व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

थोर अधिपती, मीखाएलचा अंतिम विजय

थोर अधिपती, मीखाएलचा अंतिम विजय

थोर अधिपती, मीखाएलचा अंतिम विजय

त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल.” —दानीएल १२:१.

१. यहोवाच्या सार्वभौमत्वाविरूद्ध जगाच्या अनेक पुढाऱ्‍यांनी कोणती मनोवृत्ती दाखवली आहे, आणि यात उत्तरेचा राजा वेगळा का नाही?

 “हाकोण परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे?” (निर्गम ५:२) फारोने, मोशेला टोमणा देऊन उद्‌गारलेले हे शब्द होते. यहोवाच्या सर्वश्रेष्ठ देवपणाला कबूल करण्याचे नाकारून, फारोने इस्राएलांना दास्यत्वातच ठेवण्याचा निश्‍चय केला होता. इतर शासकांनी यहोवाची अशारीतीने अवज्ञा केली, व दानिएलाच्या भविष्यवाणीतील राजे देखील यापेक्षा काही वेगळे नव्हेत. (यशया ३६:१३-२०) खरे म्हणजे, उत्तरेचा राजा तर याही पेक्षा पुढे गेलेला आहे. देवदूत म्हणतो की: “सर्व दैवतांहून तो आपणांस श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरूद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल . . . तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांची, स्त्रियांच्या प्रेमाची किंवा कोणाही दैवतांची पर्वा करणार नाही; कारण तो . . . आपणांस सर्वांहून श्रेष्ठ समजेल.”—दानीएल ११:३६, ३७.

२, ३. उत्तरेचा राजा इतर ‘दैवतांच्या’ पसंतीत कशाप्रकारे “आपल्या पूर्वजांच्या दैवतांना” नाकारतो?

या भविष्यसूचक शब्दांच्या पूर्णतेत, उत्तरेच्या राजाने, रोममधील मुर्तीपूजक दैवत असो की ख्रिस्ती धर्मराज्यातील त्रैक्यवाद्यांचे देव असोत, “आपल्या पूर्वजांच्या दैवतांना” नाकारले. हिटलरने, ख्रिस्ती धर्मराज्याचा वापर त्याच्या स्वतःच्या उद्देशासाठी केला, परंतु बळाच्या आधारे त्याने त्याचा नवीन जर्मनी चर्चमध्ये बदल करण्याची योजना केली. त्या उत्तरेच्या उत्तराधिकारी राजाने थेटपणे नास्तिकतेला उद्युक्‍त केले. अशारितीने उत्तरेच्या राजाने स्वतःला दैवत बनवले, ‘आपणांस सर्वाहून श्रेष्ठ समजले.’

ती भविष्यवाणी पुढे सांगते: “आपल्या स्थानी राहून तो दुर्ग दैवतास पूज्य मानील, जे दैवत त्याच्या पूर्वजांस माहीत नव्हते त्याची तो सोने, रूपे, जवाहीर व मनोरम वस्तु यांनी पूजा करील.” (दानीएल ११:३८) वस्तुतः, उत्तरेच्या राजाने त्याचा भरवसा, आधुनिक वैज्ञानिक लष्करी धोरणावर, म्हणजे “दुर्ग दैवता”वर ठेवला. अंताच्या समयात, या “दैवता”च्या वेदीवर अमाप संपत्तीचे अर्पण देऊन त्याकडून तारण मिळवण्याचा प्रयत्न केला.

४. उत्तरेच्या राजाला कोणते यश मिळाले होते?

“एका परकीय दैवताच्या साहाय्याने तो मोठे मजबूत गड लढेल; जे कोणी त्याला मानतील त्यांना तो वैभवास चढवील; त्यांस पुष्कळ लोकांवर सत्ता देईल व मोल घेऊन जमीन वाटून देईल.” (दानीएल ११:३९) त्याच्या लष्करी धोरणावर, “परकीय दैवतां”वर भाव ठेवून ‘शेवटल्या दिवसातील’ शक्‍तीशाली लष्करी सामर्थ्याला शाबीत करून उत्तरेचा राजा अधिक “लढेल.” (२ तीमथ्य ३:१) ज्यांनी त्याच्या धोरणांना पाठिंबा दिला, त्यांना राजकीय, आर्थिक आणि कधीकधी लष्करी साहाय्याचा मोबदला मिळाला.

