व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ते खरेच इतकी वर्षे जगले का?

ते खरेच इतकी वर्षे जगले का?

ते खरेच इतकी वर्षे जगले का?

बायबलनुसार, आदाम ९३० वर्षे जगला, शेथ ९१२ आणि मथुशलेह ९६९—म्हणजे १,००० वर्षांपेक्षा फक्‍त ३१ वर्षे कमी जगला! (उत्पत्ति ५:५, ८, २७) ही वर्षे सर्वसाधारण लांबीची होती का? की ती कमी काळाची होती? काहींनी सुचवल्याप्रमाणे, ही वर्षे कदाचित आपल्या महिन्यांच्या लांबीची असावीत का?

बायबलमधील पुराव्यावरून असे सूचित होते की ही वर्षे आपण ज्यांना वर्ष म्हणतो तितक्याच लांबीची होती. हे लक्षात घ्या: जर प्राचीन काळातले एक वर्ष आपल्या एक महिन्याइतकेच असते, तर खाली उल्लेख केलेल्या पुरुषांनी अतिशय कमी वयात आपल्या पहिल्या अपत्यास जन्म दिला असे गृहित धरावे लागेल. उदाहरणार्थ, केनानाने सहा वर्षांचा होण्याआधी, महालेलाने व हनोखाने पाच वर्षांच्या वयात मुलांना जन्म दिला असा याचा अर्थ होईल. साहजिकच, हे अशक्य आहे!—उत्पत्ति ५:१२, १५, २१.

शिवाय, प्राचीन काळातल्या लोकांनाही दिवस, महिने व वर्षे यांतला फरक कळत होता. (उत्पत्ति १:१४-१६; ८:१३) किंबहुना, नोहाच्या सविस्तर कालगणनेवरून आपल्याला एका महिन्याचा अवधी ठरवण्यास मदत मिळते. उत्पत्ति ७:११, २४ व उत्पत्ति ८:३, ४ ही वचने एकमेकांशी पडताळून पाहिल्यास आपल्याला कळते की दुसऱ्‍या महिन्याच्या १७ व्या दिवसापासून सातव्या महिन्याच्या १७ व्या दिवसापर्यंत १५० दिवस होतात. त्याअर्थी नक्कीच नोहाने देखील ३० दिवसांचा एक महिना आणि अशा १२ महिन्यांचे मिळून एक वर्ष मोजले.—उत्पत्ति ८:५-१३. *

पण मग लोक ९०० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे कसे काय जिवंत राहात होते? बायबल आपल्याला सांगते की देवाने मनुष्याला सर्वकाळ जगण्यासाठी बनवले होते. आदामाने पाप केल्यामुळेच मनुष्य अपरिपूर्ण बनला आणि मानवी कुटुंबावर मृत्यूचे सावट आले. (उत्पत्ति २:१७; ३:१७-१९; रोमकर ५:१२) जलप्रलयाच्या आधी जिवंत असणारे आज आपल्या तुलनेत परिपूर्ण अवस्थेच्या जवळ होते आणि नक्कीच यामुळे त्यांचे आयुष्य दीर्घ होते. उदाहरणार्थ, मथुशलेह आदामानंतर केवळ सात पिढ्यांनी जन्माला आला होता.—लूक ३:३७, ३८.

परंतु, लवकरच यहोवा देव त्याच्या पुत्राच्या, अर्थात येशू खिस्ताच्या रक्‍तावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांना आदामाच्या पापापासून पूर्णतः मुक्‍त करणार आहे. “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) होय, तो काळ येत आहे जेव्हा मथुशलेहाचे ९६९ वर्षांचे आयुष्य अगदी अल्प वाटू लागेल! (g ७/०७)

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, खंड २, (इंग्रजी) पृष्ठ १२१४ पाहावे.

[२१ पानांवरील आलेख]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

१०००

मथुशलेह

आदाम

शेथ

९००

 

 

 

८००

 

 

 

७००

 

 

 

६००

 

 

 

५००

 

 

 

४००

 

 

 

३००

 

 

 

२००

 

 

 

१००

आजचा सर्वसामान्य मनुष्य