ख्रिस्तीजन आणि आजचा मानवी समाज
ख्रिस्तीजन आणि आजचा मानवी समाज
“माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.”—मत्तय २४:९.
१. ख्रिश्चनत्वाचे कोणते भिन्नतादर्शक चिन्ह आहे?
सुरवातीच्या ख्रिश्चनांचे जगापासून वेगळे असणे हे भिन्नत्वदर्शक चिन्ह होते. त्याचा स्वर्गीय पिता, यहोवाला प्रार्थना करताना, ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांविषयी म्हटले: “मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.” (योहान १७:१४) पंतय पिलातासमोर आणल्यावर, येशूने म्हटले: “माझे राज्य ह्या जगाचे नाही.” (योहान १८:३६) जगापासून प्राचीन काळच्या ख्रिस्ती धर्माचा वेगळेपणा ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांनी आणि इतिहासकारांनी सिद्ध केला आहे.
२. (अ) वेळ निघून जात असता, येशूच्या अनुयायांच्या व जगाच्या नातेसंबंधात काही बदल होणार होता का? (ब) येशूचे राज्य राष्ट्रांच्या रुपांतराद्वारे येणार होते का?
२ येशूने, त्याच्या अनुयायांच्या व जगाच्या नातेसंबंधात काही बदल होईल आणि त्याचे राज्य जगाच्या रुपांतराद्वारे ख्रिस्ती धर्मात येईल असे काही प्रगट केले होते का? नाही. येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांना जे लिहिण्यास प्रेरित करण्यात आले त्यात अशा प्रकारचा कोणताही संकेत सापडत नाही. (याकोब ४:४ [इ.स. ६२च्या आधी लिहिले]; १ योहान २:१५-१७; ५:१९ [इ.स. ९८ मध्ये लिहिले]) उलटपक्षी, पवित्र शास्त्र येशूची “उपस्थिती” व त्याचे राज्याधिकारात “येणे” हे “युगाची समाप्ती” कळसाला पोहोचणे व तिचा “शेवट” किंवा नाश याच्याशी जोडते. (मत्तय २४:३, १४, २९, ३०; दानीएल २:४४; ७:१३, १४) येशूने त्याच्या उपस्थितीचे किंवा प․रो․सिʹयाचे चिन्ह दिले, तेव्हा त्याने त्याच्या खऱ्या अनुयायांना म्हटले: “तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हांस धरुन देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व रा तुमचा द्वेष करतील.”—मत्तय २४:९.
आजचे खरे ख्रिश्चन
३, ४. (अ) सुरवातीच्या ख्रिश्चनांविषयी कॅथोलिक विश्वकोश कसे वर्णन देतो? (ब) यहोवाचे साक्षीदार व सुरवातीच्या ख्रिश्चनांचे वर्णन कोणत्या सारख्याच शब्दात केले आहे?
३ आज कोणत्या धार्मिक समुदायातील सदस्यांचा द्वेष व छळ होत असतानी त्यांनी ख्रिस्ती तत्त्वांची व जगापासून वेगळे राहण्याच्या विश्वासूपणाची प्रतिष्ठा मिळवली आहे? कोणत्या जगव्याप्त ख्रिस्ती संस्थेचे वर्णन सुरवातीच्या ख्रिश्चनांच्या ऐतिहासिकतेच्या प्रत्येक बाबीसंबधी जुळते? याविषयी न्यू कॅथोलिक एन्साक्लोपिडीया म्हणते: “प्राचीन काळच्या ख्रिस्ती समाजाचा, जरी यहुदी सामाजिक परिस्थितीमधील आणखी एक पंथ म्हणून विचार केला जात होता, तो त्याच्या धर्मशास्त्राच्या शिकवणीत ते अतुलनीय शाबीत केले व खासपणे त्याच्या सदस्यांचा आवेश, ज्यांनी “यरुशलेमेत, सर्व यहूदीयांत, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्ष देण्याकरता साक्षीदार या नात्याने कार्य केले. (प्रे. कृत्ये १:८).”—खंड ३, पृष्ठ ६९४.