“अंतसमयी”

५, ६. दक्षिणेच्या राजाने कशारितीने ‘टक्कर’ दिली, आणि उत्तरेच्या राजाने त्याला कशी प्रतिक्रिया दाखवली?

दानीएल ११:४०अ असे वाचले जाते: “अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल.” आमच्या काळात या तसेच पुढील वचनांकडे त्यांची पूर्णता घडेल या दृष्टीने पाहिले जाते. तथापि, “अंतसमयी” याचा अर्थ दानीएल १२:४, ९ मध्ये सांगितल्याप्रमाणेच आहे, तर या शब्दांची पूर्णता आम्ही शेवटल्या दिवसांमध्ये पाहिली पाहिजे. या काळाच्या दरम्यान दक्षिणेच्या राजाने उत्तरेच्या राजाला ‘टक्कर’ दिली आहे का? होय, निश्‍चितच. पहिल्या महायुद्धानंतर, दंडात्मक शांतीचा तह, सूड घेण्याच्या चिथावणीला ‘टक्कर’ देणारा नक्कीच ठरला. दुसऱ्‍या महायुद्धातील त्याच्या विजयानंतर, दक्षिणेच्या राजाने त्याच्या प्रतिस्पर्ध्याविरूद्ध भयजनक अण्वस्र (न्यूक्लियर) हत्यारांचे लक्ष्य ठेवले व स्वतःला शक्‍तीशाली लष्करी ऐक्य, एनएटीओने संघटित केले. वर्षे उलटल्यावर, त्याच्या “टक्कर” देण्यामध्ये, उच्च-तंत्रज्ञानाची हेरगिरी त्याचबरोबर निष्णात आणि लष्करी कुरापतीचा समावेश होता.

उत्तरेच्या राजाने याला कशी प्रतिक्रिया दाखवली? “उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याजवर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यास पादाक्रांत करून पार निघून जाईल.” (दानीएल ११:४०ब) उत्तरेच्या राजाचा विस्तार शेवटल्या दिवसाच्या इतिहासाने प्रकट केला. दुसऱ्‍या महायुद्धात, नाझी “राजा,” भोवती असलेल्या त्याच्या देशांच्या सीमेवर वावटळीसारखा आला. त्या युद्धाच्या समाप्तीस, उत्तराधिकारी “राजा”ने त्याच्या स्वतःच्या सीमेबाहेर एक शक्‍तीशाली साम्राज्य उभे केले. शीत युद्धात, इतर देशांनी लढलेल्या युद्धात दक्षिणेच्या राजाने व उत्तरेच्या राजाने लागोपाठ पाठिंबा दिला व आफ्रिका, आशिया, आणि लॅटीन अमेरिकेत बंडखोऱ्‍या केल्या. त्याने खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा छळ केला, त्यांच्या कार्याला मर्यादा (परंतु कधीही बंद केले नाही) घातली. त्याच्या लष्करी आणि राजकीय हल्ल्याचा उपयोग करून अनेक देशांना त्याने त्याच्या नियंत्रणाखाली आणले. हे, देवदूताने भविष्यवाणी केल्याप्रमाणेच झाले: “तो वैभवी देशातही शिरेल; पुष्कळ देश पादाक्रांत होतील”—दानीएल ११:४१अ.

७. उत्तरेच्या राजाच्या विस्ताराविषयी कोणत्या मर्यादा होत्या?

