण लोक विचारतात . . .

ही व्यक्‍ती माझ्यासाठी योग्य असेल का?

पुढील प्रश्‍नावली सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा:

भावी साथीदारात कोणते गुण असणे महत्त्वाचे आहे असे तुम्हाला सध्या वाटते? खाली दिलेल्या यादीत तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटणाऱ्‍या चार गुणलक्षणांपुढे ✔ अशी खूण करा.

․․․․․․․․ देखणा/देखणी ․․․․․․․․ आध्यात्मिक मनोवृत्ती

․․․․․․․․ स्नेही ․․․․․․․․ भरवसालायक

․․․․․․․․ लोकप्रिय ․․․․․․․․ नैतिकरीत्या शुद्ध

․․․․․․․․ विनोदी ․․․․․․․․ करारी

किशोरवयात असताना तुम्हाला कोणी आवडत होते का? त्यावेळेला त्या व्यक्‍तीतील कोणते गुण तुम्हाला सर्वात जास्त आकर्षक वाटले होते त्या गुणांपुढे वरील यादीत ✘ अशी खूण करा.

वर उल्लेखलेल्या गुणांत काहीच वावगे नाही. प्रत्येकच गुण तसा आकर्षक आहे. पण तुम्ही जेव्हा कुणाच्या तरी प्रेमात पडता तेव्हा तुम्ही त्या व्यक्‍तीचे, डाव्या बाजूच्या रकान्यात उल्लेख करण्यात आलेले वरवर दिसणारे गुण अधिक पाहता, नाही का?

पण जसजसे तुम्ही प्रौढ होत जाता तसतसे तुम्ही उजव्या बाजूच्या रकान्यात उल्लेख करण्यात आलेल्या अधिक महत्त्वाच्या गुणांचे परीक्षण करण्याकरता आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करू लागता. जसे की, तुम्हाला समजू लागते, की तुमच्या शेजारी राहणारी सर्वात देखणी मुलगी भरवसालायक नाहीए किंवा तुमच्या वर्गात ज्याला सर्वजण ‘हिरो’ समजतात तो नैतिकरीत्या शुद्ध नाही. तुमच्या ‘तारुण्याचा बहर ओसरला’ असेल अर्थात तुमच्या लैंगिक इच्छा अतिशय तीव्र झाल्याचे तुम्ही पहिल्यांदा अनुभवता तो काळ ओसरून गेल्यानंतर तुम्ही कदाचित, ही व्यक्‍ती माझ्यासाठी योग्य असेल का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता वरवर दिसणाऱ्‍या गुणांपेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्याल.—१ करिंथकर ७:३६.

कोणीही चालेल का?

एके काळी तुम्ही अनेक विरुद्धलिंगी व्यक्‍तींकडे आकर्षित झाला असाल. पण तुम्ही डोळे मिटून त्यांच्यापैकी कोणाशीही लग्नाचा विचार करू शकत नाही. कारण, तुम्हाला अशा एका जीवनसाथीची गरज आहे जो तुमच्यातील चांगले गुण वाढवू शकेल आणि तुम्हीही त्याला अशीच मदत कराल. (मत्तय १९:४-६) कोण असेल अशी व्यक्‍ती? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याआधी तुम्ही स्वतःला “आरशांत” पाहिले पाहिजे व स्वतःला प्रामाणिकपणे तोलून पाहिले पाहिजे.—याकोब १:२३-२५.

तुम्ही स्वतः कसे आहात याविषयी अधिक जाणण्याकरता पुढील प्रश्‍नांचे उत्तर द्या:

माझ्यात कोणते चांगले गुण आहेत?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

माझ्यात कोणत्या उणीवा आहेत?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

माझ्या भावनिक व आध्यात्मिक गरजा काय आहेत?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

स्वतःला नीट समजून घेणे तितके सोपे नाही. पण असे प्रश्‍न तुम्हाला याबाबतीत मदत करू शकतील. * तुम्ही स्वतःला जितके चांगले ओळखाल तितके तुम्ही, तुमच्या उणीवांपेक्षा तुमचे चांगले गुण वाढवू शकेल अशी व्यक्‍ती शोधण्यास तयार असाल. पण तुम्हाला एक उचित जोडीदार सापडला आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर?

आमची जोडी टिकेल का?

या प्रश्‍नाचे उत्तर हवे असेल तर तुम्ही ज्या व्यक्‍तीला निवडले आहे तिच्याकडे निरपेक्ष दृष्टीने पाहा. पण जरा सावध बरं का! तुम्ही कदाचित फक्‍त तुम्हाला जे हवे आहे तेच पाहाल. तेव्हा घाई करू नका. या व्यक्‍तीचा खरा स्वभाव काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.

