आपण आपल्या विश्वासात सात्त्विकतेची भर कशी घालू शकतो?
आपण आपल्या विश्वासात सात्त्विकतेची भर कशी घालू शकतो?
“आपल्या विश्वासात सात्त्विकतेची . . . भर घाला.”—२ पेत्र १:५.
१, २. यहोवाच्या लोकांनी जे सात्त्विक आहे ते करण्याची अपेक्षा आम्ही का केली पाहिजे?
यहोवा नेहमी सात्त्विक मार्गाने कार्य करतो. धार्मिक आणि चांगले तेच तो करतो. या कारणास्तव ज्या देवाने, अभिषिक्त जनांना ‘गौरवासाठी व सात्त्विकतेसाठी’ पाचारण केले त्याच्याविषयी असे पेत्र बोलू शकला. त्यांच्या सात्त्विक स्वर्गीय पित्याच्या अचूक ज्ञानाने त्यांना ईश्वरी भक्तीचे जीवन व्यतित करण्यासाठी कशाची गरज आहे हे दाखवले.—२ पेत्र १:२, ३.
२ प्रेषित पौल ख्रिश्चनांना “देवाची प्रिय मुले ह्या नात्याने त्याचे अनुकरण करणारे व्हा” असे आर्जवितो. (इफिसकर ५:१) त्यांच्या स्वर्गीय पित्याप्रमाणेच, यहोवाच्या उपासकांनी कोणत्याही परिस्थितीत जे सात्त्विक आहे ते केले पाहिजे. परंतु सात्त्विकता काय आहे?
सात्त्विकता काय आहे
३. सात्त्विकतेची “व्याख्या” कशी केली जाऊ शकते?
३ आधुनिक दिवसातील शब्दकोश “सात्त्विक” याची व्याख्या “नैतिक श्रेष्ठता, चांगुलपणा” असा करतो. हे “योग्य कार्य आणि विचारसरणी; चांगुलपणाचा स्वभाव” आहे. सात्त्विक मनुष्य धार्मिक असतो. सात्त्विकतेची व्याख्या बरोबरच्या दर्जासाठी “सारखेपणा” अशी केली आहे. निश्चितच, ख्रिश्चनांसाठी, “बरोबरचा दर्जा” देव ठरवतो आणि याला त्याने त्याच्या पवित्र वचनात, पवित्र शास्त्रात स्पष्ट केले आहे.
४. दुसरे पेत्र १:५-७ मध्ये उद्धृत केलेल्या कोणत्या गुणांना वाढविण्यासाठी ख्रिश्चनांनी परिश्रम केले पाहिजेत?
४ खरे ख्रिश्चन, यहोवा देवाच्या धार्मिक दर्जांना जुळवून घेतात, आणि विश्वास प्रदर्शित करण्याद्वारे ते त्याच्या मौल्यवान अभिवचनांना प्रतिसाद देतात. ते पेत्राचा सल्ला देखील ऐकतात: “ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करुन आपल्या विश्वासांत सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरांत सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.” (२ पेत्र १:५-७) ह्या गुणांना वाढविण्यासाठी ख्रिस्ती जनाने परिश्रम घेतले पाहिजे. हे काही दिवसांसाठी किंवा वर्षांसाठी नव्हे तर जीवनभर प्रयत्न करण्याची गरज आहे. अहा, आमच्या विश्वासात सात्त्विकतेची भर घालणे हे एक आव्हानच आहे!
५. शास्त्रवचनीय दृष्टिकोनातून सात्त्विकता काय आहे?
५ शब्दकोशकार एम. आर. व्हिसेंट म्हणतात की, “सात्त्विक”तेसाठी वापरलेल्या श्रेष्ठ दर्जाच्या ग्रीक शब्दाचा अर्थ “कोणत्याही प्रकारची श्रेष्ठता” असा केला आहे. पेत्राने त्याचे अनेकवचनी रुप वापरले, त्याने म्हटले की ख्रिश्चनांनी त्याची “श्रेष्ठता,” किंवा देवाची सात्त्विकता जगजाहीर करावी. (१ पेत्र २:९, न्यू.व.) शास्त्रवचनीय दृष्टिकोनातून, सात्त्विकतेचे वर्णन अक्रियाशील नव्हे तर “नैतिक सामर्थ्य, नैतिक शक्ती, आत्म्यात आवेशी” असण्यासाठी केले आहे. सात्त्विकतेचा उल्लेख केल्यानंतर, पेत्राच्या मनात होते की, देवाच्या सेवकांनी निर्भय नैतिक श्रेष्ठता प्रदर्शित करावी व राखावी. तथापि, आम्ही अपरिपूर्ण असतानाही, देवाच्या दृष्टीत जे सात्त्विक आहे ते आम्ही करु शकतो का?