तरीसुद्धा, त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या दृष्टिकोनातून, उत्तरेच्या राजाची उपस्थिती त्याला दहशतीसारखी वाटली तरी, त्याने जागतिक विजय मिळवला नाही. “पण एदोम, मवाब व अम्मोन येथील निवडक लोक हे त्याच्या हातातून सुटतील.” (दानीएल ११:४१ब) प्राचीन काळात, एदोम, मवाब, आणि अम्मोन यांचे ठिकाण अंदाजे इजिप्त आणि अश्‍शुरच्या मध्ये होते. ती रा आज उत्तरेच्या राजाचे लक्ष्य असलेले परंतु त्याच्या प्रभावाखाली आणण्यास असमर्थ असलेल्या राष्ट्रांना आणि संघटनांना सूचित केली जाऊ शकतात.

‘इजिप्तही त्याच्या हातून सुटणार नाही’

८, ९. उत्तरेच्या राजाचा प्रभाव प्रमुख प्रतिस्पर्ध्याला देखील कसा जाणवला?

देवदूत पुढे असे कळवतो की: “अशा प्रकारे त्या देशावर तो आपला हात चालवील; मिसर [इजिप्त] देशही त्याच्या हातून सुटणार नाही. तो मिसर [इजिप्त] देशांतील सोन्यारूप्याचे निधी व सर्व मोलवान्‌ वस्तु कबजांत घेईल; लुबी व कुशी हेही त्याच्या मागून चालतील.” (दानीएल ११:४२, ४३) दक्षिणेचा राजा, “इजिप्त,” वर देखील उत्तरेच्या राजाच्या विस्ताराच्या धोरणाचा प्रभाव झाल्यावाचून राहिला नाही. उदाहरणार्थ, व्हिएतनाममध्ये लक्षणीय पराभव केल्याने दक्षिणेच्या राजाचे नुकसान झाले. आणि “लुबी व कुशी” लोकांविषयी काय? प्राचीन इजिप्तचे हे शेजारी, भौगोलिक दृष्टीने बोलायचे झाले तर, आज आधुनिक “इजिप्त”च्या शेजारील राष्ट्रांना यथायोग्यपणे चित्रित करू शकतात आणि कधी कधी त्याचे अनुयायी असल्याने, उत्तरेच्या राजाच्या ‘मागून चालतात.’

उत्तरेच्या राजाने ‘इजिप्तच्या गुप्त निधीवर सत्ता केली का? त्याने दक्षिणेच्या राजावर निश्‍चितच विजय मिळवला नाही आणि तो विजय मिळवील असे १९९३ च्या जागतिक परिस्थितीवरून दिसून येत नाही. परंतु दक्षिणेच्या राजाने त्याच्या आर्थिक मिळकतीचा ज्यारीतीने वापर केला, त्यावर याचा सामर्थ्यशाली पगडा बसलेला होता. त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या भीतीमुळे, दक्षिणेच्या राजाने दर वर्षी त्याचे प्रचंड लष्कर, आरमार आणि वायूसेनेच्या पालनपोषणासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. या प्रमाणात उत्तरेच्या राजाने, दक्षिणेच्या राजाच्या संपत्तीच्या अधिकारावर ‘राज्य केले,’ नियंत्रणाधीन ठेवले असे म्हटले जाऊ शकते.

उत्तरेकडील राजाची अंतिम मोहीम

१०. देवदूत कशारीतीने दोन राजांमधील स्पर्धेच्या अंताचे वर्णन करतो?

१० या दोन राजांमधील प्रतिस्पर्धा कायम अनिश्‍चित काळापर्यंत चालली का? नाही. देवदूताने दानिएलाला सांगितले: “पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो [उत्तरेचा राजा] चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल. समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील, पण त्याचा अंत येईल, कोणी त्यास साहाय्य करणार नाही.”—दानीएल ११:४४, ४५.

११, १२. उत्तरेचा राजा व दक्षिणेचा राजा यांच्यामधील स्पर्धेशी अलिकडील राजकीय घटनांचा काय संबंध आहे आणि आम्हाला अजूनही काय कळायचे आहे?

