विश्वास प्रदर्शित करुन देवाच्या अभिवचनांना प्रतिसाद देणे
विश्वास प्रदर्शित करुन देवाच्या अभिवचनांना प्रतिसाद देणे
“त्याने [यहोवा देव] मौल्यवान व महान अभिवचनेही देऊन ठेवली आहेत.” —२ पेत्र १:४, मराठी कॉमन लँग्वेज बायबल.
१. खरा विश्वास प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला काय मदत करते?
यहोवा त्याच्या अभिवचनावर आम्ही विश्वास ठेवावा याची अपेक्षा करतो. तथापि, “सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकर ३:२) हा गुण देवाच्या आत्म्याचे किंवा कार्यकारी शक्तीचे एक फळ आहे. (गलतीकर ५:२२, २३) याकारणास्तव, यहोवाच्या आत्म्याद्वारे चालणारेच केवळ विश्वास ठेवतात.
२. प्रेषित पौल ‘विश्वासाची’ व्याख्या कशी करतो?
२ परंतु विश्वास काय आहे? प्रेषित पौल त्याविषयी म्हणतो की तो, “न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” या न दिसणाऱ्या गोष्टींचा पुरावा इतका बळकट असतो की ज्यामुळे आमचा विश्वास त्यासारखाच आहे असे दिसते. विश्वासाला “आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा” असे देखील म्हटले आहे, कारण ज्यांच्याजवळ हा गुण असतो त्यांना ही खातरी असते की यहोवाने जे काही अभिवचन दिले आहे ते पूर्ण झाल्यासारखीच हमी असते.—इब्रीकर ११:१.
विश्वास आणि यहोवाची अभिवचने
३. अभिषिक्त अनुयायांनी विश्वास प्रदर्शित केला तर ते कशाचा अनुभव घेतील?
३ यहोवाला खूष करण्यासाठी आम्ही त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रेषित पेत्राने याविषयी इ.स. ६४ मध्ये लिहिलेल्या त्याच्या दुसऱ्या प्रेरित पत्रात हे दाखवले. त्याने दाखवले की जर त्याच्या सह अभिषिक्त जनाने विश्वास ठेवला, तर ते देवाच्या “मौल्यवान आणि महान अभिवचनाची” पूर्णता पाहतील. याच्या परिणामात, ते “ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी” येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय राज्यात सहवारीस होतील. विश्वास आणि यहोवा देवाच्या मदतीने, जगाच्या भ्रष्ट सवया आणि रितीरिवाजाच्या दास्यत्वापासून ते बचावतील. (२ पेत्र १:२-४) आणि जे खरा विश्वास प्रदर्शित करीत आहेत ते आज मौल्यवान मुक्ततेचा आनंद घेत आहेत. याची जरा कल्पना करा!
४. आमच्या विश्वासात कोणत्या गुणांची भर टाकली पाहिजे?
४ यहोवाच्या अभिवचनावर विश्वास आणि देवाने दिलेल्या स्वातंत्र्याबद्दलची कृतज्ञता उदाहरणीय ख्रिस्ती बनण्यासाठी परिश्रम करण्यास आम्हाला प्रवृत्त करो. पेत्राने म्हटले: “ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करुन आपल्या विश्वासात सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीरांची, धीरांत सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.” (२ पेत्र १:५-७) यास्तव लक्षात ठेवण्यासाठी पेत्र आम्हाला एक यादी देतो. या गुणांकडे आपण बारकाईने लक्ष देऊ या.
विश्वासाचे महत्त्वपूर्ण घटक
५, ६.. सात्त्विकता काय आहे, आणि आमच्या विश्वासात आम्ही तिला कसे जोडू शकतो?
