आपल्या अधिकाराचा वापर करा
३
आपल्या अधिकाराचा वापर करा
हे महत्त्वाचे का आहे? पेरंट्स नावाच्या एका मासिकानुसार, बऱ्याच अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की “आपल्या मुलांना मोकाट सोडणाऱ्या किंवा दुसरीकडे पाहता मुलांना कठोर शिस्त लावणाऱ्या पालकांच्या मुलांपेक्षा, जे पालक प्रेमळ असतात पण त्याच वेळेस आपल्या अधिकाराचाही वापर करतात; जे आपल्या मुलांना हर तऱ्हेने आधार देतात पण खंबीरपणे काही मर्यादाही घालून देतात त्यांची मुले, अभ्यासात जास्त हुशार असतात, त्यांचा सामाजिक विकास अधिक चांगला झालेला असतो, त्यांना स्वतःविषयी चांगले मत असते आणि एकंदरीतच ती अधिक आनंदी असतात.”
हे सोपे का नाही? बालपणापासून किशोरवयापर्यंत आणि त्यानंतरही मुले आईवडिलांच्या अधिकाराचा विरोधच करतात. पेरंट पावर! या आपल्या पुस्तकात जॉन रोझमंड असे लिहितात, की “आपले आईवडील कोणत्या परिस्थितीत अधिकाराचा वापर करण्यास बिचकतात आणि आपल्या इच्छेपुढे नमते घेतात हे मुलांना अचूकपणे ताडता येते.” ते पुढे म्हणतात, “आईवडिलांनी कुटुंबात अधिकाराची सूत्रे आपल्या हाती घेतली नाहीत, तर लगेच मुले ती आपल्या हाती घेतात.”
यावर उपाय कोणता? अधिकाराचा वापर केल्यास मुले आपल्यापासून दुरावतील किंवा उदास होतील अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. यहोवा देव कुटुंबाचा जनक आहे आणि त्याने कुटुंबाच्या कारभारांत मुलांना आईवडिलांच्या बरोबरीचा अधिकार दिलेला नाही. उलट, त्याने आईवडिलांना मुलांवर अधिकार चालवण्यास नेमले आहे. आणि मुलांना तो असा आदेश देतो, “आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा.”—इफिसकर ३:१४, १५; ६:१-४.
अधिकाराचा वापर करणे म्हणजे मुलांना गांजणे नव्हे. तुम्ही आपल्या अधिकाराचा योग्य वापर कसा करू शकता? यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारे. तो मानवांना त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास सहज भाग पाडू शकतो. असे करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. पण तो असे करत नाही. उलट तो मानवांच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन देऊन, योग्य ते करण्यास त्यांना विनवतो. त्याचे वचन म्हणते: ‘तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकल्या असत्या तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी . . . झाली असती.’ (यशया ४८:१८) यहोवाची इच्छा आहे की आपण दहशतीपोटी नव्हे, तर प्रेमापोटी त्याच्या आज्ञा पाळाव्यात. (१ योहान ५:३) तो आपल्याकडून कधीही अवास्तव अपेक्षा करत नाही आणि त्याला माहीत आहे की आपण त्याच्या नीतिनियमांनुसार चालल्यामुळे आपलाच फायदा होईल.—स्तोत्र १९:७-११.
पालक या नात्याने आपल्या अधिकाराचा रास्तपणे वापर करण्याचा आत्मविश्वास तुम्ही कसा मिळवू शकता? पहिली गोष्ट म्हणजे, देव तुमच्याकडून ही अपेक्षा करतो याची तुम्हाला खात्री असली पाहिजे. दुसरी गोष्ट, देवाचे नीतिनियम हे तुमच्याकरता आणि तुमच्या मुलांकरता सर्वात उत्तम आहेत याचीही तुम्हाला खात्री असली पाहिजे.—रोमकर १२:२.
पण अधिकाराचा वापर करण्यात काय समाविष्ट आहे? (g ८/०७)
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
‘तुमच्या मुलाला शिस्त लावा म्हणजे तो तुम्हाला सुख देईल.’—नीतिसूत्रे २९:१७, सुबोध भाषांतर.