४ “दुसऱ्या पंथाचा . . . विचार केला गेला,” “त्याच्या शिक्षणात . . . एकमेव,” साक्षीदार या नात्याने . . . आवेश” हे शब्दप्रयोग ध्यानात घ्या. व आता तोच विश्वकोश यहोवाच्या साक्षीदारांचे कसे वर्णन देतो याकडे लक्ष द्या: “एक पंथ या नात्याने साक्षीदारांना पूर्णपणे याची खात्री आहे की अंत लवकरच काही वर्षात येणार आहे. त्यांच्या अविश्रांत आवेशामागे भाग पाडावयास लावणाऱ्या शक्तीतून हा विश्वास स्पष्ट दिसत आहे. . . . येणाऱ्या राज्याची साक्ष देण्याची प्रत्येक सदस्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. . . . पवित्र शास्त्राला ते विश्वासाचा एकमात्र स्रोत व वर्तनाचे नियम मानतात . . . या किंवा त्या मार्गाने एका खऱ्या साक्षीदाराने प्रभावकारी पद्धतीने प्रचार केलाच पाहिजे.”—खंड ७, पृष्ठे ८६४-५.
५. (अ) यहोवाच्या साक्षीदारांचे शिक्षण कोणत्या बाबतीत एकमेव आहे? (ब) यहोवाच्या साक्षीदारांचा विश्वास शास्त्रवचनानुरुप असल्याची उदाहरणे द्या.
५ कोणत्या विशिष्ट बाबीविषयी यहोवाच्या साक्षीदारांचे शिक्षण अतुलनीय आहे? न्यू कॅथोलिक एन्साक्लोपिडीया काही स्पष्ट करते: “ते [यहोवाचे साक्षीदार] त्रैक्याचा विदेशी मूर्तीपूजा आहे म्हणून निषेध करतात . . . यहोवाच्या साक्षीदारांमधील सर्वथोर येशू ख्रिस्त आहे असा ते विचार करतात, ‘एक देव’ (असे योहान १.१ चे ते भाषांतर करतात), तो केवळ यहोवापेक्षा कमी दर्जाचा आहे. . . . तो मनुष्य असा मरण पावला व अमर आत्मिक पुत्र अशारितीने त्याला उठविले गेले. त्याचे दुःख आणि मृत्यूच्या दिलेल्या किंमतीमुळे, मानवजातीला पुन्हा या पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. खरोखर पृथ्वीवरील नंदनवनाची आशा केलेला ‘मोठा लोकसमुदाय’ (Ap ७.९); केवळ १,४४,००० विश्वासूजन (Ap ७.४; १४.१, ४) ख्रिस्तासोबत स्वर्गाच्या महिमेचा आनंद घेतील. दुष्टांचा समूळ नाश केला जाईल. . . . बाप्तिस्मा—साक्षीदार पाण्यात बुडवून घेतात . . . यहोवा देवाच्या सेवेसाठी समर्पणाचे बाह्य द्योतक आहे. . . . रक्त संक्रमण स्विकारण्याचे नाकारल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना प्रसिद्धी मिळत आहे . . . त्यांच्या वैवाहिक व लैंगिक नैतिकता न बदलणाऱ्या आहेत.” यहोवाचे साक्षीदार या बाबतीत एकमेव आहेत, परंतु ह्या सर्व बाबीसंबंधाने त्यांची भूमिका दृढपणे पवित्र शास्त्रावर आधारित आहे.—स्तोत्रसंहिता ३७:२९; मत्तय ३:१६; ६:१०; प्रे. कृत्ये १५:२८, २९; रोमकर ६:२३; १ करिंथकर ६:९, १०; ८:६; प्रकटीकरण १:५.
६. यहोवाचे साक्षीदार कोणता पवित्रा राखतात? का बरे?