५ पेत्राने म्हटले की, सात्त्विकता, ज्ञान, इंद्रियदमन, धीर, सुभक्ती, बंधुप्रेम व प्रीती यांनी एकदुसऱ्यांमध्ये व आमच्या विश्वासामध्ये भर घातली पाहिजे. या गुणांना आमच्या विश्वासाचे महत्त्वपूर्ण घटक बनविण्यासाठी आम्ही परिश्रम केले पाहिजे. उदाहरणार्थ, सात्त्विकता आमच्या विश्वासाव्यतिरिक्त आम्ही दाखवू शकत असणारा गुण नाही. शब्दकोशकार डब्लू ई. वाईन २ पेत्र १:५ दाखवतात, “विश्वास प्रदर्शित करण्यासाठी सात्त्विकता या आवश्यक गुणाची भर टाकली आहे.” पेत्राने उद्धृत केलेले इतर गुण देखील प्रत्येकी आमच्या विश्वासाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत.
६ प्रथम, आम्ही आमच्या विश्वासात सात्त्विकतेची भर घालावी. सात्त्विक असणे म्हणजे देवाच्या दृष्टिने जे योग्य ते करीत राहणे होय. सात्त्विकतेसाठी वापरलेल्या ग्रीक शब्दाचा वापर काही भाषांतर करणारांनी “चांगुलपणा” अशा अर्थाने केला आहे. (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन; द जरूसलेम बायबल; टुडे’ज इंग्लिश व्हर्शन) सात्त्विकता आम्हाला वाईट किंवा इतर मानवांना इजा पोहचू नये यासाठी प्रवृत्त करते. (स्तोत्रसंहिता ९७:१०) याशिवाय, इतरांच्या आध्यात्मिक, शारीरिक आणि भावनात्मक फायद्यासाठी ती आम्हाला लगेच निर्भयतेचे कार्य करण्यास मदत करते.
७. आमच्या विश्वासात व सात्त्विकतेत आम्ही ज्ञानाची भर का टाकली पाहिजे?
७ पेत्र आमच्या विश्वासात आणि सात्त्विकतेत ज्ञानाची भर घालण्याचे आम्हाला का आर्जवितो? आमच्या विश्वासाच्या नवीन आव्हानांचा आम्ही सामना करीत असताना, चांगले आणि वाईट समजण्यासाठी आम्हाला ज्ञानाची गरज लागते. (इब्रीकर ५:१४) पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे आणि देवाच्या वचनाचे अनुकरण केल्याने मिळालेला अनुभव दैनंदिन जीवनात व्यावहारिक बुद्धिचा वापर केल्याने, आम्ही आमच्या ज्ञानात भर टाकू शकतो. असे केल्याने आमचा विश्वास राखण्यासाठी आणि दबावांचा सामना करतेवेळी योग्य ते करीत राहण्यास आम्हाला मदत करु शकते.—नीतीसूत्रे २:६-८; याकोब १:५-८.
८. इंद्रियदमन काय आहे, आणि धीराबरोबर ते कसे जोडले जाऊ शकते?
८ विश्वासाने परिक्षांचा सामना करण्याच्या मदतीसाठी, आम्ही आमच्या ज्ञानात इंद्रियदमनाची भर घातली पाहिजे. “इंद्रियदमन” यासाठी असलेला ग्रीक शब्द सुचवितो की आमच्या स्वतःवर काबू राखण्याची क्षमता. देवाच्या आत्म्याचे हे फळ आमच्या विचारावर, शब्दांवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचे दाखविण्यास मदत करते. इंद्रियदमन अनुकरणात आणण्याच्या चिकाटीपणामुळे, आम्ही त्यात धीराची भर घालतो. “धीर” यासाठी वापरलेला ग्रीक शब्द निर्भय निश्चलपणा सुचवितो, अटळ परीक्षेसाठी खिन्नतेने स्वाधीन होण्याचे तो सुचवित नाही. येशूच्या पुढे ठेवलेल्या आनंदाने त्याने वधस्तंभ सहन केला. (इब्रीकर १२:२) धीराशी संबंधीत असलेल्या व देवाने दिलेल्या सामर्थ्याने आमच्या विश्वासाला आधार मिळतो आणि परिक्षात आनंदी राहण्यास, छळ होताना, प्रलोभनांचा विरोध करण्यासाठी व हातमिळवणी करण्याचे टाळण्यासाठी तो आम्हाला मदत करतो.—फिलिप्पैकर ४:१३.
