व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“शिकवण्याचे उत्कृष्ट साधन!”

“शिकवण्याचे उत्कृष्ट साधन!”

“शिकवण्याचे उत्कृष्ट साधन!”

पनामा येथील यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या एका पूर्णवेळेच्या सेवकाने बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाची वरील शब्दांत प्रशंसा केली. हे रंगीत चित्रे असलेले २२४ पानांचे पुस्तक सध्या बायबल अभ्यासासाठी सर्वत्र वापरले जात आहे. त्याने लिहिले: “हे पुस्तक किती संक्षिप्त, सुसंगत आणि पटण्यासारखे आहे हे पाहून आश्‍चर्य वाटते. संदर्भांचा व परिशिष्टाचा ज्या नाविन्यपूर्ण पद्धतीने या पुस्तकात वापर करण्यात आला आहे त्यामुळे कोणालाही सखोल अभ्यास करण्याचे लगेच प्रोत्साहन मिळावे.”

अमेरिकेतील मिसूरी येथून, बायबलचे शिक्षण देणाऱ्‍या एका भगिनीने असे लिहिले: “या पुस्तकाची साधीसोपी शैली मला खूप आवडते. विषयांची इतकी सुसंगत मांडणी यापूर्वी माझ्या तरी पाहण्यात आलेली नाही.” बायबल काय शिकवते हे पुस्तक उपलब्ध होताच या भगिनीने ते एका अशा स्त्रीला दिले जिने पूर्वी बायबलचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता पण मध्येच ती निरुत्साहित झाली होती.

भगिनी सांगते: “तिचा पहिला अध्याय अजून वाचून पूर्णही झाला नव्हता, तेव्हा तिने मला फोन करून सांगितले की तिला हे पुस्तक खूप आवडले.” ती म्हणाली की हे पुस्तक जणू तिच्यासाठीच तयार करण्यात आले आहे असे तिला वाटते. तिने पुन्हा बायबल अभ्यास सुरू करण्याची इच्छा व्यक्‍त केली. भगिनी सांगते की पहिले दहा अध्याय पूर्ण झाल्यावर, शिकलेल्या गोष्टींविषयी या स्त्रीचा आनंद बघण्यालायक होता.

बायबल काय शिकवते हे पुस्तक प्रसिद्ध होऊन अजून दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत, पण आतापर्यंत या पुस्तकाच्या पाच कोटी प्रती १५० भाषांतून मुद्रित करण्यात आल्या आहेत. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर सोबत दिलेले कूपन भरा आणि मासिकाच्या पृष्ठ ५ वरील कोणत्याही उचित पत्त्यावर ते पाठवा. (g ४/०७)

▫ कसल्याही बाध्यतेविना, मी इथे दाखवलेल्या पुस्तकाबद्दल मला अधिक माहिती पाठवावी म्हणून विनंती करत आहे.

▫ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.