६ न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडीया पुढे म्हणते की, १९६५ मध्ये (असे दिसते की त्या वर्षी लेख लिहिला गेला होता) “ज्या सामाजिक संस्थेत साक्षीदार राहात होते, तिचे भाग आहेत असे ते समजत नव्हते.” लेखकाने असा कदाचित विचार केला असेल की वेळ जसा निघून गेला, व साक्षीदार पुष्कळ झाले, आणि “पंथास विरोध करणारी अधिकाधिक चर्चची वैशिष्ट्ये घेतली” तेव्हा ते जगाचा भाग होतील. परंतु ही गोष्ट खरी झाली नाही. आज, १९६५ मध्ये जितके साक्षीदार होते त्याच्या चौपट त्यांची संख्या आहे, या जगाच्या संबंधात यहोवाच्या साक्षीदारांनी सतत त्यांचा पवित्रा टिकवला आहे. जसा येशू “जगाचा नव्हता” तसे “तेही जगाचे नाहीत.”—योहान १७:१६.
वेगळे पण प्रतिकूल नाही
७, ८. सुरवातीच्या ख्रिश्चनांच्या बाबतीत जे सत्य होते तसेच आज यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत काय सत्य आहे?
७ सुरवातीच्या ख्रिश्चनांच्या संरक्षणाविषयी दुसऱ्या शतकातील क्षमायाचक जस्टीन मार्टर, रॉबर्ट एम. ग्रान्ट यांनी त्याच्या अर्ली ख्रिश्चॅनिटी ॲन्ड सोसायटी या पुस्तकात उद्धृत केले: “ख्रिश्चन क्रांतीकारी असते तर त्यांनी त्यांचे ध्येय लपून पूर्ण केले असते . . . शांती आणि चांगल्या व्यवस्थेच्या कारणांसाठी ते सम्राटाच्या निकटच्या नातेसंबंधात बांधलेले असे आहेत.” अशाचरितीने, आज संपूर्ण जगभरात यहोवाचे साक्षीदार शांती-प्रिय आणि सुव्यवस्थित नागरिक असल्याची ख्याती आहे. कोणत्याही प्रकारचे सरकार असले तर त्यांना माहीत आहे की यहोवाच्या साक्षीदारांकडून त्यांना कशाचेही भय नाही.
८ उत्तर अमेरिकेतील एका संपादकाने लिहिले: “यहोवाच्या साक्षीदारांची भूमिका कोणत्याही राज्यकारभाराच्या पद्धतीला एक प्रकारचे भय आहे अशी कल्पना सकुंचित मनाची व असाध्य वेडाची आहे; ते एका धार्मिक मंडळीप्रमाणे उलथून पाडणारे नाहीत तर शांती-प्रिय आहेत.” जीन-पैरी कॅटलन त्यांच्या लोऑब्जेक्शन डी कॉनशन्स (सद्सद्विवेक बुद्धिचा आक्षेप) या पुस्तकात लिहितात: “साक्षीदार अधिकाऱ्यांच्या पूर्णपणे अधीन आहेत व ते सामान्यपणे नियमाचे पालन करतात; ते त्यांचा कर भरतात व सरकारला प्रश्न विचारण्याचे, बदलण्याचे किंवा नाश करण्याचे प्रयत्न करीत नाही, जगाच्या भानगडीविषयी ते जास्त काळजी करीत बसत नाहीत.” कॅटलन आणखी म्हणतात की जर राष्ट्राने, यहोवाला त्यांनी पूर्णपणे समर्पित केलेले त्यांचे जीवन याविषयी दावा केला तर यहोवाचे साक्षीदार त्याचे पालन करण्यास नकार देतात. या प्रकारे ते सुरवातीच्या अगदी ख्रिश्चनांसारखे आहेत.—मार्क १२:१७; प्रे. कृत्ये ५:२९.
शासन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गैरसमज
९. जगापासून विभक्त होण्यासंबंधी, सुरवातीच्या ख्रिश्चनांमध्ये व आधुनिक दिवसातील कॅथोलिकांमध्ये कोणता उल्लेखनीय फरक आहे?