९. (अ) सुभक्ती काय आहे? (ब) आमच्या सुभक्तीत आम्ही बंधूप्रीतीची भर का घातली पाहिजे? (क) आमच्या बंधूप्रीतीत आम्ही प्रीतीची भर कशी घालू शकतो?
९ आमच्या धीरात आम्ही सुभक्तीची—आदरनीय उपासना आणि यहोवाची सेवा याची भर घातली पाहिजे. आम्ही सुभक्ती आचरणात आणली तर आमचा विश्वास वाढतो आणि यहोवा त्याच्या लोकांबरोबर कसे वागतो हे पाहावयाला मिळते. तथापि, चांगुलपणा दाखविण्यासाठी, आमच्याजवळ बंधुप्रीती असली पाहिजे. खरे म्हणजे, “डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.” (१ योहान ४:२०) यहोवाच्या इतर सेवकांबद्दल खरी कळकळ असण्यासाठी आणि सर्वदा त्यांचे हित पाहण्यासाठी आमची हृदये प्रवृत्त झाली पाहिजेत. (याकोब २:१४-१७) परंतु आमच्या बंधूप्रीतीत आम्ही प्रीतीची भर का घातली पाहिजे? साहजिकच पेत्राने म्हटले की आम्ही केवळ आमच्या बांधवांसाठीच नव्हे तर सर्व मानवजातीसाठी प्रीती प्रदर्शित करावी. ही प्रीती, सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे किंवा लोकांना आध्यात्मिकतेत मदत करण्याद्वारे विशेषपणे दाखवली जाते.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
फरक दाखविणारे प्रभाव
१०. (अ) आमच्या विश्वासात, सात्त्विकता, ज्ञान, इंद्रियदमन, धीर, सुभक्ती, बंधूप्रीती व प्रीतीची भर पडल्यास आम्ही कसे कार्य करु? (ब) दावा करणारा एखादा ख्रिस्ती या गुणात कमी पडल्यास काय घडते?
१० आम्ही आमच्या विश्वासात, सात्त्विकता, ज्ञान, इंद्रियदमन, धीर, सुभक्ती, बंधूप्रीती आणि प्रीतीची भर टाकल्यास, देवाची संमती असलेल्या मार्गांनी आम्ही विचार करु, बोलू व कार्य करु. याच्याउलट जर एखादा दावा करणारा ख्रिस्ती या गुणांना प्रदर्शित करण्यात अपयशी झाल्यास, तो आध्यात्मिकतेत अंधळा होतो. देवाकडून येणाऱ्या ‘प्रकाशाच्याबाबतीत तो अदूरदृष्टीचा’ आहे व पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा त्याला विसर पडला आहे. (२ पेत्र १:८-१०; २:२०-२२) यास्तव अशाप्रकारे अपयशी होऊ नका, व देवाच्या अभिवचनावरील विश्वास गमावू नका.
११. निष्ठावंत अभिषिक्त जनांविषयी आम्ही योग्यपणे कशाची अपेक्षा करु शकतो?
११ निष्ठावंत अभिषिक्त ख्रिश्चनांचा यहोवाच्या अभिवचनावर विश्वास आहे आणि त्यांना झालेले पाचारण व निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. त्यांच्या मार्गांत कोणतेही अडखळण आले असतानाही, दैवी गुणाचे प्रदर्शन करतील याची आम्ही अपेक्षा करू शकतो. विश्वासू अभिषिक्त जनांसाठी स्वर्गात त्यांच्या आत्मिक पुनरुत्थानाद्वारे ‘येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यांत जयोत्सवाने प्रवेश होईल.’—२ पेत्र १:११.
१२. आम्ही २ पेत्र १:१२-१५ मधील शब्द कसे समजले पाहिजे?
