व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“वैद्यकीय शास्त्रावर मोठे उपकार”

“वैद्यकीय शास्त्रावर मोठे उपकार”

“वैद्यकीय शास्त्रावर मोठे उपकार”

मेक्सिको येथील सावध राहा! लेखकाकडून

सबंध जगात यहोवाच्या साक्षीदारांना वैद्यकीय उपचारांत केवळ रक्‍ताविना असलेले उपचार स्वीकारण्याबद्दल ओळखले जाते. काहीजण बायबलच्या आधारावर असलेल्या त्यांच्या या भूमिकेची टीका करतात. पण मेक्सिको सिटीच्या रिफोर्मा नावाच्या एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रात अलीकडेच डॉ. आंकेल हेरेरा या नॅशनल इन्‌स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीच्या मुख्य शल्यचिकित्सकाने असे म्हटले: “साक्षीदार अडाणी नाहीत. ते अंधविश्‍वासीही नाहीत. [त्यांनी] तर रक्‍तस्राव रोखणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देण्याद्वारे, वैद्यकीय शास्त्रावर मोठे उपकार केले आहे.”

पंधरा वर्षांपूर्वी डॉ. हेरेरा यांनी रक्‍ताविना शस्त्रक्रिया करण्यासाठी ॲनेस्थेशियोलॉजिस्ट व शल्यचिकित्सकांची एक टीम तयार केली. या टीममध्ये ॲनेस्थेशियोलॉजिस्ट असणारे डॉ. इसीद्रो मार्टिनेझ यांनी म्हटले: “रक्‍त वाचवण्याच्या कोणत्याही प्रक्रिया रुग्णाला योग्य पद्धतीने भूल देण्याच्या आड येत नाहीत. त्यामुळे आम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक भूमिकेला मान देऊन त्यांना साहाय्य करण्याच्या स्थितीत आहोत.”

ऑक्टोबर २००६ मध्ये रिफोर्मा वृत्तपत्रात सांगितल्यानुसार रक्‍त संक्रमणाला जवळजवळ ३० पर्याय आहेत. रक्‍त वाहिन्यांना जाळून बंद करणे, शरीरातल्या अवयवयांवर रक्‍तस्राव रोखणाऱ्‍या रसायनयुक्‍त विशेष गॉझ लावणे, आणि रक्‍ताला पातळ बनवणारी औषधे वापरणे हे त्यांपैकी काही पर्याय आहेत. *

मेक्सिको सिटी येथील ला रझा जनरल हॉस्पिटलचे मुख्य हृदयशल्यचिकित्सक डॉ. मोइसेस कॅलेड्रोन सहसा रक्‍त न देताच शस्त्रक्रिया करतात. त्यांनी रिफोर्मा यात असे म्हटले: “रक्‍त संक्रमण ही अनपायकारक प्रक्रिया आहे असे समजू नये. रक्‍तातून विषाणू, जिवाणू किंवा परजिवी दुसऱ्‍याच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. तसेच ॲलर्जी प्रतिक्रिया निर्माण होऊन रुग्णाच्या मूत्रपिंडाच्या व फुप्फुसाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.” हे सर्व धोके लक्षात घेऊन, डॉ. कॅलेड्रोन म्हणतात, की “आम्ही सगळ्याच रुग्णांना यहोवाचे साक्षीदार समजूनच त्यांच्यावर उपचार करतो. रक्‍तस्त्राव कमीतकमी होईल याची आम्ही काळजी घेतो, शरीरातून गेलेल्या रक्‍ताची कमी भरून काढण्याचा प्रयत्न करतो आणि रुग्णाचा रक्‍तस्राव कमी होण्याकरता औषधे देतो.”

सदर वृत्तपत्रात प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९ उद्धृत करून यहोवाच्या साक्षीदारांची भूमिका या वचनावर आधारित आहे असे सांगण्यात आले. या शास्त्रवचनात प्रेषितांनी पुढील आज्ञा दिली: “पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले; त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी.”

मेक्सिको येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तरातील इस्पितळ माहिती विभाग असे वृत्त देते की या देशात एकूण ७५ इस्पितळ सहकार्य समिती असून त्यात ९५० स्वयंसेवक आहेत जे डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना रक्‍ताच्या पर्यायांविषयी माहिती देतात. मेक्सिकोत जवळजवळ २,००० डॉक्टरांनी यहोवाच्या साक्षीदारांवर रक्‍ताविना उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे. साक्षीदार या डॉक्टरांच्या साहाय्याची मनापासून कदर करतात. पर्यायाने या डॉक्टरांना साक्षीदार नसलेल्या रुग्णांनाही साहाय्य करणे शक्य झाले आहे. (g ९/०७)

[तळटीप]

^ सावध राहा! कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या रक्‍ताविना उपचाराची शिफारस करत नाही कारण हा प्रत्येकाचा वैयक्‍तिक निर्णय आहे.

[३० पानांवरील चित्र]

डॉ. आंकेल हेरेरा

[३० पानांवरील चित्र]

डॉ. इसीद्रो मार्टिनेझ

[३० पानांवरील चित्र]

डॉ. मोइसेस कॅलेड्रोन