११ या घटना भविष्यात होणाऱ्‍या असल्यामुळे, भविष्यवाणीची पूर्णता कशी होईल हे आम्ही सविस्तरपणे सांगू शकत नाही. अलिकडे या दोन राजांच्या राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. अमेरिका आणि पूर्व युरोपातील देशात कटुतेच्या प्रतिस्पर्धा थंडावल्या आहेत. शिवाय, सोविएत संघराज्याला १९९१ मध्ये विस्कळितपणा आला होता, आणि तो आता अस्तित्वात नाही.—मार्च १, १९९२ च्या टेहळणी बुरूज [इंग्रजी] ची पृष्ठे ४, ५ पाहा.

१२ यास्तव उत्तरेचा राजा कोण आहे? पूर्वीच्या सोविएत संघराज्याचा भाग असलेल्या देशातील एक, म्हणून त्याला ओळखावे का? किंवा पूर्वी अनेकदा त्याची स्वतःची ओळख बदलली त्याप्रमाणे तो आता पूर्णपणे बदलत आहे का? हे आम्ही सांगू शकत नाही. दानीएल ११:४४, ४५ ची पूर्णता होईल तेव्हा उत्तरेचा राजा कोण असेल? या दोन राजांमधील प्रतिस्पर्धेचा भडका पुन्हा होईल का? आणि अनेक देशात अजूनही असलेल्या अण्वस्राच्या प्रचंड साठ्याविषयी काय? या प्रश्‍नांची उत्तरे केवळ येणारा काळच देऊ शकेल.

१३, १४. दोन राजांच्या भविष्याविषयी आम्हाला काय माहीत आहे?

१३ एक गोष्ट मात्र आम्हाला माहीत आहे. उत्तरेचा राजा लवकरच, “पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी चिंताक्रांत” होऊन चढाईची मोहीम सुरू करील. ही मोहीम लगेचच पुढे त्याच्या “अंता”प्रत नेईल. पवित्र शास्त्राच्या इतर भविष्यवाण्यांचा विचार केल्यास, त्या “बातम्या”विषयी आम्ही अधिक शिकू शकतो.

१४ तथापि, प्रथम हे लक्षात घ्या की, उत्तरेच्या राजाची ही कृत्ये दक्षिणेच्या राजाविरूद्ध आहेत असे म्हटले नाही. त्याच्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याकडून त्याचा अंत होत नाही. त्याचरीतीने, उत्तरेच्या राजाकडून दक्षिणेच्या राजाचा नाश होत नाही. दक्षिणेकडील राजाचा (इतर भविष्यवाणीत त्याला श्‍वापदावरील अंतिम शिंग असे सूचित केले आहे) नाश, “[मानवी] हात न पडता” देवाच्या राज्याद्वारे केला जातो. (दानीएल ७:२६; ८:२५) वास्तविकपणे, आर्मगिदोनाच्या लढाईमध्ये देवाच्या राज्याकडून सर्वच पार्थिव राजांचा शेवटी नाश होणार, आणि हेच उत्तरेच्या राजाच्या बाबतीत उघडपणे घडते. (दानीएल २:४४; १२:१; प्रकटीकरण १६:१४, १६) दानीएल ११:४४, ४५, अंतिम लढाईकडे निरवणाऱ्‍या घटनांचे वर्णन करते. उत्तरेचा राजा त्याच्या अंताचा सामना करील तेव्हा “कोणी त्यास साहाय्य करणार नाही” यात काही आश्‍चर्य नाही!

१५. कोणत्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची चर्चा करणे अजून बाकी राहिले आहे?

१५ तर मग, उत्तरेच्या राजाला “पुष्कळांचा उच्छेद” करण्यासाठी प्रवृत्त करतील अशा “बातम्या”वर प्रकाश टाकणाऱ्‍या इतर भविष्यवाण्या कोणत्या आहेत. आणि ज्यांचा उच्छेद करण्याची त्याची इच्छा आहे असे “पुष्कळ” कोण आहेत?