१२ पेत्राने स्वतःचा लवकरच मृत्यू होईल असे ओळखले, आणि शेवटी स्वर्गीय जीवनासाठी त्याचे पुनरुत्थान होईल याची त्याने अपेक्षा केली. परंतु जोवर तो “ह्या मंडपात”—त्याच्या मानवी शरीरात—जिवंत होता व ईश्वरी कृपादृष्टिसाठी लागणाऱ्या गोष्टींची त्याने त्यांना आठवण करुन देण्याद्वारे समविश्वासूंचा विश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला व त्यांना कार्यप्रवृत्त केले. पेत्राच्या मृत्यूनंतर त्याचे आध्यात्मिक बंधू आणि बहिणी त्याच्या शब्दांची आठवण करुन त्यांच्या विश्वासाला आधार देऊ शकत होते.—२ पेत्र १:१२-१५.
भविष्यवादित वचनावर विश्वास
१३. देवाने ख्रिस्ताच्या येण्याविषयी विश्वास बळकट करणारी ग्वाही कशी दिली?
१३ येशू “पराक्रमाने व मोठ्या वैभवाने” येईल विश्वास बळकट करणारी ही ग्वाही स्वतः यहोवा देवाने दिली. (मत्तय २४:३०; २ पेत्र १:१६-१८) पुराव्या अभावी, मूर्तीपूजक याजकांनी, त्यांच्या खोट्या देवांबद्दल सांगितलेल्या कथाप्रमाणे नव्हे तर पेत्र, याकोब आणि योहान ख्रिस्ताचे अभुतपूर्व रुपांतर प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार होते. (मत्तय १७:१-५) त्यांनी येशूचे गौरव झालेले व तो देवाचा प्रिय पुत्र आहे याबद्दल दिलेली मान्यता देवाच्या वाणीने ऐकली. ख्रिस्ताबद्दलची मान्यता आणि तेजस्वी रुपांतर हे त्याला बहाल केलेला आदर व महिमा होती. त्याच्या ईश्वरी प्रकटीकरणामुळे, पेत्र त्या हेर्मोनला “पवित्र पर्वत” असे म्हणू शकला.—पडताळा निर्गम ३:४, ५.
१४. येशूच्या रुपांतराचा आमच्या विश्वासावर कसा परिणाम व्हावा?
१४ येशूच्या रुपांतराचा आमच्या विश्वासावर कसा परिणाम होण्यास हवा? पेत्राने म्हटले: “शिवाय अधिक निश्चित् असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.” (२ पेत्र १:१९) “संदेष्ट्याच्या वचनात” इब्री शास्त्रवचनातील मशीहाबद्दलच्या भविष्यावाण्यांच केवळ नव्हत्या तर “पराक्रमाने व मोठ्या वैभवाने” तो येईल या येशूच्या शब्दप्रयोगाचाही यात समावेश होत होता. रुपांतराने वचनाला “अधिक निश्चित” कसे केले होते? ती घटना ख्रिस्ताचे राज्याधिकारावर महिमायुक्त येणे या संदेष्ट्याच्या वचनाला बळकटी देते.
१५. संदेष्ट्याच्या वचनाकडे लक्ष देण्यात कशाचा समावेश होतो?
१५ आमचा विश्वास बळकट करण्यासाठी आम्ही संदेष्ट्याच्या वचनाकडे लक्ष दिले पाहिजे. यात, त्या वचनाचा अभ्यास करणे, ख्रिस्ती सभांमध्ये त्याची चर्चा करणे आणि त्याचा सल्ला आचरणात आणण्याचा समावेश होतो. (याकोब १:२२-२७) आम्ही त्याला आमची अंतःकरणे प्रज्वलित करण्यासाठी, “काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे” ठेऊ या. (इफिसकर १:१८) तद्नंतरच “पहाटचा तारा” किंवा “पहाटचा तेजस्वी तारा,” येशू ख्रिस्त स्वतःला वैभवात प्रकट करील, तेव्हा ते आम्हाला मार्गदर्शित करील. (प्रकटीकरण २२:१६) या प्रकटीकरणाचा अर्थ, विश्वासहिनांचा नाश आणि विश्वास प्रदर्शित करणाऱ्यांना आशीर्वाद असा होईल.—२ थेस्सलनीकाकर १:६-१०.