अपरिपूर्ण परंतु सात्त्विक
६. आम्ही अपरिपूर्ण असतानाही, देवाच्या दृष्टिने जे सात्त्विक आहे ते आम्ही करु शकतो असे का म्हटले जाऊ शकते?
६ आम्ही अपूर्णत्त्व आणि पाप वारशाने मिळवले आहे, यामुळे देवाच्या दृष्टीत सात्त्विक गोष्टी कशा करु शकतो याविषयी आम्हाला आश्चर्य वाटू शकते. (रोमकर ५:१२) सात्त्विकता, विचार, शब्द आणि कार्य निघणारे शुद्ध हृदय असण्यासाठी आम्हाला निश्चितच यहोवाच्या मदतीची आवश्यकता आहे. (पडताळा लूक ६:४५) बथशेबाबरोबर पाप केल्यावर, पश्चातापी स्तोत्रकर्त्या दाविदाने विनंती केली: “हे देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्याठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तोत्रसंहिता ५१:१०) दाविदाला देवाने क्षमा केली आणि सात्त्विक कार्य करण्यासाठी त्याला मदत केली. या कारणास्तव, आम्ही गंभीर पाप केले असल्यास, आणि पश्चाताप करुन देवाची व मंडळीच्या वडिलांची मदत स्वीकारली असल्यास, आम्ही सात्त्विकतेच्या मार्गावर परत जाऊ व त्यावरच टिकून राहू.—स्तोत्रसंहिता १०३:१-३, १०-१४; याकोब ५:१३-१५.
७, ८. (अ) सात्त्विक राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? (ब) सात्त्विक असण्यासाठी ख्रिश्चनांना कोणती मदत आहे?
७ वारशाने मिळालेल्या पापामुळे, सात्त्विकतेचे कार्य करण्यासाठी आम्हाला जे काही करणे आहे ते करण्यासाठी आम्ही सतत आंतरिक युद्ध लढले पाहिजे. सात्त्विकता राखावयाची असल्यास, आम्ही स्वतःला पापाचे गुलाम कधीही करु नये. उलटपक्षी, आम्ही नेहमी विचार करण्यात, बोलण्यात आणि कार्यात सात्त्विकतेच्या मार्गात “नीतिमत्त्वतेचे गुलाम” राहू. (रोमकर ६:१६-२३) निश्चितच, आमच्या शारीरिक वासना आणि पापी कल्पना शक्तीशाली असतात, आणि आम्हाला या दोन्हींच्या लढाईचा व देव आमच्याकडून अपेक्षित असलेल्या सात्त्विकतेचा सामना करावा लागतो. तर मग काय केले पाहिजे?
८ एक गोष्ट म्हणजे, यहोवाच्या पवित्र आत्म्याचे किंवा कार्यकारी शक्तीचे मार्गदर्शन आम्ही अनुकरणात आणण्याची आवश्यकता आहे. या कारणास्तव आम्ही पौलाचा सल्ला ऐकला पाहिजे: “आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; ही परस्परविरुद्ध आहे; ह्यासाठी की, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये.” (गलतीकर ५:१६, १७) होय, धार्मिकतेसाठी असणाऱ्या शक्तीप्रमाणे, आम्हाजवळ पवित्र आत्मा आहे, आणि योग्य वर्तनाच्या मार्गदर्शनासारखे त्याचे वचन आम्हाजवळ आहे. यहोवाच्या प्रेमळ संस्थेची देखील आम्हाला मदत आहे. व “विश्वासू आणि बुद्धिमान दास” यांचा सल्ला देखील आम्हाला मिळतो. (मत्तय २४:४५-४७) यास्तव, पापी प्रवृत्तीबरोबर आम्ही यशस्वी युद्ध लढू शकतो. (रोमकर ७:१५-२५) अर्थातच, अशुद्ध विचार आमच्या मनात आल्यास, आम्ही त्यांना लगेचच काढून टाकले पाहिजे व कोणत्याही मोहाचा विरोध करण्यासाठी अभाव असलेल्या कोणत्याही सात्त्विकतेसाठी देवाची मदत मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे.—मत्तय ६:१३.
