व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दररोजच्या कामांचा नित्यक्रम ठरवून घ्या आणि त्याचे पालन करा

दररोजच्या कामांचा नित्यक्रम ठरवून घ्या आणि त्याचे पालन करा

दररोजच्या कामांचा नित्यक्रम ठरवून घ्या आणि त्याचे पालन करा

हे महत्त्वाचे का आहे? बहुतेक प्रौढ व्यक्‍ती एका ठराविक नित्यक्रमानुसार कामे करतात. नोकरी, उपासना आणि विरंगुळासुद्धा ठरलेल्या नित्यक्रमानुसार होत असतो. आईवडिलांनी जर मुलांनाही आपल्या वेळेचे नियोजन कसे करायचे आणि ठराविक वेळापत्रक कसे पाळायचे हे शिकवले नाही, तर ते आपल्या मुलांना एक महत्त्वाचे कौशल्य आत्मसात करण्यापासून वंचित करत असतात. दुसरीकडे पाहिल्यास, मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉ. लॉरंस स्टाईनबर्ग यांनी सांगितल्यानुसार, “बऱ्‍याच संशोधनांवरून असे दिसून येते की मुलांना नियम व नित्यक्रम ठरवून दिला जातो तेव्हा त्यांना सुरक्षित वाटते आणि आत्मसंयम व आत्मनिर्भरता यांसारखे गुण संपादन करण्यास त्यांना मदत मिळते.”

हे सोपे का नाही? आजकालचे जीवन अत्यंत धकाधकीचे आहे. अनेक पालक दररोज बरेच तास काम करतात. त्यामुळे नियमित स्वरूपाने आपल्या मुलांच्या सहवासात घालवण्याकरता त्यांच्याजवळ वेळच उरत नाही. नित्यक्रम ठरवण्याकरता व त्याचे पालन करण्याकरता आत्मानुशासनाची आणि निश्‍चयी वृत्तीचीही गरज आहे, कारण मुले सहसा ठरलेल्या नित्यक्रमानुसार कामे करण्याच्या प्रकाराला सुरुवातीला काहीसा विरोध करतात.

यावर उपाय कोणता? बायबलमध्ये म्हटले आहे की “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.” याच तत्त्वाचे कुटुंबातही पालन करा. (१ करिंथकर १४:४०) उदाहरणार्थ, मुले अगदी लहान असतानाच, बरेच आईवडील मुलांना दररोज विशिष्ट वेळी झोपण्याची सवय लावतात. ही अतिशय उत्तम सवय आहे. पण झोपण्याची वेळ ही मुलांकरता आनंददायक ठरली पाहिजे. ग्रीसमध्ये राहणारी तातान्या ही दोन लहान मुलींची आई म्हणते: “मुलं बिछान्यात शिरल्यानंतर मी त्यांना कुरवाळते, त्यांचा लाड करते आणि ते शाळेला गेल्यावर मी आज दिवसभर कायकाय केलं, हे त्यांना सांगते. मग तुम्ही आज दिवसभर काय काय केलं, असं मी त्यांना विचारते. अशा मनमोकळ्या गप्पा करताना बरेचदा त्या अगदी निःसंकोचपणे माझ्याजवळ आपल्या भावना व्यक्‍त करतात.”

तातान्याचा पती कोस्तास, आपल्या मुलींना झोपण्याआधी गोष्टी वाचून दाखवतो. तो म्हणतो, “गोष्टीबद्दल सहसा त्या काही न काही मत व्यक्‍त करतात आणि नकळत आमची चर्चा त्यांच्या वैयक्‍तिक समस्यांकडे वळते. पण ‘सांगा बरं, तुम्हाला कोणत्या समस्या आहेत?’ असं जर मी त्यांना विचारलं तर मला त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळत नाही.” अर्थात मुले मोठी होतात तसतसे तुम्ही झोपण्याच्या वेळेत आवश्‍यक फेरबदल करू शकता. पण तुम्ही हा ठरवलेला नित्यक्रम पाळला, तर कदाचित तुमची मुले पुढेही या वेळेचा तुमच्याशी हितगुज करण्यासाठी उपयोग करतील.

याशिवाय, दिवसातले निदान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी सोबत मिळून करण्याची प्रत्येक कुटुंबाने सवय लावावी. ही सवय पाळण्याकरता कधीकधी जेवणाच्या वेळेत थोडाफार बदल करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, चार्ल्स नावाचा दोन मुलींचा पिता म्हणतो, “कधीकधी मला कामावरून परत यायला उशीर होतो. मुलींना भूक लागली असेल, तर माझी पत्नी तेव्हापुरते त्यांना काहीतरी खायला देते, पण जेवण मात्र मी आल्यानंतरच सर्वांना वाढते. मग आम्ही दिवसभरच्या गप्पा गोष्टी करतो, बायबलचे एक वचन वाचून त्यावर चर्चा करतो, आमच्या समस्यांविषयी चर्चा करतो आणि गमती-जमती सांगून खूप हसतो. या सवयीमुळे आमच्या कुटुंबाच्या आनंदात भर पडली आहे हे मी आवर्जून सांगू इच्छितो.”

या कानमंत्राचे पालन करण्याकरता, एक नियम आठवणीत असू द्या: धन संपत्तीच्या मागे लागून कौटुंबिक नित्यक्रमाचा कधीही बळी देऊ नका. तर “जे श्रेष्ठ” अर्थात जे जास्त महत्त्वाचे “ते तुम्ही पसंत करावे.”—फिलिप्पैकर १:१०.

मुलांशी मनमोकळा संवाद साधण्याकरता आईवडील आणखी काय करू शकतात? (g ८/०७)

[७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.”—१ करिंथकर १४:४०