१६. देवाच्या वचनातील सर्व भविष्यवादित अभिवचनांची पूर्णता होईल असा विश्वास आम्ही का करु शकतो?
१६ देवाचे संदेष्टे सुज्ञ भविष्य भाकीत करणारे धूर्त मनुष्य नव्हते. पेत्राने म्हटले: “शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही; कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” (२ पेत्र १:२०, २१) उदाहरणार्थ, दाविदाने म्हटले: “परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] आत्मा माझ्याद्वारे म्हणाला.” (२ शमुवेल २३:१, २) आणि पौलाने लिहिले: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख.” (२ तीमथ्य ३:१६) देवाच्या संदेष्ट्यांना त्याच्या आत्म्याने प्रेरणा झाल्यामुळे, त्याच्या वचनातील सर्व अभिवचनांची पूर्णता होईल हा आम्हाला विश्वास असला पाहिजे.
देवाच्या अभिवचनांवर त्यांचा विश्वास होता
१७. हाबेलच्या विश्वासाच्या आधारासाठी कोणते अभिवचन होते?
१७ यहोवाच्या अभिवचनांचा त्याच्या ख्रिस्तपूर्व साक्षीदारांचा, ‘मोठा साक्षीरुपी मेघ’ याच्या विश्वासासाठी आधार आहे. (इब्रीयांस ११:१–१२:१) उदाहरणार्थ, ते “संतान” “त्या सर्पाचे” डोके फोडील, या देवाच्या अभिवचनावर हाबेलचा विश्वास होता. हाबेलच्या पालकांना देवाने दिलेली शिक्षा त्या अभिवचनाच्या पूर्णतेचा पुरावा होता. एदेनबाहेर, भूमीवर आलेल्या शापामुळे तिने काटे व कुसळे दिल्याने आदाम आणि त्याच्या कुटुंबाने निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाल्ली. बहुधा, हाबेलने हव्वेला तिच्या पतीसाठी असलेला तिचा ओढा व आदाम तिच्यावर स्वामित्व चालवतो हे पाहिले असेल. निश्चितच तिने तिच्या गर्भधारणाच्या वेदना सांगितल्या असतील. एदेन बागेत जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारुप तरवार ठेवली होती. (उत्पत्ती ३:१४-१९, २४) या सर्वांमुळे “पुराव्याचे प्रदर्शन” झाल्याने मुक्तता वचनयुक्त संतान आणणार याची हाबेलला खात्री पटली. विश्वासाचे कार्य करुन, हाबेलाने देवाला अर्पण केलेले बलिदान काईनाच्या बलिदानापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे शाबीत झाले.—इब्रीयांस ११:१, ४.
१८, १९. अब्राहाम आणि साराने कशाप्रकारे विश्वास प्रदर्शित केला?
१८ यहोवाच्या अभिवचनांवर अब्राहाम, इसहाक आणि याकोब या पूर्वजांचाही विश्वास होता. अब्राहामने, त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानवजात अभिष्ट पावतील व त्याच्या संतानाला तो प्रदेश देईल या देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला. (उत्पत्ती १२:१-९; १५:१८-२१) त्याचा पुत्र इसहाक आणि नातू याकोब “यांची त्याबरोबर डेऱ्यात वस्ती होती.” विश्वासाद्वारे अब्राहाम “वचनदत्त देशात जाऊन राहिला” आणि “पाये असलेल्या नगराची” देवाच्या स्वर्गीय राज्याची वाट पाहत होता, ज्याच्या अमलाखाली पृथ्वीवर त्याचे पुनरूत्थान केले जाईल. (इब्रीयांस ११:८-१०) तुमचाही अशाच प्रकारचा विश्वास आहे का?