९ अनेक रोमी सम्राटांचा सुरवातीच्या ख्रिश्चनांविषयी गैरसमज होता. दि एपीस्टल टू डायोग्नेटसचा काहींनी दुसऱ्या शतकापासून आहे असा विचार केला ते दाखविते: “ख्रिश्चन जगात राहात होते, परंतु जगाबरोबर ते स्वतःला गुरफटत नव्हते.” याच्या दुसऱ्या बाजूला पाहता, दुसरी व्हॅटिकन परिषद चर्चवर ठासून प्रतिपादलेल्या घटनेत, कॅथोलिकांनी “देवाच्या राज्याचा शोध जगाच्या कार्यात सामील होऊन केला पाहिजे” आणि “ज्या जगात राहात आहोत त्याच्या पवित्रीकरणासाठी काम केले पाहिजे” असे स्पष्ट केले.
१०. (अ) राज्यकारभार करणाऱ्या सत्तांधिशांचा सुरवातीच्या ख्रिश्चनांबद्दल कोणता दृष्टिकोन होता? (ब) यहोवाच्या साक्षीदारांबद्दल अनेकदा कोणता दृष्टिकोन बाळगला जातो, आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे?
१० इतिहासकार एच. जी. हार्डी असे विधान करतात की रोमी सम्राट सुरवातीच्या ख्रिश्चनांचा विचार “काहीसे निंद्य कळकळ असणारे असा करीत असे.” फ्रेंच इतिहासकार ऐटिन ट्रॉकमेʹ “अनादराच्या संस्कृतीवर आधारलेल्या ग्रीक आणि रोमी हुद्यांचा विचार ते फारच विचित्र पौर्वात्य [ख्रिश्चनांचा] पंथ म्हणून करीत.” प्लिनी द यंगर बेथानियातील रोमी सरकार आणि सम्राट ट्रॅजन यामधील पत्रव्यवहार दाखवतो की खऱ्या ख्रिस्ती धर्माच्या सत्य परिस्थितीचे राज्यकारभार चालविणारे वर्ग सामान्यपणे दुर्लक्ष करीत. अशाचप्रकारे आज, जगातील राज्यकारभार चालविणाऱ्या वर्गांचे यहोवाच्या साक्षीदारांविषयी गैरसमज होतात आणि एवढेच नव्हे तर ते त्यांना तुच्छ देखील लेखतात. तथापि, यामुळे साक्षीदारांना आश्चर्य वाटत नाही किंवा त्यांची त्रेधा उडत नाही.—प्रे. कृत्ये ४:१३; १ पेत्र ४:१२, १३.
“त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात”
११. (अ) सुरवातीच्या ख्रिश्चनांविषयी काय म्हटले गेले आणि यहोवाच्या साक्षीदारांविषयी काय म्हटले जात आहे? (ब) यहोवाचे साक्षीदार राजकारणात भाग का घेत नाहीत?
११ सुरवातीच्या ख्रिश्चनांविषयी असे म्हटले जात होते: “ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.” (प्रे. कृत्ये २८:२२) दुसऱ्या शतकात, मूर्तीपूजक सेल्सस याने दावा केला की, ख्रिस्ती धर्माचे मानवी समाजाच्या खालच्या स्थरालाच केवळ आकर्षण आहे. अशाचप्रकारे यहोवाच्या साक्षीदारांविषयी असे म्हटले गेले आहे की ते अनेक भागातून, आमच्या समाजातील वंचित जनांमधून आलेले आहेत.” चर्चचे इतिहासकार ऑगस्टस नेयॉन्डर यांनी अहवाल दिला की “जगासाठी मृत मनुष्ये आणि जीवनाच्या सर्व बाबतीत निर्जीव असे ख्रिश्चनांना दर्शवले जात होते; . . . असे विचारले गेले की जर आम्ही सर्व त्यांच्यासारखे झालो तर जीवनाच्या कर्तव्याविषयी काय होईल?” या कारणामुळे यहोवाचे साक्षीदार राजकारणात भाग घेत नाहीत, समाजातील अर्थहीन मनुष्य हा आरोप अनेकदा त्यांच्यावर लावण्यात येतो. परंतु राजकारणातील कार्य आणि सोबतच देवाचे राज्य हीच केवळ मानवजातीसाठी आशा आहे याची घोषणा करणे कसे होऊ शकते? यहोवाचे साक्षीदार प्रेषित पौलाचे शब्द मनाला लावून घेतात: “ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यांत गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करुन घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे.”—२ तीमथ्य २:३, ४.
