उत्क्रांती की निर्मिती?
घोड्याचे पाय
घोडा ताशी ५० किलोमीटरच्या वेगानं धावू शकतो. या वेगानं धावत असताना त्याच्या शरीरात कामालीची हालचाल होत असते. पण त्या मानानं त्याची खूपच कमी शक्ती खर्च होते. असं कसं शक्य आहे? त्याचं रहस्य घोड्याच्या पायांमध्ये दडलं आहे.
घोडदौड करताना नेमकं काय होतं ते लक्षात घ्या. पळत असताना घोड्याचा पाय एका स्प्रिंगप्रमाणे काम करतो. त्याचं पाऊल जमिनीवर पडतं तेव्हा त्याचे लवचीक स्नायूबंध स्प्रिंगप्रमाणे दाबले जातात आणि शक्ती शोषली जाते. त्यानंतर लगेचच त्याचे स्नायूबंध स्प्रिंगप्रमाणे पूर्वस्थितीत येतात. यामुळं त्याचं पाऊल आपोआप उचललं जातं. म्हणून कमीतकमी शक्ती खर्च करून तो वेगानं धावू शकतो.
शिवाय, धावत असताना घोड्याच्या स्नायूंमध्ये अतिशय जलद हालचाल होत असते आणि यामुळं स्नायूबंधांना इजा पोहचू शकते. पण, त्याच्या पायाचे स्नायू डॅम्परसारखे किंवा शॉक अॅब्झॉबरसारखे काम करत असल्यामुळं स्नायूंबंधाचं संरक्षण होतं. संशोधक स्नायूंच्या या रचनेला, “अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण स्नायूबंध रचना” असं म्हणतात. या रचनेमुळं घोड्याला शक्ती मिळते आणि तो चपळतेनं धावू शकतो.
इंजिनियर्स या रचनेची नक्कल करून चार पायांचे रोबोट तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, बायोमिमेटिक रोबोटिक्स लेबॉरट्री ऑफ मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्लनॉलोजीच्या मते ही रचना इतकी गुंतागुंतीची आहे की सध्या उपलब्ध असलेल्या साधनांच्या व यांत्रिक ज्ञानाच्या बळावर याची नक्कल करणं इतकं सोपं नाही.
तुम्हाला काय वाटतं? घोड्याच्या पायांची ही रचना उत्क्रांतीमुळं अस्तित्वात आली, की तिच्यामागं कुणी रचनाकार असावा? ▪ (g14-E 10)