सात्त्विकता आणि आमचे विचार
९. सात्त्विक वर्तन कोणत्या प्रकारच्या विचारसरणीस चालना देते?
९ एखादा ज्यारितीने विचार करतो ज्याद्वारे सात्त्विकतेची सुरवात होते. ईश्वरी कृपापसंतीचा आनंद घेण्यासाठी, आम्ही नीतिमान, चांगल्या, सात्त्विक गोष्टींचा विचार केला पाहिजे. पौलाने म्हटले: “बंधूनो, . . . जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.” (फिलिप्पैकर ४:८) आम्ही आमची मने नीतिमान, शुद्ध गोष्टीवर ठेवली पाहिजेत, व सात्त्विकतेचा अभाव असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे आकर्षण झाले नाही पाहिजे. पौल म्हणू शकला: “माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले ते आचरीत राहा.” आम्ही पौलासारखे—विचारात, बोलण्यात व कार्यात सात्त्विक असलो—आम्ही चांगले सहकारी व ख्रिस्ती वागणूकीत उत्तम उदाहरणशील असू व यामुळे ‘शांतीदाता देव आमच्याबरोबर राहील.’—फिलिप्पैकर ४:९.
१०. सात्त्विक राहण्यासाठी १ करिंथकर १४:२० मधील वैयक्तिक अवलंबन आम्हाला कशी मदत करते?
१० विचारात सात्त्विक राहून आमच्या स्वर्गीय पित्याला खूष करण्याची आमची इच्छा असली तर पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण करणे जरुरीचे आहे: “बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.” (१ करिंथकर १४:२०) याचा अर्थ ख्रिश्चन असल्यामुळे आम्ही दुष्टपणाचे ज्ञान किंवा दुष्टपणा शोधत नाही. अशारितीने आमच्या मनांना आम्ही भ्रष्ट होऊ देण्याऐवजी, आम्ही ह्या बाबतीत अज्ञान आणि तान्ह्या मुलासारखे निर्दोष राहण्याची सुज्ञपणे निवड करु. त्याचवेळी, अनैतिकता आणि वाईट कर्मे यहोवाच्या दृष्टित पापमय असल्याचे आम्ही पूर्णपणे समजलो. सात्त्विक राहण्याद्वारे त्याला खूष करण्यासाठी मनापासून असणाऱ्या उत्कट इच्छेमुळे आम्हाला फायदा होऊ शकतो, कारण ते मनोरंजनाच्या अशुद्ध प्रकारांना आणि सैतानाला वश झालेल्या या जगातील भ्रष्ट मानसिक प्रभावांना टाळण्यास आम्हाला प्रवृत्त करील.—१ योहान ५:१९.
सात्त्विकता आणि आमचे बोलणे
११. सात्त्विक असल्यामुळे कोणत्या भाषेची मागणी करते, व ह्या संबंधाने, यहोवा देव व येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कोणते उदाहरण आम्हाजवळ आहे?
११ आमचे विचार सात्त्विक असतील तर याचा खोल प्रभाव आम्ही जे काही बोलतो त्यावर झाला पाहिजे. सात्त्विक असल्यामुळे ते आमच्याकडून शुद्ध, हितकारक, सत्य, उभारणीकारक भाषेची मागणी करते. (२ करिंथकर ६:३, ४, ७) यहोवा “सत्यस्वरुप देव आहे.” (स्तोत्रसंहिता ३१:५) त्याच्या सर्व कार्यात तो विश्वासू आहे, आणि त्याची सर्व अभिवचने खात्रीची आहेत कारण तो खोटे बोलू शकत नाही. (गणना २३:१९; १ शमुवेल १५:२९; तीत १:२) देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, “अनुग्रह आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण आहे.” पृथ्वीवर असताना पित्याकडून मिळालेले सत्य त्याने सांगितले. (योहान १:१४; ८:४०) शिवाय, येशूने, “पाप केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.” (१ पेत्र २:२२) आम्ही देवाचे आणि ख्रिस्ताचे खरे सेवक असल्यास, जणू “सत्याने कंबर” कसून आम्ही बोलण्यात आणि चांगल्या वर्तणुकीत सत्य असू. —इफिसकर ५:९; ६:१४.
१२. आम्ही सात्त्विक असण्यासाठी, कोणत्या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे?