पूर्वेकडल्या बातम्या

१६. (अ) आर्मगिदोनाआधी कोणती उल्लेखनीय घटना घडली पाहिजे? (ब) ‘सूर्याच्या उगवतीपासून येणारे राजे’ कोण आहेत?

१६ आर्मगिदोनाच्या अंतिम लढाईच्या आधी, खऱ्‍या भक्‍तीचा थोर शत्रू, कलावंतीणीसमान खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, मोठ्या बाबेलचा नाश झाला पाहिजे. (प्रकटीकरण १८:३-८) तिचा नाश, देवाच्या क्रोधाची सहावी वाटी लाक्षणिक फरात महानदावर ओतण्याद्वारे सूचित होतो. “सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी” म्हणून महानदाचे पाणी आटते. (प्रकटीकरण १६:१२) हे राजे कोण आहेत? यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताखेरीज दुसरे कोणी असू शकत नाहीत! *

१७. (अ) मोठ्या बाबेलच्या नाशाविषयी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते? (ब) “पूर्वेकडल्या” बातम्या, काय असू शकतात?

१७ मोठ्या बाबेलच्या नाशाचे ठळक वर्णन प्रकटीकरणाच्या पुस्तकात केले आहे: “जी दहा शिंगे [अंतसमयात राज्य करीत असलेले राजे] व जे श्‍वापद [संयुक्‍त राष्ट्र संघाला सूचित करणारे किरमिजी रंगाचे श्‍वापद] तू पाहिले ती कलावंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” (प्रकटीकरण १७:१६) खरेच, रा ‘अधिक लोकांचा नाश करतात’! (दानीएल ७:५) परंतु उत्तरेच्या राजासहीत, हे शासक मोठ्या बाबेलचा नाश का करतात? कारण ‘कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले.’ (प्रकटीकरण १७:१७) “पूर्वेकडल्या” बातम्या, यहोवा जेव्हा थोर धार्मिक कलावंतिणीचा उच्छेद करण्याविषयी ज्यारितीने मानवी शासकांच्या मनात घालण्याचे तो निवडतो त्या कृतीला यथायोग्यपणे सूचित करतात.—दानीएल ११:४४.

उत्तरेकडील बातम्या

१८. उत्तरेच्या राजाचे आणखी कोणते लक्ष्य आहे, आणि तो त्याच्या अंताप्रत पोहचेल तेव्हा त्याचे ठिकाण कोठे असेल?

१८ परंतु क्रोधासाठी उत्तरेच्या राजाचे आणखी एक लक्ष्य आहे. देवदूत म्हणतो की, “समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील.” (दानीएल ११:४५) दानिएलाच्या दिवसात भव्य समुद्र मेडिटेरीयन (भूमध्य समुद्र) होता, आणि पवित्र पर्वत सीयोन ही देवाच्या मंदिराची एके काळची जागा होती. याप्रकारे, भविष्यवाणीच्या पूर्णतेत उत्तरेचा क्रोधाविष्ट राजा देवाच्या लोकांच्या विरूद्ध लष्करी मोहीम सुरू करतो! आध्यात्मिक अर्थाने आज, मानवजातीपासून दुरावलेल्या ‘समुद्रातून’ आलेल्या आणि येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय सीयोन पर्वतावरून राज्य करण्याची आशा असलेल्या देवाच्या अभिषिक्‍त सेवकांच्या आध्यात्मिक ठेव्यात, “समुद्र व पवित्र पर्वतांच्या दरम्यान” त्याचे ठिकाण आहे.—यशया ५७:२०; इब्रीयांस १२:२२; प्रकटीकरण १४:१.

१९. यहेज्केलाच्या भविष्यवाणीत सूचित केल्याप्रमाणे, गोगच्या हल्ल्याला प्रवृत्त करणाऱ्‍या बातम्या आम्ही कशा ओळखू शकतो? (तळटीप पहा.)

