व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा खरा आणि जिवंत देव

यहोवा खरा आणि जिवंत देव

यहोवा खरा आणि जिवंत देव

इजिप्तच्या फारोने उद्धटपणे आणि तिरस्काराने विचारले: “हा परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] कोण आहे?” (निर्गम ५:२) आधीच्या लेखाने दाखवले की या प्रवृत्तीने इजिप्तच्या [मिसर] लोकांवर पीडा व मृत्यू आणला, तसेच फारो आणि त्याच्या सैन्याचा पाण्याने नाश झाला.

प्राचीन इजिप्तमध्ये [मिसर], खोट्या दैवतांवर यहोवाने त्याचे सर्वश्रेष्ठत्व शाबीत केले. परंतु त्याच्याविषयी शिकण्यासाठी आणखी पुष्कळ आहे. त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे कोणते पैलू आहेत? आणि आमच्याकडून तो कशाची अपेक्षा करतो?

त्याचे नाव आणि प्रसिद्धी

त्याने इजिप्तच्या [मिसराच्या] फारोकडे मागणी केली असता, मोशेने असे म्हटले नाही की: ‘प्रभूने असे सांगितले.’ फारो आणि त्याच्या इजिप्तच्या इतर [मिसर] लोकांनी त्यांच्या अनेक खोट्या देवांचा प्रभू म्हणून विचार केला असता. तर मोशेने यहोवा या ईश्‍वरी नावाचा उपयोग केला. मिद्यानात असताना त्याने स्वतः ते जळत असलेल्या झुडपातून ऐकले. ईश्‍वरप्रेरीत अहवाल कळवतो:

“देव मोशेला बोलला आणि म्हणाला: ‘मी परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आहे. . . . इस्राएल लोकांस इजिप्तच्या लोकांनी [मिसऱ्‍यांनी] दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश मी ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्राएल लोकांस सांग, “मी परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आहे; मी तुम्हांस इजिप्तच्या [मिसऱ्‍यांच्या] बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्‍त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. मी तुम्हांस आपली प्रजा करून आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हास इजिप्तच्या [मिसऱ्‍यांच्या] ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आहे हे तुम्हांस कळेल. आणि जो [कनान] देश [तुझे वाडवडिल] अब्राहाम, इसहाक व याकोब यांस देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करुन देईन; मी परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आहे.”’”—निर्गम ६:१-८.

हेच अगदी यहोवाने केले. त्याने इस्राएलांना इजिप्तच्या दास्यातून मुक्‍त केले व कनान देशात वस्ती करण्यास त्याने त्यांना समर्थ बनविले. वचन दिल्याप्रमाणे, हे सर्व घडून आणण्यासाठी देव कारणीभूत ठरला. त्याचे नाव यहोवा ज्याचा अर्थ “तो घडवून आणतो” असा असल्यामुळे हे किती उचित आहे! पवित्र शास्त्र यहोवाचा उल्लेख “देव,” “सार्वभौम प्रभू,” “सृष्टीकर्ता,” “पिता,” “सर्वशक्‍तीमान” आणि “परात्पर” अशा पदव्यांनी करते. तथापि त्याचे यहोवा हे नाव त्याची ओळख खरा देव अशी देते, जो प्रगतीशीलपणे त्याचे महान उद्देश पूर्ण करतो.—यशया ४२:८.

आम्हाला पवित्र शास्त्र त्याच्या मूळ भाषेत वाचावे लागले असते, तर देवाचे नाव हजारो वेळा सापडले असते. इब्रीत चार व्यंजनांनी योद ही वॉव हे (יהוה) सांगितले आहे, याला टेट्राग्रॅमेशन म्हणतात, जे उजवीकडून डावीकडे वाचले जाते. इब्री बोलणारे आवाजाद्वारे त्यात स्वर टाकत असत, परंतु आज लोकांना निश्‍चित माहीत नाही की ते कशाप्रकारे करीत असे. काही लोक याव्हे हा शब्द पसंत करतात, पण यहोवा हे सर्वसाधारण आमच्या सृष्टीकर्त्याची ओळख देते.

