यहोवा कोण आहे?
यहोवा कोण आहे?
“कोण परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आहे?” हा प्रश्न ३,५०० वर्षांपूर्वी इजिप्तच्या [मिसर] गर्विष्ठ फारो राजाने विचारला होता. “मी त्या परमेश्वराला [यहोवा, न्यू.व.] जाणत नाही,” असे उद्धटपणे म्हणण्यास त्याला प्रवृत्त केले. फारोसमोर उभ्या असलेल्या दोन मनुष्यांना मात्र यहोवा कोण होता हे माहीत होते. ते इस्राएली कुळातील लेवीच्या वंशाचे दोघे भाऊ मोशे व अहरोन होते. इजिप्तच्या [मिसर] शासकाकडे जाऊन, इस्राएली लोकांना रानांत उत्सव करण्यासाठी सोडून द्यावे हे सांगण्यासाठी यहोवाने त्यांना पाठविले होते.—निर्गम ५:१, २.
फारोला त्याच्या प्रश्नाचे उत्तर नको होते. त्याच्या अधिकाराखाली, याजकांनी शेकडो खोट्या दैवतांची उपासना करण्याचे चेतविले. अहा, स्वतः फारोला देखील एक देव मानण्यात आले होते! इजिप्तच्या [मिसर] दंतकथेनुसार, रा या सूर्य-देवाचा तो पुत्र होता व बहिरी ससाण्याचे डोके असलेल्या होरस देवताचे अवतार होता. फारोला “शक्तीमान देव” आणि “अनंत” अशा नावांनी बोलावले जात. यामुळे यात काही आश्चर्याचे नाही की जेव्हा त्याने तिरस्काराने विचारले की: “हा कोण परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] की ज्याचे मी ऐकू?”
मोशे आणि अहरोनाला या प्रश्नाचे उत्तर देण्याची आवश्यकता नव्हती. त्या काळी इजिप्तच्या [मिसरी] दास्यत्वात इस्राएली लोक त्रास सहन करत होते. हे लोक यहोवाची देव म्हणून भक्ती करीत होते हे फारोला ठाऊक होते. परंतु नंतर लवकरच फारो आणि सर्व इजिप्तच्या [मिसर] लोकांना यहोवाच एक खरा परमेश्वर आहे हे कळणार होते. अशाचप्रकारे आजही, यहोवा त्याचे नाव आणि देवत्व पृथ्वीवरील सर्वांना प्रकट करणार आहे. (यहेज्केल ३६:२३) प्राचीन इजिप्तमध्ये [मिसर] यहोवाने त्याचे नाव कसे महान केले याचा विचार केल्याने आम्हाला फायदा होऊ शकतो.
इजिप्तच्या देवांपेक्षा श्रेष्ठ
फारोने उद्धटपणे विचारले, कोण यहोवा होता, तेव्हा यामुळे काही परिणाम होतील याची तेव्हा त्याने अपेक्षा केली नाही. हे परिणाम नंतर त्याने प्रत्यक्षात अनुभवले. इजिप्तवर [मिसर] दहा पीडा आणण्याद्वारे स्वतः यहोवाने प्रतिसाद दिला. त्या पीडा राष्ट्रांच्या विरुद्ध केवळ तडाखाच नव्हत्या. त्या इजिप्तच्या [मिसर] देवांच्या विरुद्ध तडाखा होत्या.
इजिप्तच्या [मिसर] दैवतांवर यहोवाचे श्रेष्ठत्व त्या पीडांनी प्रगट केले. (निर्गम १२:१२; गणना ३३:४) यहोवाने, नाईल नदीचे पाणी आणि इजिप्तच्या [मिसर] सर्व पाण्याचे रुपांतर रक्तात केले तेव्हा केवढा गलबला झाला त्याची कल्पना करा! या चमत्काराद्वारे फारो आणि त्याच्या लोकांना हे समजले की यहोवा त्यांचा नाईल-देव, हापी यापेक्षा श्रेष्ठ आहे. नाईलमधील मत्स्यांचा मृत्यूसुद्धा इजिप्तच्या [मिसर] धर्माला चांगला तडाखा होता, कारण काही विशिष्ट प्रकारच्या मत्स्यांची भक्ती केली जात होती.—निर्गम ७:१९-२१.
पुढे, यहोवाने इजिप्तवर [मिसर] बेडकांची पीडा आणली. हे इजिप्तच्या [मिसर] बेडूक-देवता, हेक्टसाठी लज्जास्पद होते. (निर्गम ८:५-१४) तिसऱ्या पीडेने जादू करणाऱ्या याजकांना गोंधळून टाकले, धुळीच्या उवा बनविण्यात ते अपयशी झाले होते. ते ओरडले की “यात देवाचा हात आहे!” (निर्गम ८:१६-१९) इजिप्तच्या [मिसर] थॉथ देवाला मंत्रतंत्राचा शोध लावण्याचा मोठेपणा दिला जात होता, त्याला त्या ढोग्यांना मदत करण्यात अपयश आले.