डेटींग करणारे पुष्कळ तरुण, फक्‍त वरवर पाहतात; महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करत नाहीत. ते लगेच, त्यांच्या दोघांत किती साम्य आहे ते दाखवतात: ‘आम्हाला दोघांनाही एकाच प्रकारचं संगीत आवडतं.’ ‘आमच्या दोघांच्या आवडीनिवडी सारख्या आहेत.’ ‘आमचं सर्वच गोष्टीत पटतं.’ पण, आधी उल्लेख केल्याप्रमाणे तुमचा जर खरोखरच तारुण्याचा बहर ओसरला असेल तर तुम्ही वरवर दिसणाऱ्‍या गुणांच्या पलिकडे पाहाल. तुम्हाला ‘अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपण’ समजले पाहिजे.—१ पेत्र ३:४; इफिसकर ३:१६.

उदाहरणार्थ, तुमच्या दोघांचे कोणकोणत्या गोष्टींत पटते यावर अधिक भर देण्याऐवजी तुमच्यात दुमत होते तेव्हा त्याची किंवा तिची प्रतिक्रिया कशी असते, हे तुम्ही पाहिले पाहिजे. दुसऱ्‍या शब्दांत, तुमच्यात जेव्हा वाद होतो तेव्हा ही व्यक्‍ती तो वाद कसा सोडवते? “राग” किंवा “शिवीगाळ” करून आपण जे म्हणतो तेच झालं पाहिजे अशा आविर्भावात वाद सोडवते का? (गलतीकर ५:१९, २०; कलस्सैकर ३:८) की, ती समंजसपणा दाखवून जेव्हा केवळ आवडीनिवडीचा प्रश्‍न असतो अशावेळी फक्‍त शांती टिकून राहावी म्हणून माघार घेऊन वाद सोडवते?—याकोब ३:१७.

विचार करण्याजोगी आणखी एक गोष्ट: ही व्यक्‍ती हक्क गाजवणारी किंवा संशयी आहे का? तुमच्या प्रत्येक हालचालीची तिला अथवा त्याला माहिती हवी असते का? “मालकी हक्क गाजवण्याची आणि मत्सरी वृत्ती, घातक लक्षणं आहेत. मी डेटींग करणाऱ्‍या अशा जोडप्यांना पाहिलं आहे ज्यांना, त्यांचा साथीदार नेमका कुठं आहे हे त्यांना वेळोवेळी ‘फोन करून’ सांगितलं पाहिजे; न सांगितलेलं त्यांना मुळीच खपत नाही. माझ्या मते हे चांगलं लक्षण नव्हे,” असे निकोल नावाची एक तरुणी म्हणते.

तुमच्या बॉयफ्रेंडविषयी किंवा गर्लफ्रेंडविषयी इतरांचे काय मत आहे? या व्यक्‍तीला काही काळपासून ओळखत असलेल्या व्यक्‍तीशी जसे की त्याच्या अथवा तिच्या मंडळीतील प्रौढ व्यक्‍तींशी बोलणे फायदेकारक ठरेल. हे प्रौढ जन तुम्हाला, या व्यक्‍तीला ‘नावाजले’ जाते किंवा नाही ते सांगतील.—प्रेषितांची कृत्ये १६:१, २. *

मैत्री तोडावी का?

तुम्ही ज्या व्यक्‍तीशी डेटींग करत आहात ती, तुमचा योग्य विवाह साथी ठरणार नाही, असे जर तुम्हाला जाणवले तर काय? अशावेळी, तुम्ही तुमची मैत्री थांबवणे उचित ठरेल. बायबल म्हणते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.”—नीतिसूत्रे २२:३. *

कालांतराने कदाचित तुमची दुसऱ्‍या एका नव्या व्यक्‍तीशी मैत्री होईल. असे जर झाले तर ह्‍यावेळेला तुम्ही गत अनुभवामुळे आणखी संतुलित दृष्टिकोन बाळगाल. कदाचित त्यावेळेला, “ही व्यक्‍ती माझ्यासाठी योग्य असेल का?” या प्रश्‍नाचे उत्तर होय असे असेल! (g ५/०७)

“तरुण लोक विचारतात . . . ” मालिकेतील आणखी लेख www.watchtower.org/ype या संकेतस्थळावर तुम्हाला सापडतील

विचार मंथन

▪ तुमच्यात असे कोणते गुण आहेत ज्यामुळे तुम्ही एक उत्तम विवाह जोडीदार बनू शकाल?

▪ तुमच्या जोडीदारात कोणते गुण असावयास हवेत अशी अपेक्षा तुम्ही कराल?

▪ तुम्ही ज्या व्यक्‍तीशी डेटींग करत आहात तिच्या स्वभावाविषयी, तिच्या वर्तनाविषयी आणि नावाविषयीची अधिक माहिती तुम्ही कशी मिळवाल?