१९ “शेवटल्या दिवसात” देवाच्या लोकांवरील हल्ल्याबद्दल दानिएलाच्या समकालात असलेल्या यहेज्केलाने देखील भविष्यवाणी केली होती. त्याने म्हटले की, दियाबल सैतानाला चित्रित करणारा, मागोगचा गोग याकडून लढाईचा आरंभ होईल. (यहेज्केल ३८:१६) लाक्षणिकदृष्ट्या, कोणत्या बाजूने गोग येतो? यहोवा यहेज्केलामार्फत सांगतो: “तू आपल्या स्थानाहून येशील, उत्तरेकडल्या दूरदूरच्या देशांतून.” (यहेज्केल ३८:१५) याप्रकारे, “उत्तरेकडल्या” बातम्या, उत्तरेच्या राजाला व इतर सर्व राजांना यहोवाच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करणारा सैतानाचा खोटा प्रचार असू शकतो. *—पडताळा प्रकटीकरण १६:१३, १४; १७:१४.

२०, २१. (अ) गोग, देवाच्या लोकांवर चढाई करण्यासाठी, उत्तरेच्या राजासहीत इतर राष्ट्रांना का प्रवृत्त करील? (ब) त्याची चढाई यशस्वी होईल का?

२० “देवाचा इस्राएला” समवेत इतर मेंढरातील मोठ्या लोकसमुदायाबरोबर असलेल्या समृद्धतेमुळे ते या जगाचे भाग नाहीत यास्तव गोग पूर्ण निश्‍चयाने हा हल्ला करण्याची तयारी करतो. (गलतीकरास ६:१६; योहान १०:१६; १७:१५, १६; १ योहान ५:१९) गोग, “निरनिराळ्या राष्ट्रातून जमा केलेल्या ज्या लोकांनी [आध्यात्मिक] संपत्ती व मालमत्ता संपादन केली आहे” त्यांच्याकडे संशयाने पाहतो. (यहेज्केल ३८:१२; प्रकटीकरण ५:९; ७:९) या शब्दांच्या पूर्णतेत यहोवाचे लोक पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध होत आहेत. पूर्वी प्रतिबंध असलेल्या युरोपातील अनेक देशांमध्ये, आफ्रिका, आणि आशियामध्ये आता ते मुक्‍तपणे भक्‍ती करू शकतात. यहोवाच्या खऱ्‍या उपासनेसाठी १९८७ व १९९२ च्या दरम्यान, दहा लाखाच्या वर “निवडक वस्तू” राष्ट्रांमधून आल्या. आध्यात्मिकतेत ते समृद्ध आणि शांतीपूर्ण आहेत.—हाग्गय २:७; यशया २:२-४; २ करिंथकर ८:९.

२१ ‘तटबंदी नसलेल्या गावांप्रमाणे’ ख्रिश्‍चन आध्यात्मिक वतनाला सहजपणे जिंकता येईल असे पाहिल्यावर, मानवजातीवर संपूर्ण ताबा ठेवण्यात आलेल्या या अडखळणाला नाश करण्यासाठी गोग अतिशय प्रयत्न करतो. (यहेज्केल ३८:११) परंतु तो अपयशी होतो. यहोवाच्या लोकांवर उत्तरेचा राजा चढाई करील तेव्हा, ते ‘सर्व त्यांच्या अंताप्रत येतील.’ कशाप्रकारे?

तिसरा राजा

२२, २३. गोगने चढाई केल्यावर, देवाच्या लोकांच्या वतीने कोण उठतो, आणि कोणत्या परिणामास्तव?

२२ यहेज्केल म्हणतो की, गोगचा हल्ला, यहोवा देवाला त्याच्या लोकांच्या वतीने उठण्यासाठी आणि गोगच्या सैन्यांना “इस्राएलाच्या पर्वताकडे” आणून नाश करण्यासाठी एक चिन्ह असेल. (यहेज्केल ३८:१८; ३९:४) हे आम्हाला, देवदूत दानिएलाला काय सांगतो त्याची आठवण करून देते: “त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्‍त होतील.”—दानीएल १२:१.