यहोवा कोण होता हे फारोला शिकायला मिळाले. मोशेद्वारे यहोवा असा देव होता जो त्याच्या उद्देशाची घोषणा करु शकत होता व नंतर इजिप्तच्या [मिसर] लोकांवर चमत्कारीक पीडा आणण्याद्वारे ते तो पूर्ण करु शकत होता. यहोवा त्याच्या इच्छेप्रमाणे तडाख्याचा आरंभ व अंत देखील करु शकत होता. तथापि, या ज्ञानाने, फारोला यहोवाच्या अधीन केले नाही. उलटपक्षी, इजिप्तच्या [मिसर] गर्विष्ठ शासकाने हट्टीपणाने सतत यहोवाचा विरोध केला.
गोमाशांच्या चवथ्या पीडेने देशाची खराबी झाली. कदाचित थवेच्या थवे हवेच्याद्वारे घरात शिरले, त्या गोमाशा शू देवाच्या किंवा स्वर्गाची राणी आयसिस देवतेच्या, भक्तीचे मूर्तीमंत साधन होत्या. या किटकासाठी असलेला इब्री शब्द “गोमाशी” “गोचीड” आणि “बिटल” (एक प्रकारचा किडा) (न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन; सेप्ट्युजंट; यंग) इजिप्तच्या [मिसर] लोकांनी पवित्र मानलेल्या कीटकांच्या पीडांमध्ये स्कॅरब नावाच्या कीटकाचाही समावेश असता तर त्यांच्या पायाखाली तुडविल्याशिवाय त्यांना चालता आले नसते. काहीही असो, या पीडांनी फारोला यहोवाविषयी काही नवीन शिकवले. इजिप्तच्या [मिसर] दैवतांनी जरी त्यांच्या उपासकांचे गोमाशांपासून रक्षण केले नाही तरी, यहोवा त्याच्या लोकांचे संरक्षण करु शकला. ही व यानंतरच्या बाकीच्या सर्व पीडांनी इजिप्तच्या [मिसर] लोकांना पीडित केले परंतु इस्राएलांच्या बाबतीत तसे झाले नाही.—निर्गम ८:२०-२४.
पाचवी पीडा इजिप्तच्या [मिसर] पशूधनावर होती. या पीडेमुळे हॅथर, अपिस व गाईने सूचित असलेल्या आकाश-देवता नटला चांगलाच कलंक लागला. (निर्गम ९:१-७) सहाव्या पीडेमुळे मनुष्य आणि पशूंवर गळवे आले, यामुळे थॉथ, आयसिस व प्टा या देवतांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे असा चूकीचा जो समज होता, त्यांचा अपमान केला.—निर्गम ९:८-११.
सातवी पीडा भारी गारा, व त्यामधून अग्नीच्या लोळाची होती. या पीडेने विजेचा धनी समजल्या जाणाऱ्या रेशपू देवाला आणि पाऊस व गडगडाट याजवर प्रभुत्त्व करतो असे मानल्या जाणाऱ्या थॉथ देवाला लाजवले. (निर्गम ९:२२-२६) टोळाच्या आठव्या पीडेने फलनदेवता मीन, पीकांचे रक्षण करणारी, कल्पित देवतेवर यहोवाचे श्रेष्ठत्व प्रगट केले गेले. (निर्गम १०:१२-१५) नववी पीडा इजिप्तवर [मिसर] तीन दिवसांच्या निबिड अंधकाराची होती, इजिप्तचा [मिसर] सूर्य-देव रा व होरस देवतांना तुच्छ लेखले गेले.—निर्गम १०:२१-२३.
या नऊ घातक पीडा येऊन सुद्धा, इस्राएलांची मुक्तता करण्यास फारोने नाकारले. त्याच्या कठोर मनामुळे इजिप्तच्या [मिसर] लोकांना देवाने आणलेल्या दहाव्या पीडेने—मनुष्य आणि पशूंचे प्रथमवत्सांच्या मृत्यूने मोठी किंमत मोजावी लागली. फारोला देव असे मानले जात असताना त्याचाही ज्येष्ठ पुत्र यात मरण पावला. यास्तव, यहोवाने ‘मिसर [इजिप्त] देशातील सर्व देवांचे शासन केले.’—निर्गम १२:१२, २९.
फारोने आता मोशे आणि अहरोन यांना फर्मान पाठवले व म्हटले: “तुम्ही व सगळे इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा; तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची [यहोवा, न्यू.व.] सेवा करा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडेमेंढरे घेऊन चालते व्हा; आणि मलाही आशीर्वाद द्या.”—निर्गम १२:३१, ३२.