१२. वेगळेपणाच्या कोणत्या खास पैलूमध्ये यहोवाचे साक्षीदार सुरवातीच्या ख्रिश्चनांसारखे आहेत?
१२ अ हिस्ट्री ऑफ ख्रिश्चॅनिटी या त्यांच्या पुस्तकात प्राध्यापक के. एस. लॅटोरीटी लिहितात: “सुरवातीच्या ख्रिश्चनांचा युद्धात भाग घेण्याविषयी ग्रासो-रोमी जगाबरोबर हा एक तीव्र मतभेद होता. आमच्या काळापर्यंत टिकून राहिलेली पहिल्या तीन शतकातील कोणतीही ख्रिस्ती लिखाणे ख्रिश्चनांनी युद्धामध्ये भाग घ्यावा अशी माहिती देत नाहीत.” द हिस्ट्री ऑफ द डिक्लाईन ॲन्ड फॉल ऑफ द रोमन एम्पायर याविषयी एडवर्ड गिबोन्स् आपल्या गंथात असे विचार व्यक्त करतात: “एखाद्या ख्रिश्चनाने, अति पवित्र सेवेचा त्याग केल्याशिवाय, शिपायाची, न्यायाधिशाची, किंवा राजपुत्राची भूमिका स्वीकारणे त्याच्यासाठी अशक्य होते.” यहोवाचे साक्षीदार अशाचरितीने पूर्णपणे तटस्थतेची भूमिका स्वीकारतात आणि यशया २:२-४ व मत्तय २६:५२ मध्ये नमूद केलेल्या पवित्र शास्त्राच्या तत्त्वाचे अनुकरण करतात.
१३. कोणता दोषारोप यहोवाच्या साक्षीदारांवर लादण्यात आला आहे परंतु वास्तविकता काय प्रगट करते?
१३ यहोवाच्या साक्षीदारांवर त्यांचे शत्रू कुटुंबाला विभक्त करण्याचा आरोप लावतात. हे खरे आहे की कुटुंबातील एक किंवा अधिक सदस्य यहोवाचे साक्षीदार झाल्यामुळे कुटुंब विभक्त झाल्याची काही उदाहरणे आहेत. असे होईल हे येशूने आधीच सांगितले होते. (लूक १२:५१-५३) तथापि, आकडेवारी दाखवते की, ह्या कारणासाठी तुटलेले विवाह त्याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ, फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांमधील तीन विवाहांतील एकात विवाहाचा सोबती साक्षीदार नाही. तद्वत, साक्षीदार असलेल्या व साक्षीदार नसलेल्या विवाहातील घटस्फोटाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त नाही. ते का बरे? प्रेषित, पौल व पेत्राने अविश्वासूजनांशी विवाह केलेल्या ख्रिश्चनांना ईश्वरप्रेरणेने सुज्ञतेचा सल्ला दिला, आणि यहोवाचे साक्षीदार त्यांच्या शब्दांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. (१ करिंथकर ७:१२-१६; १ पेत्र ३:१-४) असे मिस्र विवाह तुटले तर नेहमीच सर्वदा अविश्वासू-साक्षीदाराकडून प्रथम सुरवात होते. दुसऱ्या बाजूला पाहता, वैवाहिक सोबती यहोवाचा साक्षीदार झाल्यामुळे व पवित्र शास्त्राच्या तत्त्वांना त्यांच्या जीवनात अनुकरणात आणीत असल्यामुळे हजारो विवाह बचावले आहेत.
ख्रिश्चन, त्रैक्यवादी नाहीत
१४. कोणता दोषारोप सुरवातीच्या ख्रिश्चनांविरुद्ध लावला होता, आणि तो उपरोधिक का होता?