१२ आम्ही सात्त्विक असलो, तर बोलण्याच्या असलेल्या काही प्रकारांना आम्ही टाळू. आम्ही पौलाच्या सल्ल्याप्रमाणे चालू: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये; तसेच अमंगळपण बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो.” (इफिसकर ४:३१; ५:३, ४) आमची नीतिमान हृदये आम्हाला गैरख्रिस्ती बोलणे टाळण्यासाठी भाग पाडीत असल्यामुळे, इतरांना आमच्या सहवासात राहण्याने तजेला मिळेल.
१३. ख्रिश्चनांनी जिभेवर नियंत्रण का ठेवले पाहिजे?
१३ देवाला खूष करण्याची इच्छा आणि सात्त्विक गोष्टी बोलण्याने आम्हाला आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. आमच्या पापी प्रवृत्तीमुळे, आम्ही सर्वजण अनेकदा अडखळतो. तथापि, शिष्य याकोब म्हणतो की ‘घोड्यांच्या तोंडात लगाम घातला’ तर आम्ही जिकडे त्यांना फिरवू तिकडे आज्ञाधारकपणे ते जातात. याप्रकारे आम्ही आमच्या जिभेला लगाम घातला पाहिजे आणि केवळ सात्त्विक मार्गानेच तिचा वापर केला पाहिजे. अनियंत्रण असलेली जीभ “सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव आहे.” (याकोब ३:१-७) या अभक्त जगाच्या हरप्रकारच्या दुष्ट लक्षणाचा संबंध कह्यात न ठेवलेल्या जिभेशी आहे. खोट्या साक्षी, शिवीगाळ आणि निंदा अशा हानी करणाऱ्या गोष्टींना ती जबाबदार आहे. (यशया ५:२०; मत्तय १५:१८-२०) आणि बेलगाम जीभ अपशब्द, टोमणा किंवा नालस्तीचा शेरा मारते तेव्हा ती मरणप्राय विषाने भरलेली असते.—स्तोत्रसंहिता १४०:३; रोमकर ३:१३; याकोब ३:८.
१४. ख्रिश्चनांनी बोलण्यातील दुहेरी दर्जांचा वापर करणे का टाळले पाहिजे?
१४ याकोब दाखवतो की, देवाच्या विषयी चांगले बोलण्याद्वारे त्याची ‘स्तुती करु शकणे’ परंतु तिचाच दुरुपयोग करुन माणसांना दुष्ट म्हणण्याद्वारे ‘त्यांच्यावर शाप’ देखील आणू शकणे ही केवढी विसंगतता आहे. सभेत देवाची स्तुती गाणे आणि बाहेर जाऊन समविश्वासूंबद्दल वाईट बोलणे किती पापमय आहे! एकाच झऱ्यातून गोड पाणी आणि कडू पाणी निघत नाही. आम्ही यहोवाची सेवा करीत आहोत तर अप्रिय शब्द बोलण्याऐवजी आम्ही सात्त्विक गोष्टी बोलल्या पाहिजेत अशी इतरांनी अपेक्षा करणे हे उचितच आहे. या कारणास्तव वाईट बोलण्याचा त्याग करुन आम्ही आमच्या सोबत्यांचा फायदा होईल अशा गोष्टी बोलू आणि आध्यात्मिकतेत त्यांची उभारणी करु या.—याकोब ३:९-१२.
सात्त्विकता आणि आमचे कार्य
१५. कपटी मार्गांचा आश्रय घेण्याचे टाळणे महत्त्वपूर्ण का आहे?
१५ ख्रिश्चनांचे विचार आणि बोलणे सात्त्विक असले पाहिजे तर मग आमच्या कार्याबद्दल काय? देवाची संमती मिळण्यासाठी वर्तनात सात्त्विक असणे हाच एक मार्ग आहे. यहोवाचा कोणताही सेवक सात्त्विकतेचा त्याग करु शकत नाही, अप्रमाणिकपणा व कपटीपणाचा आश्रय घेऊन व अशा गोष्टींना देवाची स्वीकृती असेल असा विचारही करणार नाही. नीतीसूत्रे ३:३२ म्हणते: “परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.” आम्ही यहोवा देवासोबत आमच्या संबंधाचा आनंद घेतल्यास, हानी घडवून आणणाऱ्या योजनांबद्दल विचारप्रवृत्त करायला लावणाऱ्या शब्दांना मनात शंका आणण्यापासून किंवा कोणत्याही अप्रामाणिक गोष्टी करण्यापासून आम्हाला दूर ठेवील. यहोवाच्या आत्म्याला द्वेष असणाऱ्या सात गोष्टींपैकी “दुष्ट योजना करणारे अंतःकरण” हे एक आहे! (नीतीसूत्रे ६:१६-१९) यास्तव, अशा गोष्टींना टाळून आमच्या सह मानवांच्या फायद्यासाठी व आमच्या स्वर्गीय पित्याच्या महिमेसाठी आपण सात्त्विक ते करीत राहू या.