त्याच्या लोकांचा संरक्षणकर्त्ता
इस्राएली तेथून निघून गेले, परंतु फारोला वाटते की ते विनाकारण अरण्यात भटकत आहेत. तो आणि त्याचे सेवक आता विचारतात: “इस्राएल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले?” (निर्गम १४:३-५) ह्या दासांच्या राष्ट्राला गमावल्यामुळे इजिप्तला [मिसर] आर्थिकतेचा चांगलाच तडाखा बसणार होता.
फारोने त्याचे सैन्य गोळा केले व इस्राएलाचा पीहहिरोथापर्यंत पाठलाग केला. (निर्गम १४:६-९) युद्धाच्या दृष्टिने, इजिप्तच्या [मिसर] लोकांना परिस्थिती चांगली वाटत होती, कारण इस्राएली, समुद्र आणि डोंगर यांच्यामध्ये सापडले होते. परंतु यहोवाने त्याच्या व इजिप्तच्या [मिसर] लोकांमध्ये ढग आणून इस्राएली लोकांचे रक्षण करण्याचे कार्य केले. इजिप्तच्या [मिसर] लोकांच्या बाजूला, “तो ढग व अंधार होता,” याद्वारे तो आक्रमणापासून बचावत होता. दुसऱ्या बाजूला पाहता, ढग तेजोमय होता व तो, इस्राएलासाठी “रात्रीचा प्रकाश देत होता.”—निर्गम १४:१०-२०.
निर्गम १५:९) त्याला जेव्हा दूर केले गेले तेव्हा केवढे आश्चर्य घडले गेले! तांबड्या समुद्राचे पाणी विभागले आहे, आणि इस्राएली कोरड्या भुमीवरुन चालत दुसरीकडे गेले! फारो आणि त्याच्या सैन्यांनी पूर्वीच्या दासांना पकडून लूटण्यासाठी समुद्रात झेप घेतली. तथापि, इजिप्तच्या [मिसर] हट्टी शासकाने इब्ऱ्यांच्या देवाला जुमानले नाही. यहोवाने इजिप्तच्या [मिसर] सैन्यांच्या रथांची चाके काढून त्यांना गोंधळात टाकण्यास सुरवात केली.—निर्गम १४:२१-२५अ.
इजिप्तच्या [मिसर] सैन्यांनी लुटण्याचा व नाश करण्याचा पवित्राच घेतला होता, परंतु ढगामुळे अडथळा येत होता. (इजिप्तचे [मिसर] सामर्थ्यशाली सैन्य म्हणू लागले की “आपण इस्राएलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] त्यांच्या बाजूने मिसऱ्यांशी (इजिप्त) लढत आहे.” याची जाणीव फारो आणि त्याच्या लोकांना फार उशीरा झाली. समुद्राच्या दुसऱ्या बाजूला मोशेने समुद्राकडे त्याचा हात केला आणि पाणी पूर्ववत झाले, त्यात फारो आणि त्याच्या सैन्यांचा अंत झाला.—निर्गम १४:२५ब-२८.
अनुभवाद्वारे शिकलेले धडे
तर, मग, यहोवा कोण आहे? गर्विष्ठ फारोला त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. इजिप्त [मिसर] मधील घटना दाखवतात की यहोवाच खरा देव आहे, तो राष्ट्रांचे देव जे “केवळ मूर्ती” आहेत त्यापेक्षा फारच वेगळा आहे. (स्तोत्रसंहिता ९६:४, ५) यहोवाने त्याच्या भीतिदायक सामर्थ्याने “आकाश व पृथ्वी उत्पन्न केली.” तसेच तो महान मुक्तिदाता देखील आहे, त्याने ‘चिन्ह व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहु उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल यांस मिसर देशातून बाहेर आणले.’ (यिर्मया ३२:१७-२१) यहोवा त्याच्या लोकांचे संरक्षण करु शकतो हे याद्वारे किती चांगल्या रितीने शाबीत झाले!
फारोला कटुपणाने ते अनुभव शिकावे लागले. वास्तविकपणे शेवटच्या धड्यामुळे त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. (स्तोत्रसंहिता १३६:१, १५) “हा परमेश्वर [यहोवा, न्य.व.] कोण आहे?” असे विचारताना नम्रता दाखवली असती तर तो बुद्धीमान ठरला असता. नंतर त्या शासकाने त्याला मिळालेल्या उत्तराच्या अनुषंगाने कार्य केले असते. आज अनेक लोक यहोवा कोण आहे हे शिकत आहेत हे आनंदाचे आहे. आणि त्याचे व्यक्तिमत्त्व कशाप्रकारचे आहे? तो आमच्याकडून कशाची अपेक्षा करतो? पुढील लेख केवळ त्याचेच नाव यहोवा आहे यासाठी तुमची गुणग्राहकता वाढो.—स्तोत्रसंहिता ८३:१८.