१९ अब्राहामची पत्नी सारा जवळजवळ ९० वर्षांची होती व मुले प्रसवण्याचे तिचे वय निघून गेले होते, तिने देवाच्या अभिचनावर विश्वास प्रदर्शित केला व “संतान गर्भधारण करण्याचे” आणि इसहाकाला जन्म देण्याचे सामर्थ्य तिला दिले गेले. या रितीने, १०० वर्षे वयाच्या अब्राहामाकडून, पुनरूत्पादन करण्याची शक्ती “निर्जीव झालेल्यापासून”, शेवटी, “आकाशातल्या ताऱ्याइतकी अगणित संतती निर्माण झाली.”—इब्रीयांस ११:११, १२; उत्पत्ती १७:१५-१७; १८:११; २१:१-७.
२०. पूर्वजांनी, देवाने त्यांना दिलेल्या अभिवचनांची संपूर्ण पूर्णता पाहिली नसतानाही, काय केले?
२० विश्वासू पूर्वज त्यांच्याबद्दल असलेल्या देवाच्या अभिवचनाची पूर्णरितीने पूर्णता पाहण्याआधीच मरण पावले. तथापि, “त्यांनी ती [अभिवचन दिलेल्या गोष्टी] दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले.” वचनदत्त देश अब्राहामाच्या संततीची मिळकत होऊपर्यंत अनेक पिढ्या येऊन गेल्या. तथापि, त्यांच्या जीवनभर, देवभिरु पूर्वजांनी यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास प्रदर्शित केला. त्यांनी कधीही विश्वास गमावू न दिल्यामुळे, देवाने पृथ्वीवर तयार केलेल्या ‘शहरात’ मशीही राज्यात त्यांचे लवकरच पुनरूत्थान होईल. (इब्रीयांस ११:१३-१६) अशाचप्रकारे, आम्ही त्याच्या सर्व अभिवचनांची पूर्णता पाहिली नाही तरी विश्वास आम्हाला यहोवाशी एकनिष्ठ राहण्यास मदत करील. अब्राहामाप्रमाणेच देवाची आज्ञा पाळण्यासाठी देखील आमचा विश्वास आम्हाला प्रवृत्त करील. त्याचे आध्यात्मिक वारस त्याच्या संततीला दिल्यामुळे, आम्ही आमच्या मुलांना यहोवाच्या मौल्यवान अभिवचनांवर विश्वास ठेवण्यास मदत करु शकतो.—इब्रीयांस ११:१७-२१.
ख्रिश्चनांसाठी विश्वास आवश्यक आहे
२१. देवाला आज स्वीकारार्ह असण्यासाठी, प्रदर्शित करीत असलेल्या विश्वासात आणखी कशाचा समावेश केला पाहिजे?
२१ अर्थात, यहोवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेवर भरवसा ठेवण्याव्यतिरिक्त विश्वासात अधिक गोष्टींचा समावेश आहे. आम्हाला देवाची संमती मिळवावयाची असल्यास, त्याच्या विविध मार्गांवर विश्वास प्रदर्शित करणे जरुरीचे आहे हे संपूर्ण मानवी इतिहासात, सिद्ध झाले आहे. पौलाने हे निरिक्षिले की “विश्वासावाचून [यहोवा देवाला] ‘संतोषविणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्रीयांस ११:६) यहोवा देवाला आज स्वीकारयोग्य असण्यासाठी, एखाद्या व्यक्तिने येशू ख्रिस्तावर तसेच त्याच्याद्वारे देवाने पुरविलेल्या खंडणी यज्ञार्पणावर त्याने विश्वास ठेवला पाहिजे. (रोमकर ५:८; गलतीकर २:१५, १६) स्वतः येशू ख्रिस्ताने याबद्दल असे म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”—योहान ३:१६, ३६.
