व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आईवडिलांच्या सुशिक्षणाचे चांगले फळ

आईवडिलांच्या सुशिक्षणाचे चांगले फळ

आईवडिलांच्या सुशिक्षणाचे चांगले फळ

जे आईवडील आपल्या मुलांवर लहान वयापासूनच चांगले संस्कार करतात त्यांना सहसा आपल्या कष्टाचे चांगले फळ मिळते. पेरू, दक्षिण अमेरिका येथे राहणाऱ्‍या डोरीयन नावाच्या एका मुलाने फक्‍त चार वर्षांचा असताना यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत त्याचे पहिले विद्यार्थी भाषण दिले. तो शाळेला जाऊ लागला तेव्हाच तो आपल्या शिक्षिकेला आणि वर्गसोबत्यांना आपण नाताळ का साजरा करत नाही हे समजावू शकला.

अलीकडेच, डोरीयन सुमारे पाच वर्षांचा असताना त्याला एकूण ५०० विद्यार्थी असलेल्या सबंध शाळेसमोर फादर्स डे या विषयावर आपला दृष्टिकोन स्पष्ट करायला सांगण्यात आले. “पित्याच्या जबाबदाऱ्‍या” या विषयावर त्याने इफिसकर ६:४ या वचनावर आधारित एक दहा मिनिटांचे भाषण तयार केले. भाषणाच्या शेवटी तो म्हणाला, “वर्षातून एकाच दिवशी फादर्स डे साजरा करण्याऐवजी मुलांनी दररोजच आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे व त्यांच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे.”

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला १९४३ साली सुरू करण्यात आली. या प्रशालेचा उद्देश लहानमोठ्यांना चारचौघांसमोर बोलण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत करणे हा होता. ही यहोवाच्या साक्षीदारांची एक साप्ताहिक सभा बनली. तेव्हापासूनच या प्रशालेने बायबल आधारित प्रशिक्षण पुरवले आहे, जे आईवडिलांनी आपल्या मुलांना दिलेल्या शिक्षणाला पूरक ठरते.—नीतिसूत्रे २२:६.

नोव्हेंबर २००५ मध्ये सहा वर्षांच्या झीमोन या स्वित्झर्लंड येथील एका मुलाने ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत बायबल वाचनाची पहिली नेमणूक सादर केली. सुमारे एक वर्षानंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मोठ्या अधिवेशनात त्याची मुलाखत घेण्यात आली. आध्यात्मिक गोष्टींप्रती या लहान मुलाने कशाप्रकारची मनोवृत्ती संपादन केली होती?

झीमोनला ख्रिस्ती सभांना जायला खूप आवडते. तो अगदी थकलेला असला तरी एकही सभा चुकवायची नाही असा त्याचा प्रयत्न असतो. शिवाय तो आपल्या कुटुंबासोबत सेवाकार्यातही सहभागी होतो. दर महिन्यात तो सर्व वयोगटांतील लोकांना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या मासिकांच्या ३०-५० प्रती वितरीत करतो. शिवाय तो बरेचदा आपल्या वडिलांशी बायबलच्या विषयांवर बोलतो आणि त्यांनाही कुटुंबाच्या इतर सदस्यांसोबत सभांना येण्याचे प्रोत्साहन देतो.

खरोखरच, मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवल्यावर जेव्हा ती या शिक्षणाला प्रतिसाद देतात आणि नीतिमत्त्वरूपी फळ देतात तेव्हा आईवडिलांच्या सर्व प्रयत्नांचे चीज होते.—इफिसकर ६:४; याकोब ३:१७, १८. (g ८/०७)

[२६ पानांवरील चित्र]

डोरीयन त्याच्या शाळेत

[२६ पानांवरील चित्र]

झीमोन राज्य सभागृहात