१४ रोमी साम्राज्यात सुरवातीच्या ख्रिश्चनांवर लावलेल्या दोषारोपामधील एक आरोप ते नास्तिक आहेत हे उपरोधिक आहे. डॉ. ऑगस्टस नेयॉन्डर लिहितात: “ज्यांनी मूर्तीपूजक दैवतांना नाकारले, ते नास्तिक, . . . लोकांमध्ये स्पष्टपणे ह्या नावाने त्या ख्रिश्चनांची ओळख होती.” ‘देव नाहीत तर मनुष्याच्या हातांनी घडलेल्या काष्ठ-पाषाणांची’ भक्ती करणाऱ्या मूर्तिपूजकांनी अनेक दैवतांची नव्हे तर, जिवंत सृष्टीकर्त्याची, उपासना करणाऱ्या ख्रिश्चनांना नास्तिक म्हणणे किती विचित्रतेचे दिसते.—यशया ३७:१९.
१५, १६. (अ) यहोवाच्या साक्षीदारांविषयी काही धार्मिकवेत्त्यांनी काय म्हटले, परंतु यामुळे कोणते प्रश्न उभे राहतात? (ब) काय दाखवते की यहोवाचे साक्षीदार खरेच ख्रिश्चन आहेत?
१५ त्याचप्रकारे उपरोधिकपणे आज, ख्रिस्ती धर्मजगतातील काही अधिकारी यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती आहेत ह्या वस्तुस्थितीला नाकारतात. का बरे? कारण साक्षीदार त्रैक्याचा अव्हेर करतात. ख्रिस्ती धर्मजगताच्या कलाटणी देणाऱ्या व्याख्येनुसार, “ख्रिस्ताचा देव म्हणून स्वीकार करणारे ख्रिश्चन आहेत.” याच्या उलटपक्षी, आधुनिक शब्दकोश “ख्रिश्चन” या नामाची व्याख्या “येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी आणि त्याच्या शिक्षणानुसार चालणारी व्यक्ती” अशी करते आणि “ख्रिश्चन धर्म” “येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवर आधारित असलेला धर्म व तो देवाचा पुत्र होता असा विश्वास” अशी करते. कोणत्या समुदायाला ही व्याख्या अधिक जवळून स्वतःच्या बाबतीत लागू होते?
१६ यहोवाचे साक्षीदार येशू कोण आहे याबाबत त्याच्या स्वतःच्या साक्षीचा स्वीकार करतात. त्याने म्हटले: “मी देवाचा पुत्र आहे,” “मी देव जो पुत्र आहे” असे म्हटले नाही. (योहान १०:३६; पडताळा योहान २०:३१.) ख्रिस्ताच्या बाबतीत प्रेषित पौलाच्या ईश्वरप्रेरीत शब्दप्रयोगाचा ते स्वीकार करतात: “तो देवाच्या स्वरुपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही.” * (फिलिप्पैकर २:६) पेगनिझम इन आवर टाईम हे पुस्तक स्पष्ट करते: “येशू ख्रिस्ताने त्रैक्यातील एकतेविषयी कधीही काही सांगितले नाही, आणि नवीन करारात कोठेही ‘त्रैक्य’ हा शब्द आलेला नाही. चर्चने ही कल्पना आमच्या प्रभूच्या मरणानंतर तीनशे वर्षांनी स्वीकारली आहे; व या कल्पनेचा उगम पूर्णपणे मूर्तीपूजकातून आहे.” ख्रिस्ताच्या पवित्र शास्त्रीय शिकवणीचा यहोवाचे साक्षीदार स्वीकार करतात. ते ख्रिश्चन आहेत, त्रैक्यवादी नाहीत.
चर्चमंडळवाद नाही
१७. यहोवाचे साक्षीदार चर्चमंडळाच्या किंवा अंतर्विश्वासाच्या चळवळीमध्ये भाग का घेत नाहीत?
१७ आणखी दोन आरोप यहोवाच्या साक्षीदारांवर लावण्यात आले की ते चर्चच्या पूर्णमंडळाच्या चळवळीत भाग घेण्यास नकार देतात आणि ते “भांडखोर धर्मांतर घडवून आणणारे” आहेत. हेच दोन्ही दोषारोप सुरवातीच्या ख्रिश्चनांवर लादण्यात आले. ख्रिस्ती धर्मजगत तिच्या कॅथोलिक, सनातन मतवादी आणि प्रॉटेस्टंटमधील घटक हे ह्या जगाचे नाकारता न येणारे भाग आहेत. येशूप्रमाणेच, यहोवाचे साक्षीदार “या जगाचे नाहीत.” (योहान १७:१४) ते अंतर्विश्वासाच्या चळवळीद्वारे ख्रिस्ती नसणारे वर्तन आणि विश्वास वाढविणाऱ्या धार्मिक संस्थांच्यासोबत संबंध कसे जोडतील?