१६. ख्रिश्चनांनी कोणत्याही दांभिक कृत्यात भाग का घेऊ नये?
१६ सात्त्विकता दाखवण्यासाठी आम्ही प्रामाणिक असले पाहिजे. (इब्रीयांस १३:१८) एखादा दांभिक व्यक्ती ज्याचे कार्य देवाच्या वचनानुसार नसले तर, तो सात्त्विक नाही. “दांभिक” यासाठी वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “जो उत्तर देतो” तो आणि तसेच रंगमंचावरील कलाकाराला देखील सूचित करतो. ग्रीक आणि रोमी कलाकार मुखवटा घालीत, त्यामुळे या शब्दाचा वापर, जो ढोंग करतो त्या रुपक अलंकाराने युक्त असलेल्यासाठी केला जाऊ लागला. दांभिक जन “अविश्वासू जन” आहेत. (लूक १२:४६ ची तुलना मत्तय २४:५०, ५१ बरोबर करा.) दांभिकता (हि․पोʹक्रि․सेस) याचा अर्थ दुष्टपणा आणि लबाड असाही होऊ शकतो. (मत्तय २२:१८; मार्क १२:१५; लूक २०:२३) एखाद्या भरवशाच्या व्यक्तिने केवळ ढोंगी हसण्याद्वारे, खुशामत करून आणि कार्याद्वारे फसवणे किती वाईट आहे! परंतु आम्ही भरवशालायक ख्रिश्चनांबरोबर संबंध ठेवीत आहोत हे माहीत असणे किती उत्तेजक आहे. आणि सात्त्विक असल्यामुळे व दांभिक नसल्यामुळे देव आम्हाला आशीर्वाद देतो. त्याचे अनुमोदन जे ‘निर्दंभ बंधुप्रेम’ आणि ‘निष्कपट विश्वास’ राखल्याने मिळते.—१ पेत्र १:२२; १ तीमथ्य १:५.
सात्त्विकता कार्यशील चांगुलपणा आहे
१७, १८. आम्ही आत्म्याच्या चांगुलपणाचे फळ प्रदर्शित करताना इतरांसोबत कसे वागू?
१७ आम्ही आमच्या विश्वासात सात्त्विकतेची भर घातली, तर विचार, बोलणे, आणि देवाला मान्य नसणाऱ्या गोष्टी करण्यापासून परावृत्त राहू. तथापि, ख्रिस्ती सात्त्विकता प्रगट करण्यास कार्यशील चांगुलपणाचीही जरुरी आहे. आणि चांगुलपणा यहोवाच्या पवित्र आत्म्याचे एक फळ आहे, ते केवळ मानवाच्या प्रयत्नांचे फळ नाही. (गलतीकर ५:२२, २३) आम्ही आत्म्याच्या चांगुलपणाचे फळ प्रदर्शित करु, तेव्हा इतरांविषयी चांगला विचार करण्याचा आमचा कल असेल आणि अपरिपूर्ण असतानाही चांगल्या कामाबद्दल आम्ही त्यांची स्तुती करु. त्यांनी यहोवाची सेवा अनेक वर्षांसाठी केली आहे का? तर मग आम्ही त्यांना आदर दाखवला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल व देवाला त्यांनी केलेल्या सेवेबद्दल चांगले बोलले पाहिजे. आमचा स्वर्गीय पिता त्याच्या नावासाठी ते दाखवित असलेल्या प्रीतीची आणि त्यांच्या विश्वासाच्या सात्त्विक कामाची आठवण ठेवतो, यामुळे आम्हीही तसे केले पाहिजे.—नहेम्या १३:३१अ; इब्रीयांस ६:१०.