२३ स्वर्गीय योद्धा, मीखाएल, येशू, १९१४ मध्ये देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा झाला. (प्रकटीकरण ११:१५; १२:७-९) तेव्हापासून तो, ‘दानिएलाच्या लोकांचा कैवार’ घेणारा असा उभा आहे. तथापि, लवकरच, तो अजिंक्य योद्धा-राजा या नात्याने यहोवाच्या नावाने ‘उठेल’ व “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड” उगवील. (२ थेस्सलनीकाकर १:८) दानिएलाच्या भविष्यवाणीतील राजांसहित पृथ्वीवरील सर्व रा “शोक करतील.” (मत्तय २४:३०) ‘दानिएलाच्या लोकांच्या’ बाबतीत अजूनही दुष्ट विचार त्यांच्या मनामध्ये ठेवून, ते ‘थोर अधिपती मीखाएल’ कडून कायमचे नाश होतील.—प्रकटीकरण १९:११-२१.

२४. दानिएलाच्या या भविष्यवाणीच्या अभ्यासाचा परिणाम आमच्यावर कसा झाला पाहिजे?

२४ मीखाएल आणि त्याचा देव, यहोवाच्या भव्य विजयाची आम्ही वाट पाहत नाही का? कारण खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी त्या विजयाचा अर्थ, “सुटका,” बचाव असेल. (पडताळा मलाखी ४:१-३) याप्रकारे, भविष्याकडे अधिक अपेक्षेने पाहिल्यावर, प्रेषित पौलाच्या शब्दांची आम्हाला आठवण होते: “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.” (२ तीमथ्य ४:२) यास्तव, आपण जीवनाच्या वचनाची चांगली पकड धरू या आणि सुवेळ आहे तोवर यहोवाच्या मेंढरांचा शोध करण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करु या. आम्ही जीवनाच्या शर्यतीच्या अंतिम टप्प्यात आहोत. बक्षीस आमच्यासमोर दिसत आहे. आपण सर्व जन शेवटपर्यंत धीराने टिकून राहण्याचा व बचावणाऱ्‍यांमधील असण्याचा निश्‍चय करू या.—मत्तय २४:१३; इब्रीयांस १२:१.

[तळटीपा]

^ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या ७ क्रमांक असलेल्या माहितीपत्रकातील पृष्ठे ८, ९ पाहा.

^ वैकल्पिकरीत्या “उत्तरेकडल्या” बातम्या, गोगच्या बाबतीत यहोवाच्या शब्दावरून त्याचा आरंभ यहोवाकडून होतो हे शाबीत करू शकतात: “मी . . . तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन.” “मी तुला . . . उत्तरेच्या अतिशयित दूर प्रदेशातून यावयास लावीन, तुला इस्राएलाच्या पर्वताकडे आणीन.”—यहेज्केल ३८:४; ३९:२; पडताळा स्तोत्रसंहिता ४८:२.

तुम्हाला समजले का?

▫ अंतसमयामध्ये, दक्षिणेच्या राजाने उत्तरेच्या राजाला कशाप्रकारे टक्कर दिली आहे?

▫ दोन राजांमधील प्रतिस्पर्धेच्या अंतिम परिणामाविषयी आम्हाला अद्याप काय कळायचे आहे?

▫ आर्मगिदोनाआधीच्या कोणत्या दोन घटनांत उत्तरेचा राजा निश्‍चितच गोवलेला असेल?

▫ ‘थोर अधिपती मीखाएल, देवाच्या लोकांचे रक्षण कशाप्रकारे करील?

▫ दानिएलाच्या भविष्यवाणीच्या आमच्या अभ्यासामुळे आम्ही कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्रं]

उत्तरेचा राजाने आपल्या पूर्वजांच्या दैवतांपेक्षा वेगळ्या दैवतांची भक्‍ती केली