व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

“सध्या सबंध जगातील समुद्री पृष्ठभागावरील प्रत्येक चौरस मैलावर ४६,००० टाकाऊ प्लास्टिकच्या वस्तू तरंगत आहेत.”—युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्रॅम. (g ७/०७)

दररोज दक्षिण आफ्रिकेतील निरनिराळ्या कोर्टांत ८२ मुलांना “इतर मुलांवर बलात्कार केल्याबद्दल किंवा त्यांच्याशी अश्‍लील चाळे केल्याबद्दल” दोषी ठरवले जाते. काहींच्या मते दोषी ठरवलेल्या या मुलांपैकी बहुतेकांनी “टीव्हीवर पाहिलेल्या दृष्यांमुळे प्रवृत्त होऊन” इतर मुलांवर हे अत्याचार केले.—द स्टार, दक्षिण आफ्रिका. (g ८/०७)

हॉटेलमध्ये राहणाऱ्‍यांपैकी जे हॉटेलच्या खोल्यांमधील दारांचे हॅन्डल्स, टेलिफोन आणि टीव्हीचा रीमोट कंट्रोल वापरतात त्यांच्यापैकी “पन्‍नास टक्के जणांना सर्दीपडशांच्या विषाणूंची लागण होण्याची” शक्यता असते.—मॅक्लीन्स, कॅनडा. (g ९/०७)

मोठा मित्रपरिवार, मोठे आयुष्य

मोठा मित्रपरिवार असणाऱ्‍यांचे आयुष्य वाढते, असे जर्नल ऑफ एपिडिमियोलॉजी ॲन्ड कम्युनिटी हेल्थ या माहितीपत्रकात म्हणण्यात आले. ७० वर्षांच्या वयोगटातील जवळजवळ १,५०० ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या एका अभ्यासात मानवी संबंधांमुळे आयुर्मानावर कसा परिणाम होतो याचे १० वर्षांच्या कालावधीत परीक्षण करण्यात आले. ज्यांचा मित्रपरिवार मोठा होता त्यांच्यातील मृत्यूसंख्या ही मित्र नसणाऱ्‍यांच्या तुलनेत २२ टक्क्यांनी कमी होती. “खिन्‍नता, स्वावलंबनाची भावना, आत्मसम्मान, सहनशक्‍ती, व स्वतःच्या जीवनावर ताबा असल्याची भावना” या सर्व बाबतींत सक्रिय मैत्रीचा वयस्क व्यक्‍तीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडत असतो, असेही या वृत्तात सांगण्यात आले. (g ७/०७)

ईंधनाकरता गहू?

ईंधनाकरता गहू जाळणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? फ्रँकफर्टर ॲल्जेमाइने सोनटॅग्सायटुंग या वृत्तपत्रात दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, धान्याचे भाव घसरत असल्यामुळे, गहू विकून तेल विकत घेण्यापेक्षा गहूच जाळून उष्णता निर्माण करणे शेतकऱ्‍याला जास्त स्वस्त पडेल. अडीच किलो गहू उगवण्यासाठी त्याला २० सेंट्‌स इतका खर्च येतो, पण हाच गहू जाळला तर तितकीच उष्णता निर्माण करता येते जितकी एक लीटर तेल जाळल्यावर उत्पन्‍न करता येते. आणि एक लीटर तेल ६० सेंट्‌सला मिळते. पण सदर वृत्तपत्राने एक नैतिक प्रश्‍न उपस्थित केला: “जगात कित्येक लोकांची उपासमार होत असताना धान्याचा ईंधन म्हणून वापर करणे कितपत योग्य ठरेल?” (g ८/०७)

ॲमझॉनमधील कीटक मोजणी

एन्टोमोलॉजिस्ट अर्थात कीटकांचा अभ्यास करणाऱ्‍या प्राणीशास्त्रज्ञांनी ॲमझॉन पर्जन्यारण्यात आतापर्यंत कीटकांच्या ६०,००० जातींचा शोध लावला आहे. फोल्या ऑन्लाईन यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार अद्याप ज्यांची ओळख पटवण्यात आलेली नाही अशा जातींची संख्या १,८०,००० इतकी आहे. सध्या या भागात २० कीटक अभ्यासक काम करत आहेत. अलीकडच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की हे तज्ज्ञ दर वर्षी कीटकांच्या सरासरी २.७ जातींची ओळख पटवून त्यांविषयी माहिती देतात. या वेगाने काम केल्यास, सगळ्या कीटकांची ओळख पटवायला या अभ्यासकांच्या ९० पिढ्यांना प्रत्येकी ३५ वर्षे किंवा एकूण ३,३०० वर्षे काम करावे लागेल! (g ९/०७)

ऊर्जेची टंचाई

“अंदाजे १६० कोटी लोकांना म्हणजे एकूण मानवजातीपैकी एक चतुर्थांश लोकांना वीज उपलब्ध नाही. २४० कोटी लोकांना स्वयंपाक व ऊबेकरता कोळसा, शेण किंवा लाकूड यांसारख्या ईंधनांवर अवलंबून राहावे लागते” असे आवर प्लॅनेट या संयुक्‍त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे प्रकाशित होणाऱ्‍या मासिकात म्हणण्यात आले. या पारंपरिक ईंधनांतून निघणाऱ्‍या धुरामुळे दर वर्षी जवळजवळ २ कोटी पन्‍नास लाख स्त्रिया व मुले दगावतात. (g ९/०७)