१८ सात्त्विकता आम्हाला धीर, समजूतदारपणा, दयाशील बनविते. यहोवाचा सहउपासक विपत्तीचा किंवा खिन्नतेचा सामना करीत असेल तर आम्ही सांत्वनदायक शब्द बोलू आणि आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता जसे आम्हाला सांत्वन देतो तसा प्रयत्न आम्ही करु. (२ करिंथकर १:३, ४; १ थेस्सलनीकाकर ५:१४) जे दुःखी आहेत किंवा कदाचित प्रियजनांना मृत्युत गमावणाऱ्यांबद्दल आम्हाला सहानुभूती वाटते. दुःख शमविण्यासाठी आम्हाला काही करता आले तर आम्ही जरुर करु, कारण सात्त्विक आत्मा प्रेमळ परोपकारी कार्य करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो.
१९. आम्ही विचारात, शब्दात आणि क्रियात सात्त्विक असल्यामुळे इतरजन आमच्याबरोबर कसे वागतील?
१९ आम्ही यहोवाविषयी चांगले बोलण्याद्वारे जशी त्याची स्तुती करतो, तसेच जर आम्ही आमच्या विचारात, शब्दात, आणि कार्यात सात्त्विक असलो तर इतरजन ही निश्चितच आमची स्तुती करतील. (स्तोत्रसंहिता १४५:१०) एक सुज्ञ नीतीसूत्र म्हणते: “धार्मिकांच्या मस्तकी आशीर्वाद असतात; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.” (नीतीसूत्रे १०:६) दुष्ट आणि हिंसक व्यक्तिठायी सात्त्विकतेची उणीव असल्यामुळे इतरांना तो प्रिय वाटणार नाही. तो ज्याची पेरणी करतो त्याचीच कापणी करतो, कारण लोक त्याच्याविषयी चांगले ते बोलून त्याची प्रामाणिकपणे स्तुती करीत नाहीत. (गलतीकर ६:७) यहोवाच्या सेवकांप्रमाणे विचार, बोलणे आणि विविध मार्गांनी कार्य करणे किती बरे आहे! ते इतरांची प्रीती, भरवसा आणि आदर जिंकतात यामुळे इतर त्यांची स्तुती आणि त्यांच्याविषयी चांगले बोलण्यास पुढे होतात. याशिवाय, त्यांच्या ईश्वरी सात्त्विकतेचा परिणाम यहोवाच्या अमुल्य आशीर्वादात होत असतो.—नीतीसूत्रे १०:२२.
२०. यहोवाच्या लोकांच्या मंडळीवर सात्त्विक विचार, बोलणे आणि कृत्यांचा कसा परिणाम होऊ शकतो?
२० सात्त्विकता, विचार, बोलणे आणि कार्य यांचा यहोवाच्या लोकांच्या मंडळीला निश्चितच फायदा होतो. सहविश्वासूंजवळ दुसऱ्यासाठी आपुलकी, आदर असेल तर, त्यांच्यामध्ये बंधुप्रीती वाढत जाते. (योहान १३:३४, ३५) सात्त्विक बोलणे यासोबत प्रामाणिक शाबासकी आणि उत्तेजनामुळे सहकार्य आणि एकतेची उबदार भावना वाढवते. (स्तोत्रसंहिता १३३:१-३) आणि उत्तेजक, सात्त्विक कार्य अशाचप्रकारे प्रतिसाद देण्यास इतरांना उत्तेजन देते. याही पेक्षा अधिक म्हणजे, ख्रिस्ती सात्त्विकतेच्या सरावाचा परिणाम आमचा सात्त्विक स्वर्गीय पिता, यहोवाकडील संमती आणि आशीर्वादात होईल. यास्तव आम्ही देवाच्या मौल्यवान अभिवचनांवर विश्वास प्रदर्शित करण्याद्वारे प्रतिसाद देण्याचे आमचे एक लक्ष्य बनवू या. आणि निश्चितच आमच्या विश्वासात सात्त्विकतेची भर घालण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करू या.
तुमची उत्तरे काय आहेत?
▫ “सात्त्विकता” याची व्याख्या तुम्ही कशी कराल, आणि अपरिपूर्ण लोक सात्त्विक का असू शकतील?
▫ सात्त्विकता कोणत्या प्रकारच्या विचाराची मागणी करते?
▫ सात्त्विकतेचा आमच्या बोलण्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?
▫ सात्त्विकतेचा आमच्या कार्यावर कोणता परिणाम होण्यास हवा?
▫ सात्त्विक असल्याचे काही फायदे कोणते आहेत?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२९ पानांवरील चित्रं]
झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड आणि कडू पाणी निघत नसल्यामुळे, यहोवाच्या सेवकांनी सात्त्विक गोष्टीच बोलाव्यात याची इतरजन उचितपणे अपेक्षा करतील