यहोवा नावाचा वापर, स्तोत्रसंहिता ११०:१ मध्ये “माझ्या प्रभू” असे म्हटलेल्या देवापासून फरक दाखवतो, जेथे एक अनुवाद असा आहे: “प्रभू [इब्री, יהוה] माझ्या प्रभूला म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.” (किंग जेम्स व्हर्शन) इब्री शास्त्रवचनात देवाच्या नामाचा उल्लेख स्वीकारून न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशनमध्ये असे वाचले जाते: “माझ्या प्रभूला यहोवा म्हणतो की: ‘मी तुझे शत्रू तुझे पादासन करूपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.’” यहोवा देव ते शब्द येशू ख्रिस्ताला भविष्यवादितपणे लागू करतो, ज्याला लेखक “माझ्या प्रभू” असे म्हणतो.

फारोच्या दिवसात यहोवाने स्वतःसाठी एक नाव बनविले. मोशेच्या वतीने देवाने त्या कठोर मनाच्या शासकाला म्हटले: “नाहीतर ह्‍या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, व तुझ्या प्रजेवर पाठवितो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल. कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरुन तुझा उच्छेद झाला असता; तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्‍या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे.”—निर्गम ९:१४-१६.

इजिप्तमधून [मिसर] इस्राएलाचे निर्गमन व काही कनानी राजांच्या पराभवाविषयी यरीहोच्या राहाब स्त्रीने दोन इब्री हेरांना म्हटले: “तुम्ही इजिप्तमधून [मिसर] देशाहून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्‍वराने [यहोवा, न्यू.व.] तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देनेपलिकडे राहणारे अमोऱ्‍यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्‍यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकतांच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवांत जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.” (यहोशवा २:९-११) होय, यहोवाची प्रसिद्धी सगळीकडे होती.

यहोवा आणि त्याचे गुण

स्तोत्रकर्त्याने त्याची मनःपूर्वक इच्छा व्यक्‍त केली: “म्हणजे तू केवळ तूच परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” (स्तोत्रसंहिता ८३:१८) यहोवाचे सार्वभौमत्व सार्वत्रिक असल्यामुळे, येशूचे छळग्रस्त अनुयायी प्रार्थना करु शकले: “हे स्वामी [सार्वभौम प्रभू, न्यू.व.] आकाश, पृथ्वी व समुद्र ह्‍यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्‍नकर्ता तूच आहेस.” (प्रे. कृत्ये ४:२४) आणि यहोवा “प्रार्थना ऐकणारा” आहे हे माहीत असणे किती सांत्वनदायक आहे!—स्तोत्रसंहिता ६५:२.

यहोवाचा मोठा गुण प्रीती हा आहे. खरोखर, “देव प्रीती आहे”—तो या गुणाचा सार आहे. (१ योहान ४:८) शिवाय, “त्याच्या ठायी ज्ञान आणि बल ही आहेत.” यहोवा सर्वबुद्धिमान, सर्वसमर्थ आहे, परंतु तो त्याच्या सामर्थ्याचा कधीही दुरूपयोग करीत नाही. (ईयोब १२:१३; ३७:२३) आमच्या बाबतीत देखील यहोवा नेहमी न्यायाने कार्य करील याची आम्ही खात्री बाळगू शकतो, कारण “नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.” (स्तोत्रसंहिता ९७:२) आम्ही पाप केल्यावर पश्‍चाताप करतो, तेव्हा यहोवा देव “दयाळू व कृपाळू देव मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे या ज्ञानाने आम्हाला सांत्वन मिळते. (निर्गम ३४:६) यहोवाची सेवा करण्यात आम्हाला आनंद मिळू शकतो यात काही आश्‍चर्य नाही!—स्तोत्रसंहिता १००:१-५.

अतुलनीय स्वर्गीय राजा

यहोवाचा पुत्र, येशू ख्रिस्ताने म्हटले: “देव आत्मा आहे.” (योहान ४:२४) या कारणास्तव, यहोवा मानवी डोळ्यांना अदृश्‍य आहे. वास्तविकपणे, यहोवाने मोशेला सांगितले: “तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यावर कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” (निर्गम ३३:२०) हा स्वर्गीय राजा एवढा महिमायुक्‍त आहे की त्याला पाहण्याचा अनुभव घेतल्यावर कोणी टिकू शकणार नाही.