२२. मशीही राज्य कोणत्या अभिवचनाची पूर्णता घडवून आणील?
२२ येशूने, ख्रिश्चन प्रार्थना करु शकतील त्या देवाच्या राज्याच्या अभिवचनांच्या पूर्णतेच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. (यशया ९:६, ७; दानीएल ७:१३, १४; मत्तय ६:९, १०) पेत्राने दाखविल्याप्रमाणे, येशू राज्याधिकारात “पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने” येईल याविषयी रुपांतराने संदेष्ट्याच्या वचनाची यथार्थता पटविली. मशीही राज्य देवाच्या आणखी एका अभिवचनाची पूर्णता घडवून आणील, याविषयी पेत्राने लिहिले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.” (२ पेत्र ३:१३) अशाप्रकारच्या भविष्यवाणीची पूर्णता इ.स.पू. ५३७ मध्ये मायदेशाची पूनर्स्थापना करण्यासाठी राज्यपाल जरुब्बाबेल आणि महायाजक यहोशवा यांच्या सरकाराखाली बाबेलाच्या कैदेतून बाहेर पडल्यावर झाली. (यशया ६५:१७) परंतु पेत्राने भविष्याविषयी जेव्हा “नवे आकाश”—स्वर्गीय मशीही राज्य—जे “नवी पृथ्वी,” या जगभरात राहत असलेल्या धार्मिक मानवी समाजावर राज्य करील या भविष्याकडे निर्देश केला.—पडताळा स्तोत्रसंहिता ९६:१.
२३. सात्त्विकतेबद्दलच्या कोणत्या प्रश्नांची चर्चा पुढे केली जाईल?
२३ यहोवाचे निष्ठावंत सेवक आणि त्याच्या प्रिय पुत्र, येशू ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे, आम्ही देवाच्या वचनदत्त नव्या जगाची आतुरतेने वाट पाहतो. आम्हाला हे माहीत आहे की ते जवळच आहे, व यहोवाच्या सर्वच मौल्यवान अभिवचनांची पूर्णता होईल असाही आम्हाला विश्वास आहे. आमच्या देवासमोर स्वीकारार्ह चालण्यासाठी, आम्ही आमच्या विश्वासात सात्त्विकता, ज्ञान, इंद्रियदमन, धीर, सुभक्ती, बंधूप्रीती व प्रीती याची भर टाकून तो दृढ करावा. * आता असे विचारले जाऊ शकते, आम्ही सात्त्विकता कशी दाखवू शकतो? व सात्त्विक असल्यामुळे आम्हा स्वतःला व इतरांना, विशेषकरुन आमचे ख्रिस्ती सहकारी, ज्यांनी विश्वास प्रदर्शित करुन देवाच्या अभिवचनाला प्रतिसाद दिला त्यांना कसा फायदा होऊ शकतो?
[तळटीपा]
^ विश्वास आणि सात्त्विकता याची चर्चा याच टेहळणी बुरुजच्या अंकात केलेली आहे. ज्ञान, इंद्रियदमन, धीर, सुभक्ती, बंधूप्रीती आणि प्रीती याविषयीची अधिक सविस्तर माहिती नंतरच्या अंकात दिली जाईल.
तुमची उत्तरे काय आहेत?
▫ “विश्वास” याची व्याख्या कशी केली जाऊ शकते?
▫ दुसरे पेत्र १:५-७ नुसार, आमच्या विश्वासात कोणत्या गुणांची भर टाकली पाहिजे?
▫ आमच्या विश्वासावर येशूच्या रुपांतराचा कसा परिणाम झाला पाहिजे?
▫ विश्वासाची कोणती उदाहरणे प्राचीन काळातील हाबेल, अब्राहाम, सारा आणि इतरांनी पुरविली आहेत?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२३ पानांवरील चित्रं]
एखाद्या व्यक्तिच्या विश्वासावर येशूच्या रुपांतराचा परिणाम कसा होतो हे तुम्हाला माहीत आहे का?