व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तम सल्ला मिळवा

उत्तम सल्ला मिळवा

उत्तम सल्ला मिळवा

हे महत्त्वाचे का आहे? पालक जेव्हा आपल्या बाळाला पहिल्यांदा हातात घेतात, तेव्हा त्यांच्या मनात एकाचवेळी अनेक भावना उचंबळून येतात. ब्रिटनमध्ये राहणाऱ्‍या ब्रेट नावाच्या एका पित्याने असे म्हटले: “मला मनस्वी आनंद आणि कुतूहल वाटले. पण त्यासोबतच एका प्रचंड जबाबदारीची जाणीवही झाली. ही जबाबदारी आपल्याला पेलता येईल की नाही अशी भीतीही मनात कुठेतरी होती.” अर्जेंटिनात राहणारी मोनिका नावाची माता म्हणते: “माझ्या चिमुकलीच्या सगळ्या गरजा मला पूर्ण करता येतील ना? अशी चिंता मला सतावू लागली. मी मनात म्हटले, ‘आई या नात्याने मी हिला एक जबाबदार स्त्री बनवू शकेन का?’”

या आईवडिलांचा आनंद आणि त्यांना वाटणारी भीती तुम्ही समजू शकता का? निश्‍चितच, माणूस जे काही करतो त्यापैकी मूल वाढवणे हे सर्वात कष्टाचे तरीपण समाधानदायक; नैराश्‍यजनक तरीपण संतुष्टीदायक असे काम आहे. एका पित्याने म्हटल्याप्रमाणे: “तुमचे मूल लहानाचे मोठे करण्याची संधी तुम्हाला एकदाच मिळते.” मुलांचे आरोग्य व त्यांच्या कल्याणावर आईवडिलांचा अतिशय मोठा प्रभाव असतो. हे लक्षात घेऊन, एक उत्तम पालक होण्याकरता भरवशालायक सल्ला मिळाला तर किती बरे होईल असे कदाचित तुम्हालाही वाटत असेल.

हे सोपे का नाही? मुलांचे संगोपन करण्याविषयी सल्ल्याचा तुटवडा नाही. पूर्वी, पहिल्यांदाच आईवडील बनलेले सहसा आपल्या आईवडिलांच्या आदर्शानुसार किंवा आपल्या धार्मिक विश्‍वासांनुसार आपल्या मुलांचे संगोपन करायचे. पण बऱ्‍याच देशांत आज कुटुंब हे संस्थान अतिशय कमकुवत झाले आहे आणि धर्माचा पगडाही नाहीसा झाला आहे. परिणामस्वरूप, अनेक आईवडील बालसंगोपनाविषयी मार्गदर्शन मिळवण्याकरता व्यावसायिक सल्लागारांकडे व तज्ज्ञांकडे धाव घेऊ लागले आहेत. या तज्ज्ञांचा सल्ला काही अंशी विश्‍वसनीय तत्त्वांवर आधारित असतो. पण बरेचदा त्यांनी सुचवलेल्या गोष्टींमध्ये तफावत असल्याचे आढळते किंवा लवकरच त्यांचा सल्ला कालबाह्‍य ठरवला जाण्याची शक्यता असते.

यावर उपाय कोणता? अशा एका व्यक्‍तीचा सल्ला घ्या की जिच्याकडे मुलांचे संगोपन कसे करायचे याबद्दल भरपूर माहिती आहे. ती व्यक्‍ती म्हणजे मानवी जीवनाचा रचनाकार, यहोवा देव. (प्रेषितांची कृत्ये १७:२६-२८) त्याचे वचन बायबल यात तुम्हाला उत्तम पालक बनण्यास साहाय्य करू शकतील अशा थेट सूचना तसेच वास्तविक उदाहरणे देखील आहेत. यहोवा आश्‍वासन देतो, “मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”—स्तोत्र ३२:८.

आनंदी मुलांचे संगोपन करण्यास सहायक ठरणारा सल्ला देव कशाप्रकारे पालकांना देतो? (g ८/०७)

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.”—नीतिसूत्रे ३:५