यहोवा जरी आमच्या मानवी डोळ्यांना अदृश्‍य असला तरी तो सर्वशक्‍तीमान अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे आहेत. खरोखर, “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून दिसत आहेत.” (रोमकर १:२०) पृथ्वीवरील— गवत, वृक्ष, फळे, वनस्पती आणि फुले—यहोवाचे देवपण ज्ञात करून देतात. तो पर्जन्य आणि फलदायक ऋतु देतो यामुळे निष्फळ मूर्ती-देवांपेक्षा फार वेगळा आहे. (प्रे. कृत्ये १४:१६, १७) रात्रीच्या आकाशात तारे पाहा. यहोवाच्या देवपणाचा आणि संघटनात्मक क्षमतेचा तो किती महान पुरावा आहे!

यहोवाने स्वर्गात त्याच्या पवित्र, बुद्धिमान आत्मिक प्राण्यांना संघटीत केले. देवाची इच्छा ते एकदिलाने पूर्ण करतात, स्तोत्रकर्ता म्हणतो: “अहो परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] दूतांनो जे तुम्ही बलसंपन्‍न आहा, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करुन त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा.” (स्तोत्रसंहिता १०३:२०, २१) यहोवाने पृथ्वीवरही त्याच्या लोकांना संघटीत केले आहे. इस्राएल राष्ट्र सुसंघटीत होते, त्याचप्रमाणे देवाच्या पुत्राचे आधीचे अनुयायी देखील सुसंघटीत होते. अशाचप्रकारे आजही, त्याचे राज्य आता हाताशी आहे याची राज्याची घोषणा करणाऱ्‍या आवेशी साक्षीदारांची मिळून बनलेली यहोवाची जगव्याप्त संस्था आहे.—मत्तय २४:१४.

यहोवा सत्य आणि जिवंत देव आहे

यहोवाचे देवपण विविध मार्गांनी प्रदर्शित झाले! त्याने इजिप्तच्या खोट्या देवांची मानहानी केली व इस्राएलांना वचनदत्त देशात सुखरुप आणले. सृष्टी यहोवाच्या देवपणाचा विपूल पुरावा देते. आणि त्याच्यात आणि खोट्या धर्माच्या निरर्थक मूर्ती-देवांबरोबर कशाचीही तुलना होऊ शकत नाही.

संदेष्टा यिर्मयाने जिवंत देव, यहोवा आणि निर्जीव मनुष्य-निर्मित मूर्त्यांमध्ये फार मोठी भिन्‍नता दाखवली. यातील फरक यिर्मयाच्या दहाव्या अध्यायात उचितपणे स्पष्ट केला आहे. इतर गोष्टींमधील यिर्मयाने लिहिले: “परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे.” (यिर्मया १०:१०) जिवंत आणि सत्य देवाने सर्व गोष्टींची सृष्टी केली. त्याने इजिप्तच्या दास्यातून मुक्‍त होण्याची याचना करणाऱ्‍या इस्राएलांची सुटका केली. त्याला काहीही अशक्य नाही.

“सनातन राजा,” यहोवाही प्रार्थना ऐकेल: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (१ तीमथ्य १:१७; मत्तय ६:९, १०) स्वर्गीय मशीही राज्य आधीच येशू ख्रिस्ताच्या हातात आहे, व लवकरच दुष्टांविरुद्ध कारवाई करील व यहोवाच्या सर्व शत्रूंचा नाश करील. (दानीएल ७:१३, १४) ते राज्य देवाच्या नवीन व्यवस्थेत आज्ञाधारक मानवजातीला अनंत आशीर्वाद देखील आणील.—२ पेत्र ३:१३.

यहोवा आणि त्याच्या उद्देशाविषयी शिकण्यासारखे आणखी बरेच काही आहे. असे ज्ञान घेऊन व त्याच्याशी सुसंगत कार्य करण्याचा तुम्ही निश्‍चय का करीत नाही? तुम्ही असे केल्यास, देवाच्या शासनाधीन असलेल्या नंदनवनमय अनंतकाळच्या जीवनाच्या विशेषाधिकाराचा तुम्ही अनुभव घ्याल. अशा परिस्थितीत तुम्ही राहाल जेथे शोक, रडणे व मरण हे होऊन गेलेले असेल, व यहोवाच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण झालेली असेल. (यशया ११:९; प्रकटीकरण २१:१-४) “कोण यहोवा आहे?” या प्रश्‍नाचा पवित्र शास्त्रावर आधारित असलेल्या उत्तराने जर तुम्ही शोध केला, ते मिळवले व त्याप्रमाणे कार्य केले तर तुमच्या भवितव्याचा परिणाम तो असेल.