व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल काय म्हणतं?

देवाला हिंसाचाराबद्दल काय वाटतं?

देवाला हिंसाचाराबद्दल काय वाटतं?

मानवाच्या उत्पत्तीनंतर लगेचच हिंसेचीदेखील सुरुवात झाली. त्यामुळं मानव इतिहास हिंसाचारानं भरलेला आहे. मग हा हिंसाचार असाच चालत राहील का?

देवाला हिंसाचाराबद्दल काय वाटतं?

लोक काय म्हणतात?

आज पुष्कळ लोकांना तसंच धार्मिक पुढाऱ्यांनाही वाटतं, की हिंसक मनोवृत्ती ही आपल्यामधील स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. तसंच टीव्हीवरील कार्यक्रमांत किंवा चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी हिंसक दृश्ये फक्त मनोरंजन आहे, असं बहुतेक लोक समजतात.

बायबल काय म्हणतं?

सध्याच्या उत्तर इराकमधील मोसूल नावाच्या शहराजवळ, प्राचीन काळाच्या एका खूप मोठ्या शहराचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात. त्या शहराचं नाव होतं निनवे. ती प्राचीन अस्सेरियन साम्राज्याची राजधानी होती. या शहराच्या ऐन भरभराटीच्या काळातच देवानं असं भाकीत केलं, की तो निनवेला “वैराण रानाप्रमाणे रूक्ष” करेल. (सफन्या २:१३) या शहराची अशी अवस्था पाहून लोक तिची थट्टा करतील, असंही देवानं भाकीत केलं. पण का केलं त्यानं असं? कारण निनवे “रक्तपाती नगरी” होती! (नहूम १:१; ३:१, ६) आणि स्तोत्र ५:६ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे, की यहोवाला “खुनी” लोकांचा “वीट येतो.” निनवेच्या झालेल्या अवस्थेवरून हेच सिद्ध होतं, की देव जे बोलतो ते तो करून दाखवतो.

खरंतर, देव आणि मानव या दोघांचाही जुनाट शत्रू सैतान याच्यापासून हिंसाचाराची सुरुवात झाली. येशू ख्रिस्तानं त्याला “मनुष्यघातक” म्हटलं. (योहान ८:४४) आणि आजचं “सगळं जग त्या दुष्टाला वश” असल्यामुळं, हिंसाचाराबद्दल लोकांची मनोवृत्ती, हिंसक मनोरंजनाबद्दलची त्यांची आवड यांतून सैतानाचे गुण त्यांच्यात पाहायला मिळतात. (१ योहान ५:१९) पण आपल्याला जर देवाला संतुष्ट करायचं असेल तर आपणही हिंसाचाराबद्दल वीट बाळगला पाहिजे आणि देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्यालासुद्धा आवडल्या पाहिजेत. * असं करणं शक्य आहे का?

“हिंसा ज्यांना प्रिय आहे, अशांचा [यहोवा] द्वेष करतो.”स्तोत्र ११:५, पं.र.भा.

हिंसक लोक बदलू शकतात का?

लोक काय म्हणतात?

हिंसा मानवाच्या स्वभावाचा भाग आहे ज्यात बदल करता येत नाही.

बायबल काय म्हणतं?

बायबलमध्ये देव म्हणतो: “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा. ... जुन्या मनुष्यास [जुन्या व्यक्तिमत्त्वास] त्याच्या कृतीसह काढून” टाका आणि “नवा मनुष्य” [नवीन व्यक्तिमत्त्व] धारण करा. (कलस्सैकर ३:८-१०) देवाची ही अपेक्षा पूर्ण करणं कठीण आहे का? नाही, मुळीच नाही. अतिशय हिंसक मनुष्यसुद्धा देवाच्या साहाय्यानं बदलू शकतो. * यासाठी काय करावं लागेल त्याला?

पहिलं पाऊल म्हणजे, त्याला देवाबद्दलचं खरं ज्ञान घ्यावं लागेल. (कलस्सैकर ३:१०) तो जसजसं आपल्या निर्माणकर्त्याच्या सुरेख गुणांबद्दलचं, त्याच्या नीतिनियमांबद्दलचं ज्ञान घेत राहील तसतसं देवावर प्रेम करू लागेल आणि त्याला आवडेल अशा पद्धतीनं वागायचा प्रयत्न करू लागेल.—१ योहान ५:३.

दुसरं पाऊल, त्याला फार विचारपूर्वक मित्र निवडावे लागतील. बायबलमध्ये म्हटलं आहे: “रागीट मनुष्याशी मैत्री करू नको. कोपिष्ठाची [रागीट माणसाची] संगती धरू नको. धरशील तर त्याची चालचलणूक शिकून तू आपला जीव पाशांत घालशील.”—नीतिसूत्रे २२:२४, २५.

तिसरं पाऊल, त्याला स्वतःचं परीक्षण करावं लागेल. मी हिंसक का बनतो? माझ्यात संयम या गुणाची कमी आहे का? यांसारखे प्रश्न स्वतःला विचारल्यावर हिंसक मनोवृत्तीच्या व्यक्तीला तिच्यात काय कमी आहे ते दिसून येईल. जे शांतीप्रिय लोक असतात त्यांच्यात स्वतःवर ताबा ठेवण्याचं सामर्थ्य असतं. बायबलमधील नीतिसूत्रे १६:३२ या वचनात म्हटलं आहे: “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ” असतो.

“सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा ... प्रयत्न करा.”इब्री लोकांस १२:१४.

हिंसाचाराचा कधी अंत होईल का?

लोक काय म्हणतात?

हिंसाचार पहिल्यापासूनच होत आला आहे पुढंही होत राहील.

बायबल काय म्हणतं?

बायबलमध्ये म्हटलं आहे: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; ... पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:१०, ११) नम्र व शांतिप्रिय लोकांना सुखानं राहता यावं म्हणून देवानं प्राचीन निनवे शहराचा जसा नाश केला तसाच तो लवकरच हिंसक स्वभावाच्या व हिंसेची आवड धरणाऱ्या लोकांचा नाश करणार आहे. मग यानंतर पुन्हा कधीच पृथ्वीवर हिंसाचार माजणार नाही.—स्तोत्र ७२:७.

“जे सौम्य ... ते पृथ्वीचे वतन भोगतील.”—मत्तय ५:५

त्या नाशातून वाचायचं असेल तर शांत स्वभावाचं होऊन देवाची मर्जी मिळवण्याची आत्ता वेळ आहे. बायबलमधील २ पेत्र ३:९ या वचनात म्हटलं आहे: यहोवा “तुमचे धीराने सहन करतो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.”

“ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील.” यशया २:४.▪ (g15-E 05)

^ परि. 7 प्राचीन इस्राएलला आपल्या क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी देवानं त्यांना युद्ध करण्याची परवानगी दिली होती. (२ इतिहास २०:१५, १७) पण, इस्राएल राष्ट्राबरोबर देवानं आपला करार रद्द करून ख्रिस्ती मंडळीची स्थापना केली तेव्हा परिस्थिती बदलली. ख्रिस्ती मंडळीचं एक विशिष्ट क्षेत्र नव्हतं. खरंतर या मंडळीला सीमाच नव्हत्या.

^ परि. 11 टेहळणी बुरूज नियतकालिकात, “बायबलनं बदललं जीवन!” या लेखमालिकांमध्ये तुम्हाला अशा लोकांच्या जीवन कथा वाचायला मिळतील ज्यांनी आपल्या स्वभावात, मनोवृत्तीत बदल केले आहेत.