१८. (अ) यहोवाचे साक्षीदारच केवळ खऱ्या धर्माचे अनुकरण करीत आहेत असा दावा ते करतात तेव्हा त्याबद्दल त्यांची टीका का केली जाऊ शकत नाही? (ब) त्यांचा धर्म खरा आहे असा विश्वास असला तरी, रोमन कॅथोलिकांजवळ काय नाही?
१८ सुरवातीच्या ख्रिश्चनांप्रमाणेच तेच केवळ खऱ्या धर्माचे अनुकरण करीत असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासावर न्याय्यपणे कोण टीका करु शकतात? चर्चमंडळाच्या चळवळीला सहभाग देण्याचा दांभिकपणे दावा करणारे कॅथोलिक चर्चसुद्धा घोषित करते: “आम्ही असा विश्वास ठेवतो की हा एक खरा धर्म कॅथोलिक आणि प्रेषितीय चर्चमध्ये कायम राहावा, प्रभू येशूने, सर्व लोकांत त्याचा प्रसार व्हावा म्हणून त्याची नेमणूक दिली, त्याने त्याच्या प्रेषितांना म्हटले: ‘तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा.’” (व्हॅटिकन कौन्सिल २, “धार्मिक मुक्ततेवर घोषणा”) कॅथोलिकांना, शिष्य बनविण्यासाठी लागणारा न थकणारा आवेश वाढविण्यास असा वरकरणी विश्वास पुरेसा नाही.
१९. (अ) काय करण्याचा निश्चय यहोवाचे साक्षीदार बाळगतात आणि कोणत्या उद्देशास्तव? (ब) पुढील लेखात कशाचे परिक्षण केले जाईल?
१९ यहोवाच्या साक्षीदारांना असा आवेश आहे. त्यांनी असे करावे अशी जोवर देवाची इच्छा आहे, ते साक्ष देत आहेत. (मत्तय २४:१४) त्यांचे साक्ष देणे आवेशीपणाचे आहे, भांडखोरपणाचे नाही. हे मानवजातीवरील द्वेषाने नव्हे तर शेजाऱ्यावरील प्रीतीने व्यक्त होते. ते असा विश्वास बाळगतात की अधिक मानवजातीचा बचाव व्हावा. (१ तीमथ्य ४:१६) सुरवातीच्या ख्रिश्चनांप्रमाणेच ते ‘सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राह’ण्याचा प्रयत्न करतात. (रोमकर १२:१८) कशाप्रकारे ते हे करतात याविषयी पुढील लेख चर्चा करील.
[तळटीपा]
^ त्रैक्याच्या शिकवणीसंबंधी, या उताऱ्याच्या चर्चेसाठी द वॉचटावर, जून १५, १९७१, पृष्ठे ३५५-६ पहा.
पुनरावलोकन
▫ सुरवातीच्या ख्रिश्चनांचे विशेष लक्षण कोणते होते, आणि कशाप्रकारे यहोवाचे साक्षीदार त्यांच्यासारखेच आहेत?
▫ कोणत्या गोष्टीद्वारे यहोवाचे साक्षीदार दाखवतात की ते चांगले नागरीक आहेत?
▫ राज्यकारभारातील सत्तांधिशांचा यहोवाच्या साक्षीदारांविषयी कोणता दृष्टिकोन होता आणि आज यात काही फरक आहे का?
▫ त्यांच्याजवळ सत्य आहे ही साक्षीदारांची विश्वसनीयता त्यांना काय करण्यास प्रवृत्त करते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांनी साक्ष देत राहावे अशी देवाची इच्छा आहे तोवर ते तसे निश्चयाने करीत राहतील
[१४ पानांवरील चित्रं]
पिलाताने म्हटले: “पहा! हा मनुष्य”—या जगाचा भाग नसलेला