[तळटीपा]

^ आत्म-परीक्षणाकरता अधिक प्रश्‍ने, सावध राहा! जानेवारी-मार्च २००७ अंकातील पृष्ठ ३० वर आहेत.

^ पृष्ठ १७-१८ वरील चौकोनातील प्रश्‍न देखील पाहा.

^ मैत्री थांबवण्याविषयी अधिक माहितीकरता सावध राहा! एप्रिल-जून २००१, पृष्ठे १८-२० पाहा.

[१७ पानांवरील चौकट]

तो चांगला पती ठरेल का?

मूलभूत गुण

❑ त्याला असलेल्या अधिकाराचा तो कशाप्रकारे वापर करतो? मत्तय २०:२५, २६.

त्याची ध्येये काय आहेत?१ तीमथ्य ४:१५.

❑ आता तो ही ध्येये पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहे का? १ करिंथकर ९:२६, २७.

❑ त्याचे मित्र कोण आहेत?नीतिसूत्रे १३:२०.

❑ पैशाबद्दल त्याचा दृष्टिकोन काय आहे? इब्री लोकांस १३:५, ६.

❑ त्याला कोणत्या प्रकारचे मनोरंजन आवडते? स्तोत्र ९७:१०.

❑ त्याच्या वेशभूषेवरून काय सूचित होते? २ करिंथकर ६:३.

❑ यहोवावर त्याचे प्रेम आहे हे तो कसे दाखवतो?१ योहान ५:३.

उपयुक्‍त गुण

तो कष्टाळू आहे का?नीतिसूत्रे ६:९-११.

❑ तो स्वतःच्या पायावर उभा आहे का?लूक १४:२८.

❑ चार लोकांत त्याचे नाव चांगले आहे का? प्रेषितांची कृत्ये १६:१, २.

❑ तो आपल्या आईवडिलांचा मान राखतो का? निर्गम २०:१२.

❑ तो इतरांचा विचार करतो का?फिलिप्पैकर २:४.

घातक लक्षणे

❑ तो भांडखोर आहे का?नीतिसूत्रे २२:२४.

❑ तो तुम्हाला अनैतिक कामात गोवण्याचा प्रयत्न करतो का?गलतीकर ५:१९.

❑ तो इतरांवर शारीरिक व शाब्दिक हल्ले करतो का?इफिसकर ४:३१.

❑ मजा करण्यासाठी त्याला मद्यपान हवे असते का?नीतिसूत्रे २०:१.

❑ तो मत्सरी किंवा आत्म-केंद्रित आहे का? १ करिंथकर १३:४, ५.

[१८ पानांवरील चौकट]

ती चांगली पत्नी ठरेल का?

मूलभूत गुण

❑ ती कुटुंबात व मंडळीत अधीनता कशी दाखवते?इफिसकर ५:२१, २२.

❑ तिच्या वेशभूषेवरून काय सूचित होते? १ पेत्र ३:३, ४.

❑ तिच्या मैत्रिणी कोण आहेत?नीतिसूत्रे १३:२०.

❑ पैशाबद्दल तिचा दृष्टिकोन काय आहे? १ योहान २:१५-१७.

❑ तिची ध्येये काय आहेत?१ तीमथ्य ४:१५.

❑ आता ती ही ध्येये पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहे का?१ करिंथकर ९:२६, २७.

❑ तिला कोणत्या प्रकारचे मनोरंजन आवडते?स्तोत्र ९७:१०.

❑ यहोवावर तिचे प्रेम आहे हे ती कसे दाखवते?१ योहान ५:३.

उपयुक्‍त गुण

❑ ती कष्टाळू आहे का? नीतिसूत्रे ३१:१७, १९, २१, २२, २७.

❑ ती आपल्या पायांवर उभी आहे का? नीतिसूत्रे ३१:१६, १८.

❑ चार लोकांत तिचे नाव चांगले आहे का?—रुथ ४:११.

❑ ती आपल्या आईवडिलांचा मान राखते का?निर्गम २०:१२.

❑ ती इतरांचा विचार करते का?नीतिसूत्रे ३१:२०.

घातक लक्षणे

❑ ती भांडखोर आहे का?नीतिसूत्रे २१:१९.

❑ ती तुम्हाला अनैतिक कामात गोवण्याचा प्रयत्न करते का?गलतीकर ५:१९.

❑ ती इतरांवर शाब्दिक व शारीरिक हल्ले करते का?इफिसकर ४:३१.

❑ मजा करण्यासाठी तिला मद्यपान हवे असते का?नीतिसूत्रे २०:१.

❑ ती मत्सरी किंवा आत्म-केंद्रित आहे का? १ करिंथकर १३:४, ५.